Bomb Blasts Kerala : चंद्रशेखर यांच्यावर एफआरआय दाखल; केरळमधील साखळी बाँबस्फोटाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद

‘‘माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे राजकीय हेतून प्रेरित असून, ‘इंडिया’ आघाडीतील दोन
Bomb Blasts Kerala
Bomb Blasts Keralasakal
Updated on

कोची - केरळमधील बाँबस्फोट प्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर मंगळवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखर यांनी केरळमधील साखळी बॉँबस्फोट प्रकरणी केलेले आरोप हे दोन समुदायात तेढ निर्माण करणारे आहे असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान

‘‘माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे राजकीय हेतून प्रेरित असून, ‘इंडिया’ आघाडीतील दोन घटक पक्षांनी मिळून हा एफआयआर दाखल केला आहे’’ असा आरोप चंद्रशेखर यांनी केला आहे. ही ‘एफआयआर’ म्हणजे, इंडिया आघाडीतील काही पक्षांचा हमासला पाठिंबा असल्याचे उघड केल्याने सूड बुद्धीने केलेली कारवाई असून, विशिष्ट वर्गाचे लांगूलचालन करण्याचे प्रयत्न आहे, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि पिनराई विजयन हे लांगुलचालन करत असल्याचा आरोपही भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.

या आरोपांवरून वाद

केरळमधील साखळी बाँबस्फोटाच्‍या घटनेनंतर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी रविवारी समाजमध्यमांवरून टीका केली होती. ‘‘ भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून लांगूलचालन आणि घाणेरडे राजकारण चालू आहे.

Bomb Blasts Kerala
Malegaon Bomb Blast Case : 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: सुनावणीसाठी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर NIA कोर्टात हजर

काही लोक दिल्लीत बसून इस्राईल विरोधात दिल्लीत बसून आंदोलन करत आहेत आणि केरळमध्ये उघडपणे हमासचा दहशतवादी तेथील लोकांना संबोधित करत आहे, याचा परिणाम म्हणजे निष्पाप ख्रिश्‍चनांच्या प्रार्थना स्थळावर साखळी बाँबस्फोट घडविण्यात आला.’’ अशा आशयाची पोस्ट चंद्रशेखर यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून केली होती. या प्रकरणी आता त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()