Chhattisgarh Blast: स्फोटकांच्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट; 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

Blast at explosives manufacturing factory: छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातील एका स्फोटकाच्या फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे.
Blast
Blast
Updated on

नवी दिल्ली- छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातील एका स्फोटकाच्या फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

बेरलामधील पिरडा गावात हा स्फोट झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. सध्याच्या माहितीनुसार, सहाजण जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Blast
Dombivli MIDC Blast : डोंबिवली दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात स्थापन केला मदत कक्ष

दोनच दिवसांपूर्वी डोंबिवली येथे एका केमिकलच्या कंपनीत स्फोट झाला होता. यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झालाय, तर ६० जण जखमी झाले आहेत. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यातच आता ही छत्तीसगडमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटावेळी अनेकजण परिसरात उपस्थित होते असं सांगितलं जातं.

Blast
Dombivli MIDC Blast : 'त्या' अधिकाऱ्यांवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, नाहीतर..; काय म्हणाले मनसे नेते पाटील?

स्फोटकांच्या कारखान्यामध्ये स्फोट झाला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. युद्ध पातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी आल्या आहेत. स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. स्फोट इतका मोठा होता की किलोमीटरपर्यंत हादरा बसला होता. दरम्यान, आतापर्यंत एकाही मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.