Dogs Blood : माणसांपेक्षा कुत्र्यांचं रक्त विकलं जातंय महाग, जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?

माणसांप्रमाणंच पाळीव प्राण्यांनाही आजारी पडल्यावर रक्तसंक्रमणाची गरज असते.
Blood of Dogs
Blood of Dogsesakal
Updated on
Summary

माणसांप्रमाणंच पाळीव प्राण्यांनाही आजारी पडल्यावर रक्तसंक्रमणाची गरज असते.

भोपाळ : माणसांप्रमाणंच पाळीव प्राण्यांनाही आजारी पडल्यावर रक्तसंक्रमणाची गरज असते. परंतु, प्राण्यांच्या रक्तसंक्रमणातून रक्तपेढ्या चालवण्याचा देशात कोणताही नियम नाहीये. याच्या नावाखाली काही लोकांनी याला प्रचंड नफा कमविण्याचं साधन बनवलंय.

त्यामुळं पाळीव प्राण्यांचं विशेषतः कुत्र्यांचं रक्त (Blood of Dogs) माणसांपेक्षा महागात विकलं जात आहे. राज्याची राजधानी भोपाळमध्येच अशी मनमानी रक्त खरेदी-विक्री सुरू आहे. या अनियंत्रित बाजारात कुत्र्याच्या रक्ताची किंमत 12,000 रुपये आहे.

Blood of Dogs
Pune News: संतापजनक! पुण्यात महिला रिक्षा चालकावर बलात्काराचा प्रयत्न; नग्न अवस्थेत प्रवाशानं केला महिलेचा पाठलाग

कोलार परिसरातील लिल पाज नावाच्या डॉग क्लिनिकमध्ये कुत्र्यांचं रक्त विकण्याचा व्यवसाय सुरू असल्याचं आढळून आलंय. हा व्यवसाय दुसरं-तिसरं कोणी नसून राज्य पशुवैद्यकीय रुग्णालयात (Veterinary Hospital) तैनात असलेले डॉ. मुकेश तिवारी यांनी सुरु केलाय. त्यांनी दोन युनिट रक्तासाठी 24,000 रुपयांची मागणी केली आणि दोन तासांत कोणत्याही रक्तगटाचे रक्त देण्याचा दावा केला. डॉ. तिवारी यांना दोन तासांत रक्त कुठून आणणार, कसं आणणार असं विचारलं असता त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही.

पाळीव प्राण्यांना कोणत्याही कारणानं रक्तस्त्राव, अशक्तपणा आणि अपघात झाल्यास रक्ताची आवश्यकता असते. अशा वेळी प्राण्यांच्या रक्त संक्रमणाची कोणतीही नियमावली नसल्यानं काही खासगी रुग्णालयांनी अशा सेवा सुरू केल्या आहेत. याबाबत कायदा करण्याची गरज आहे.

- डॉ. जयंत तापसे, उपसंचालक, पशुसंवर्धन विभाग.

Blood of Dogs
Car-Bus Accident : चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका; कार-बसच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू

सध्या देशात पशुवैद्यकीय औषधांचं किमान मानक नाही, त्यामुळं काही लोक याचा गैरफायदाही घेत आहेत. अशी कोणतीही बाब आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही त्याकडं लक्ष देऊ. खरं तर ही समस्या इतकी छोटी नाहीये. सध्या आपण प्राण्यांपासून आलेल्या साथीच्या रोगाचा सामना करत आहोत. माणसांना होणारे 75 टक्के आजार हे प्राण्यांपासून होतात. अशा परिस्थितीत मानव आणि पाळीव प्राण्यांच्या वन हेल्थ संकल्पनेवर काम केलं जात आहे.

- डॉ. उमेश शर्मा, अध्यक्ष, भारतीय पशुवैद्यकीय परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.