नवी दिल्ली : कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चाललं आहे. दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा मोठं नुकसान झालेलं पहायला मिळालं आहे. मोदी सरकारचा अति आत्मविश्वासच या परिस्थितीला कारणीभूत असल्याचा ठपका विरोधकांकडून सातत्याने करण्यात आला आहे. तसेच टीका करणाऱ्या विरोधकांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोपी देखील सरकारवर झाला. या साऱ्या पार्श्वभूमीवर आपली डागाळलेली प्रतिमा सावरण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
कोविड लसीकरण आणि त्यासंबंधित समस्यांबाबत लोकांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आपल्या ऐच्छिक सेवेचा दुसरा टप्पा सुरू करण्यास आता तयार झाली आहे. कोविडच्या दुसर्या लाटेला देशाने कडवट अशी झुंज आहे दिली. मोदी सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळेच दुसऱ्या लाटेची ही समस्या उद्भवल्याचा आरोप झाला. या लाटेला तोंड देण्यामध्ये सरकार सफशेल कमी पडलं असल्याचीही जोरदार टीका झाली. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणूनच हा कार्यक्रम गेल्या महिन्यात भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांनी सुरू केला होता.
'सेवा ही संघटन' या कार्यक्रमाअंतर्गत भाजपच्या कार्यकर्त्यांना लसीकरण मोहिमेमध्ये योगदान, मदत कार्य आणि आरोग्य कर्माचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. लसीकरण मोहिमेअंतर्गत, पक्षाच्या कार्यकर्त्यांना वय वर्षे 45 च्या वरील लोकांना लसीचे दोन्ही डोस कसे मिळतील, यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
18 ते 44 वयोगटामध्ये, विशिष्ट गट निश्चित केले गेले आहेत ज्यांना या कोरोना रोगाचा धोका जास्त असतो. पक्ष कार्यकर्त्यांना डिलिव्हरी बॉय, ऑटो रिक्षा चालक, घर कामगार, वृत्तपत्र वितरक, गॅस सिलिंडर वितरक या सगळ्यांनाच लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यास सांगितले आहे.
दुसरा महत्त्वपूर्ण गट म्हणजे 12 वर्षांखालील मुलांचे पालक हा मानला जातो. या तिसऱ्या लाटेमध्ये या 12 वर्षांखालील मुलांना अधिक धोका असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी शक्य ते प्रतिबंधात्मक उपाय योजन्याच्या सुचना देखील देण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.