पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील दिवाणी न्यायालय (Patna Civil Court) संकुलात बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्ब पोलिसाने कोर्टात आणला होता. बॉम्बस्फोटात (Bomb blast) पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी पोलिसाला उपचारासाठी पीएमसीएचमध्ये दाखल केले आहे. दुसरीकडे कोर्टात बॉम्बस्फोट होताच फिर्यादी कार्यालयात धुराचे वातावरण झाले. यानंतर लोकांची गर्दी झाली. (Bomb blast in Patna Civil Court in Bihar)
मिळालेल्या माहितीनुसार, कदमकुआन पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी पटेल हॉस्टेलवर छापा टाकून बॉम्ब जप्त केला होता. शुक्रवारी दुपारी निरीक्षक बॉम्ब घेऊन दिवाणी न्यायालयातील अभियोग कार्यालयात पोहोचले. यादरम्यान अचानक हातातच बॉम्बचा स्फोट झाला. बॉम्बस्फोटानंतर (Bomb blast) दिवाणी न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला आणि धुराचे लोट पसरले.‘गुजरातप्रकरणी क्लिनचिट दिल्याने भाजप खूश; नूपुर शर्मावर काय बोलणार’
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी, बॉम्बशोधक पथक, एफएसएल टीम आणि श्वान पथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. सर्व बाजू तपासल्या जात आहेत. पुरावा म्हणून बॉम्ब न्यायालयात (Patna Civil Court) आणल्याचे सांगण्यात आले. जेणेकरून फिर्यादीला त्याची पडताळणी करता येईल. परंतु, बॉम्बस्फोट झाला. यात बॉम्ब आणणारा हवालदार जखमी झाल्याची माहिती मिळाली.
लोकांना वाटले की कोर्टात मोठी घटना घडली आहे. परंतु, थोड्यावेळाने समजले की ही घटना नसून अपघात आहे. न्यायालयात बॉम्बस्फोट झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पटेल वसतिगृहातून जप्त केलेला बॉम्ब योग्य प्रकारे निकामी करण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. या निष्काळजीपणामुळे फिर्यादी कार्यालयात अचानक बॉम्बस्फोट (Bomb blast) झाला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.