ट्विटर अकाउंट बंद करा! सायनाबद्दल ट्विट करणाऱ्या सिद्धार्थवर भडकला महिला आयोग

ट्विटर अकाउंट बंद करा! सायनाबद्दल ट्विट करणाऱ्या सिद्धार्थवर भडकला महिला आयोग
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदीजी पंजाबमध्ये असताना सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींच्या संदर्भातील प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. पंतप्रधान मोदीजींच्या सुरक्षेसंदर्भातील एक ट्विट बॅडमिंटनपट्टू सायना नेहवाल हिने केलं होतं. तिच्या या ट्विटवर दाक्षिणात्य सिने अभिनेता सिद्धार्थने प्रतिक्रिया देणारं ट्विट केलं होतं. त्याच्या या ट्विटवर आक्षेप नोंदवत आता राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women - NCW) ट्विटरकडे त्याचं अकाउंट बंद करण्यासंदर्भातील मागणी केली आहे.

ट्विटर अकाउंट बंद करा! सायनाबद्दल ट्विट करणाऱ्या सिद्धार्थवर भडकला महिला आयोग
शरद पवारांनी शब्द दिलाय; कामावर या! कृती समितीचे ST कर्मचाऱ्यांना आवाहन

राष्ट्रीय महिला आयोगाने (NWC) सोमवारी सांगितलंय की, 6 जानेवारी रोजी केलेल्या पोस्टनंतर, बॅडमिंटनपटू आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सायना नेहवाल यांच्यावरील ट्विटबद्दल अभिनेता सिद्धार्थचे हँडल ब्लॉक करण्यात यावं या मागणीसाठी त्यांनी ट्विटरला पत्र लिहलंय.

राष्ट्रीय महिला आयोगा ने दखल घेतली आहे. अध्यक्षा रेखा शर्मा यांनी DGP महाराष्ट्र यांना या प्रकरणाची चौकशी आणि FIR नोंदवण्यासाठी पत्र लिहिले आहे. NCW ने ट्विटर इंडियाला अभिनेता सिद्धार्थचे खाते बंद करण्यासाठी आणि अशी टिप्पणी पोस्ट केल्याबद्दल त्याच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी देखील लिहिले आहे,” अशी माहिती आयोगाने ट्विटरवर दिली आहे.

ट्विटर अकाउंट बंद करा! सायनाबद्दल ट्विट करणाऱ्या सिद्धार्थवर भडकला महिला आयोग
'सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे ST कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ'

अभिनेता सिद्धार्थने आपल्या ट्विटबाबत स्पष्टीकरण देणारं एक ट्विट केलंय. माझ्या ट्विटमध्ये 'COCK & BULL' असा संदर्भ होता. यामधून वेगळा अर्थ काढणं चुकीचं आणि दिशाभूल करणारं ठरेल. अनादर करण्यासारखी कोणतीही गोष्ट मनात नव्हती.

याआधी, पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये 5 जानेवारीला झालेल्या त्रुटींवरुन सायना नेहवालने केलेल्या ट्विटचा निषेध करणारं ट्विट केलं होतं.

तिच्या ट्विटवर सिद्धार्थने ट्विट केलं होतं. त्याच्या ट्विटमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल पॉपस्टार रिहानाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये केलेल्या ट्विटचा संदर्भ होता, ज्यामध्ये लिहिले होते, "आपण याबद्दल का बोलत नाही?" दरम्यान, सिद्धार्थला उत्तर देताना सायना नेहवालने म्हटलंय की, स्वत:ला व्यक्त करण्यासाठी तो अधिक चांगले शब्द निवडू शकला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.