Brahmos Misfire : भारतीय वायुसेनेच्या ३ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

९ मार्च २०२२ रोजी ब्रह्मोस क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आले होते
Brahmos Misfire Latest News
Brahmos Misfire Latest NewsBrahmos Misfire Latest News
Updated on

Brahmos Misfire Latest News नवी दिल्ली : पाकिस्तानवर (Pakistan) चुकून डागलेल्या क्षेपणास्त्रासाठी तीन भारतीय वायुसेना अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याचे सरकारने मंगळवारी सांगितले. ९ मार्च २०२२ रोजी ब्रह्मोस क्षेपणास्त्र (Brahmos Misfire) चुकून डागण्यात आले होते. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या तीन अधिकाऱ्यांच्या सेवा तात्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आल्या आहेत, असे आयएएफने (IAF) निवेदनात म्हटले आहे.

एअर व्हाईस मार्शलला एअर मुख्यालयातून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या अपघाताची चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सविस्तर तपास केल्यानंतर या घटनेसाठी तिघांना जबाबदार धरण्यात आले. ९ मार्च रोजी चुकून क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या भूमीवर पडले होते. पाकिस्तानने हे प्रकरण उपस्थित केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १५ मार्च रोजी संसदेत सविस्तर उत्तर दिले होते.

Brahmos Misfire Latest News
Bihar Politics : बहुमत चाचणीपूर्वी ट्विस्ट; सभापतींचा राजीनामा देणार नकार

‘पाकिस्तानमध्ये (Pakistan) क्षेपणास्त्राचा अपघाती प्रक्षेपण झाल्याच्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ही घटना नियमित तपासणीदरम्यान घडली. आम्हाला नंतर कळले की ते पाकिस्तानात पडले’ असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत सांगितले होते. त्याचवेळी पाकिस्तानने म्हटले होते की, क्षेपणास्त्र (Brahmos Misfire) आमच्या हवाई हद्दीत ४० हजार फूट उंचीवरून आवाजाच्या तिप्पट वेगाने १०० किमी अंतरावर गेले.

भारताने व्यक्त केला होता खेद

क्षेपणास्त्रावर कोणतेही वारहेड नव्हते. त्यामुळे त्याचा स्फोट झाला नाही. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या मियाँ चन्नू शहरात पडले होते. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाले नाही. मात्र, भारताने लगेचच या घटनेबद्दल खेद व्यक्त केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.