बंगळूर - विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बंगळूर-अयोध्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बंगळूरहून अयोध्येला जाणाऱ्या आकाश एअरलाइन्सच्या विमानाचे अयोध्येच्या वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
बंगळूर-अयोध्या विमान १७३ प्रवाशांसह सुरक्षितपणे उतरले आणि विमानाची तपासणी केल्यानंतर कोणताही बॉम्ब सापडला नाही. ही बॉम्बची बनावट धमकी असल्याचे अयोध्या विमानतळाचे संचालक विनोद कुमार यांनी स्पष्ट केले.