‘कोव्हिशिल्ड’ने मृत्यू? 1 हजार कोटींचा दावा; सीरम, बिल गेट्स यांना HC ची नोटीस

 Bill Gates, Serum Institute of India, Bombay High Court
Bill Gates, Serum Institute of India, Bombay High Court
Updated on

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच दिलीप लुनावत या एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने सीरम आणि बिल गेट्स यांच्याकडून उत्तर मागितलं आहे. दिलीप लुनावत यांनी मुलीच्या मृत्यूसाठी 1 हजार कोटींची भरपाई मागितली आहे.

 Bill Gates, Serum Institute of India, Bombay High Court
'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

याचिकाकर्ते दिलीप लुनावत यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांना पक्षकार बनवले आहे. गेट्स फाउंडेशनने सीरम कंपनीसोबत भागीदारी केली आहे. 26 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती एस.व्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने याचिकेवर सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावल्या आहेत. 17 नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

याचिकाकर्त्याने दावा केला की त्यांची मुलगी स्नेहल लुनावत ही वैद्यकीय विद्यार्थिनी होती. 28 जानेवारी 2021 रोजी तिच्या नाशिक येथील महाविद्यालयात सीरमद्वारे तयार करण्यात आलेली कोविड लस कोविशील्ड घेण्यास स्नेहलला भाग पाडण्यात आले होते. ती आरोग्य सेविका होती, त्यामुळे तिला लस घेण्यास भागं पाडलं. मात्र लस घेतल्यानंतर तिला डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. 28 जानेवारी 2021 रोजी तिला उपचार करण्यास भाग पाडले गेले. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी सांगितले की तिच्या मेंदूत रक्तस्त्राव होत आहे. स्नेहलचा 1 मार्च 2021 रोजी मृत्यू झाला. मृत्यूचे कारण लसीचा दुष्परिणाम असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 Bill Gates, Serum Institute of India, Bombay High Court
मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

ही याचिका 2 ऑक्टोबर, 2021 रोजी लसीकरणानंतरच्या प्रतिकूल घटनांवरील केंद्र सरकारच्या समितीने (AEFI) सादर केलेल्या अहवालावर आधारित आहे, ज्यात कथितपणे कबूल केले की लुनावत यांची मुलगी कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे मरण पावली आहे. याचिकेत सीरमकडे एक हजार कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.