MP Election: मध्यप्रदेश-छत्तीसगड निवडणुकीसाठी BJP ची पहिली यादी जाहीर; चक्क मुख्यमंत्री शिवराज सिंहांचे नाव वगळले?

Narendra Modi and Shivraj Sinh Chauhan
Narendra Modi and Shivraj Sinh Chauhan
Updated on

मध्यप्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजप तयारीला लागली आहे. या अनुषंगाने भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. यादीमध्ये मध्यप्रदेशमध्ये 39 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून छत्तीसगडमधील 21 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मध्यप्रदेशात भाजपने ज्या ३९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, त्यापैकी तीन महिला असून यात धक्कादायक बाब म्हणजे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं नाव नाहीये

Narendra Modi and Shivraj Sinh Chauhan
Sharad Pawar: महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीसमोर झुकत नाही; रोहित पवारांचा स्पष्ट संदेश
Narendra Modi and Shivraj Sinh Chauhan
Sharad Ponkshe: राहुल गांधींचं आडनाव खान ? पोंक्षेची मुक्ताफळे, आव्हाडांनी दिले खणखणीत प्रत्युत्तर

चित्रकूट मतदारसंघातून भाजपने सुरेंद्र सिंह गहरवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. छतरपूर मतदारसंघातून भाजपने ललिता यादव यांना उमेदवारी दिली आहे. सुमावलीमधून अदल सिंग कंसाना आणि पिचोरमधून प्रीतम सिंग लोधी यांना संधी मिळाली आहे.

प्रीतम सिंह लोधी हे ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांच्या जवळचे मानले जातात. गोहड राखीव जागेवरून लालसिंग आर्य निवडणूक लढवणार आहेत. ते भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्षही आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस ओमप्रकाश धुर्वे यांना शाहपुरा येथून तिकीट देण्यात आले आहे.

Narendra Modi and Shivraj Sinh Chauhan
Sharad Pawar: मंगळवेढ्यात पवारांचे तीन स्वतंत्र सत्कार, बंडामुळे 'राष्ट्रवादी पुन्हा'चं कसं?
Narendra Modi and Shivraj Sinh Chauhan
Sleep With Feet Facing South : दक्षिणेकडे पाय करून का झोपायचं नसतं? जाणून घ्या विज्ञान काय सांगतं?

दुसरीकडे छत्तीसगडमध्ये भाजपने २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या २१ पैकी ५ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने बस्तर या आदिवासी राखीव जागेवरून मणिराम कश्यप यांना तिकीट दिले आहे.

Narendra Modi and Shivraj Sinh Chauhan
Sharad Pawar: मंगळवेढ्यात पवारांचे तीन स्वतंत्र सत्कार, बंडामुळे 'राष्ट्रवादी पुन्हा'चं कसं?

सेफ सीट मोहला मानपूर येथून संजीव साहा यांना संधी मिळाली आहे. याशिवाय अभानपूरमधून इंद्रकुमार साहू, खैरागडमधून विक्रांत सिंह, कांकेरमधून आशाराम नेता यांना तिकीट देण्यात आले आहे.

रामविचार नेताम यांना रामानुजगंजमधून तर शकुंतला सिंग पोर्थे यांना प्रतापपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रेम नगरमधून भुलनसिंग मरावी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. छत्तीसगडमधूनही माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही.

Narendra Modi and Shivraj Sinh Chauhan
Jalgaon News : ‘तापी’त उडी घेत डॉक्टरची आत्महत्या; चर्चा मात्र ‘सुसाईड नोट’ची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.