गाझीपूरमध्येही गंगा मैलीच; पुन्हा मृतदेह आढळल्याने खळबळ

गाझीपूरमध्येही गंगा मैलीच; पुन्हा मृतदेह आढळल्याने खळबळ
Updated on

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील गाझीपूर येथे आज सलग दुसऱ्या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. कालच येथून ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बिहारमधील बक्सर येथे गंगेच्या पात्रात शेकडो अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले होते. हे सगळे मृतदेह उत्तरप्रदेशातून आल्याचा आरोप बिहारमधील अधिकाऱ्यांनी केला आहे. उत्तरप्रदेशातच मृतदेह गंगेमध्ये सोडण्याची प्रथा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उत्तर भारतात ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ लागला असून मृतांची संख्याही वाढत चालली आहे. अनेक ठिकाणांवर अंत्यसंस्कारासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने मृतदेह तसेच गंगेच्या पाण्यात सोडले जात असून महामारीचा संसर्ग आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्रामीण भागांत अंत्यसंस्काराच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे मृतदेह तसेच गंगेच्या पाण्यात सोडले जातात. यामुळे कोरोनाबरोबरच अन्य आजारांचा फैलाव होण्याचाही धोका वाढला आहे.

जलशक्ती मंत्रालयाकडून दखल

बक्सरमधील घटनेची गंभीर दखल घेत जलशक्ती विभागाचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बक्सरमधील घटना दुर्दैवी असून त्याची चौकशी झालीच पाहिजे. हा माता गंगेच्या स्वच्छतेचा प्रश्‍न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गाझीपूरमध्येही गंगा मैलीच; पुन्हा मृतदेह आढळल्याने खळबळ
भारतीय व्हेरियंटवर लस, कोरोनावरील उपचार प्रभावी; WHOचा निर्वाळा

याबाबत बोलताना काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटलंय की, बिहारमधील हे धक्कादायक चित्र आहे. मानवी मृतदेह गंगेमध्ये टाकले जात असून भारतामध्ये माणसांचं जीवन एवढं स्वस्त झालं आहे. हे आतापर्यंतचं सर्वाधिक अमानवीय दृश्‍य म्हणावं लागेन. अन्य देशांमध्ये हे घडलं असतं तर केंद्र आणि राज्यातील सरकारांना पायउतार व्हावं लागलं असतं.

स्थानिक रहिवाशाने याबाबत बोलताना म्हटलंय की, आम्ही याबाबत स्थानिक प्रशासनाला कळविले आहे पण त्यांच्याकडून अद्याप कोणताही कारवाई झालेली नाही. ही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आम्हाला कोरोना होऊ शकतो.

- अखंड, स्थानिक रहिवासी

बक्सरमध्ये आणखी ४२ मृतदेह सापडले

बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये आज दुसऱ्या दिवशी गंगेत आणखी ४२ मृतदेह आढळून आले. यामुळे आतापर्यंत येथे सापडलेल्या मृतदेहांची संख्या ७२ वर पोचली आहे. आज सापडलेल्या मृतदेहांना बाहेर काढल्यानंतर त्यांचे दफन करण्यात आले, यासाठी जेसीबीच्या माध्यमातून मोठे खड्डे खोदण्यात आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बिहारचे अप्पर गृह सचिव चैतन्यप्रसाद यांनी आज उत्तरप्रदेशच्या गृहसचिवांसोबत चर्चा करून त्यांना या घटनेची माहिती दिली. हे सगळे मृतदेह उत्तरप्रदेशातून बिहारमध्ये वाहत येत असल्याचे चैतन्यप्रसाद यांनी नमूद केले. उत्तरप्रदेशात कोरोनामुळे मरण पावलेल्यांचे मृतदेह तसेच गंगेत सोडले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या नव्याने सापडलेल्या मृतदेहांची आधी वैद्यकीय चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतरच त्यांचे दफन करण्यात आले. या सगळ्या मृतदेहांचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही सूत्रांनी सांगितले. या मृतदेहांचे पुन्हा शवविच्छेदन न करतात त्यांचे दफन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.