LAC वर तणाव, चीनला उत्तर देण्यासाठी लष्कराकडून 'बोफोर्स तोफा' तैनात

बूम-ला भागात चीन-भारताची सीमा मिळते तिथं लष्कराकडून हालचाली
LAC
LAC
Updated on

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर (LAC) सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय लष्करानं इथल्या तवांग सेक्टरमधील बुम-ला भागात बोफोर्स तोफा तैनात केल्या आहेत. तसेच लष्कराकडून इतर कुमकही वाढवण्यात येत आहे.

LAC
Facebook वर 50 दशलक्ष युरोचा दंड, ब्रिटन सरकारची कारवाई

एका कमांडरने सांगितलं की, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत उच्चपातळीवर तयार आहे. तवांग सेक्टरमधील बुम-ला भागात कोणत्याही प्रकारच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही रणनीती तयार केली आहे.

सीमेवर चीनकडून कुठलीही हरकत झाल्यास सडेतोड उत्तर देण्यासाठी कारगीलच्या युद्धात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बोफोर्स तोफांची LACवर तैनाती करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी भारत आणि चीनची हद्द प्रत्यक्ष मिळते त्या बिंदूवरच या तोफा ठेवण्यात आल्या आहेत.

काय घडतंय भारत-चीन सीमेवर?

सीमेवर चीनकडून काही भागांमध्ये नवी गावं वसवण्यात आली आहेत. यावर भारतानं आक्षेप घेतला आहे. कारण नागरिकांच्या वस्त्यांचा वापर चीनकडून सैन्य कारवाया किंवा घुसखोरीसाठी देखील केला जाऊ शकतो. पूर्व भागात सुमारे १,३०० किमी लांबीच्या सीमेवर भारतीय लष्काराची तयारी पाहणाऱ्या कमांडर सांगितलं की, लष्काराची माउंटन स्ट्राइक कोर आता पूर्णपणे तयारीत आहे. या तुकडीनं सर्व आघाड्यांवरच प्रशिक्षण घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.