Hemant Soren : भाजपचे माझ्याविरोधात कारस्थान

‘भाजपचे दिवस आता भरू लागले असून येत्या काळामध्ये हा पक्ष झारखंडमधून नष्ट होईल.’
hemant soren
hemant sorenSakal
Updated on

रांची - ‘भाजपने आपल्याविरोधात कारस्थान रचले होते. विधानसभेच्या आगामी निवडणुकीनंतर हा पक्ष राज्यातून नामशेष होईल,’ अशी घणाघाती टीका झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केली.

‘ज्यांनी कारस्थान रचले त्यांच्याविरोधात बंड होईल, राज्यातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही’ असेही त्यांनी नमूद केले. सोरेन म्हणाले, ‘भाजपचे दिवस आता भरू लागले असून येत्या काळामध्ये हा पक्ष झारखंडमधून नष्ट होईल.’ उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सोरेन यांची शुक्रवारी सुटका करण्यात आली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.

‘राज्यात विधानसभा निवडणूकच होता कामा नये म्हणून भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. मी भाजपला खुले आव्हान देतो की त्यांनी त्यांना वाटेल तेव्हा कधीही निवडणूक घ्यावी. ही मंडळी आता झारखंडमध्ये त्यांचा मुख्यमंत्री बसविण्याच्या प्रयत्नात आहेत पण हे सगळे काही ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत,’ असे सोरेन म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com