क्षेपणास्त्रांना ‘बूस्टर’

भारतीय क्षेपणास्त्रांना सुपरसॉनिक वेगाने आकाशातील दूर वरील लक्ष्याचा वेध घेणे शक्य
Booster Indian missiles detect targets
Booster Indian missiles detect targetssakal
Updated on

बालासोर : भारतीय क्षेपणास्त्रांना आता सुपरसॉनिक वेगाने आकाशातील दूरवरील लक्ष्याचा वेध घेणे शक्य होणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) त्यासाठी विकसित केलेल्या ‘प्रॉपल्शन सिस्टिम’ची शुक्रवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली.

चंडीपूर येथील प्रक्षेपणस्थळी सॉलिड फ्यूएल डक्टेड रामजेट (एसएफडीआर) बूस्टरची चाचणी घेण्यात आली. या प्रणालीच्या चाचणीमुळे हवेतून हवेमध्ये मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची क्षमता आणखी वाढणार आहे. या अत्यंत जटिल अशा क्षेपणास्त्र प्रणालीतील सगळ्या क्लिष्ट यंत्रणा योग्यपद्धतीने काम करत असल्याचे दिसून आले असून या क्षेपणास्त्राने सगळी निर्धारित लक्ष्ये गाठल्याचे ‘डीआरडीओ’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या क्षेपणास्त्रप्रणालीची चाचणी घेतली जात असताना तिच्यावर टेलिमेंटरी, रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टिम्सच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.