Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News Updates 12 July 2024 : मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बहुचर्चित दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आमदार नीतेश राणे यांना शुक्रवारी (ता. १२) चौकशीसाठी बोलाविले आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal
Updated on

Devendra Fadnavis Live: महाविकास आघाडीचे मते देखील आमच्याकडे आली - देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीचे मते देखील आम्हाला पडली. त्यामुळे हा मोठा विजय आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

milind narvekar live:  मिलिंद नार्वेकर यांच्या विजयानंतर ठाकरे गटाचं विचार मंथन

मिलिंद नार्वेकर यांच्या विजयानंतर ठाकरे गटाचं विचार मंथन

काँग्रेसने नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची 7 मतं दिल्याची माहिती. त्यातील 2 मते फुटल्याचा ठाकरे गटाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

मिलिंद नार्वेकर, अनिल परब, अनिल देसाई, वरुण सरदेसाई, सुनील प्रभू, विनायक राऊत यांच्यात चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बैठक सुरु आहे.

Mahendra Singh Dhoni Live : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची सहकुटुंब उपस्थिती

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत पोहोचले.

Devendra Fadnavis Live : गुन्हे परस्पर सरकारला मागे घेता येत नाहीत - फडणवीस

मराठा आंदोलकांवर गुन्हे : 31 जानेवारी 2024 पूर्वी दोषारोप दाखल झालेले 141 गुन्हे मागे, 47 गुन्हे मागे न घेण्याची शिफारस, काही समितीच्या विचारार्थ, पण गुन्हे मागे घेण्याची एक पद्धत. त्यात कोर्टात जावे लागते. ते परस्पर सरकारला मागे घेता येत नाहीत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nitesh Rane Live Updates : १० वेळा जरी चौकशीला जावं लागलं, तरी मी जाणार - नितेश राणे

नितेश राणे यांनी म्हटलं आहे की काल पोलिसांकडून दिशा सलियन प्रकरणी चौकशी साठी बोलावलं होत, पण आज विधानपरिषदेचे निवडणूक आहे आणि मी पोलिंग आणि कौंटींग एजंट आहे. उद्या नरेंद्र मोदी येणार आहेत, त्यामुळे मी २ दिवसात तारीख आणि वेळ ठरवून चौकशीला जाईल व जाताना सगळ पेनड्राईव, सर्व पुरावे घेऊन जाणार आहे. त्याचबरोबर १० वेळा जरी चौकशीला जावं लागलं तरी मी जाणार आहे.

James Anderson Retirement Live Updates: अँडरसनच्या कारकि‍र्दीचा गोड शेवट, इंग्लंडचा विंडीजवर एका डावानेच विजय

इंग्लंड क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजला लॉर्ड्स ग्राउंडवर झालेल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ११४ धावांनी पराभूत केले. हा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने १८८ कसोटीत ७०४ विकेट्स घेतल्या.

Kolhapur Live Updates: संभाजीराजे छत्रपती विशाळगडावर जाण्यावर ठाम, पोलीस प्रशासनाची तातडीची बैठक

संभाजीराजे छत्रपती विशाळगडावर जाण्यावर ठाम आहेत. त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर पोलीस प्रशासनाची तातडीची बैठक बोलावली आहे. प्रशासनातर्फे आज देखील संभाजीराजे यांनी विशाळगडावर आंदोलनासाठी जावू नये यासाठी विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. आज सायंकाळपर्यंत संभाजीराजे कोल्हापुरात येणार आहेत.

Amit Shah Live Updates: केंद्राची मोठी घोषणा! 25 जून 'संविधान हत्या दिवस' म्हणून जाहीर

केंद्र सरकारने २५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. २५ जून १९७५ रोजीच तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारने भारतात आणीबाणी लागू केली होती. त्यामुळेच मोदी सरकारने या दिवसाला संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केले.

Central Railway Live Update : मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकात रेल्वे रुळाला तडे

मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकात रेल्वे रुळाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर, रेल्वे रूळाची तात्पुरती डागडुजी करून धिम्या मार्गावरून लोकल सेवा सुरू करण्यात आली.

Nashik Live Update : सिन्नरमध्ये भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. सिन्नरच्या यशवी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या कारखान्यावर धाड टाकून भेसळयुक्त पनीरचा साठा नष्ट करण्यात आला आहे. तब्बल 314 किलो भेसळयुक्त पनीरचा साठा अन्न आणि औषध प्रशासनाने नष्ट केला आहे.

Mumbai Bengluru Highway Live : बेंगळूरु मुंबई महामार्गाजवळ अनधिकृत हॉटेल, दुकानांवर कारवाई

अनधिकृत हॉटेल, दुकानांवर कारवाई
अनधिकृत हॉटेल, दुकानांवर कारवाई sakal

बेंगळूरु मुंबई महामार्गाजवळ पाषाण येथील अनधिकृत हॉटेल, दुकानांवर बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.

मुलांच्या लिव्ह इनची आई- वडिलांनाही मिळणार माहिती

उत्तराखंडचे नियम आणि अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष शत्रुघ्न सिंह यांनी तज्ज्ञ समिती समान नागरी संहिता उत्तराखंडचा अहवाल जाहीर केला. त्यात त्यांनी म्हटलं, 'लिव्ह-इन नातेसंबंधांची नोंदणी करण्यासाठी एक प्रणाली तयार करण्यात आली आहे. 18 ते 21 वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांनाही याची माहिती दिली जाईल.आतापर्यंत जे मुद्दे गोपनीय ठेवण्यात येत होते मग तो विवाह, घटस्फोट यांच्याशी संबंधित असेल किंवा लिव्ह-इन, आम्ही सगळ्याचा डेटाबेस तयार करत आहोत. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीकडून लोकांच्या गोपनीयतेचे उल्लंघन होणार नाही.

Worli Hit And Run Case Live: राज्य उत्पादन शुल्क विभागाची टीम मालाडच्या साईप्रसाद बारवर

राज्य उत्पादन शुल्क विभागाची टीम मालाडच्या साईप्रसाद बारमध्ये पोहोचली आहे. वेळेचं पालन न करता मिहिरला बिअर दिल्याचं समोर आल्यास या बारवरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. बार मधील सीसीटीव्ही फुटेज ची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी पाहणी करणार आहेत. याच बार मधून मिहिर शहाने बिअरचे चार टिन विकत घेतले होते. स्ट्राँग बिअरचे चार टिन विकत घेऊन मिहिर शहा लाँग ड्राईव्हला निघाला होता. परतीच्या प्रवासात मिहिर च्या भरधाव BMW ने कावेरी नाखवा यांना गाडीखाली चिरडलं होतं.

Crime News Live updates : 17 किलोच्या गांजासह 13 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या संयशीत ट्रकची कारधा पोलिसांनी झडती घेतली असता ट्रकमध्ये तब्बल 17 किलोचा गांजा आढळून आला असून याची किंमत 2 लाख 60 हजार आहे. ट्रकसहीत असा 13 लाख 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी कारधा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाई सुरू आहे.

Pawan kalyan Live : 8 वर्षीय मुलीवर बलात्कार; आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा आक्रोश

8 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केली जाते हे वाचून मला खूप मोठा धक्का बसला गुन्हेगारही अल्पवयीन आहेत, तरुण मन भ्रष्ट होत आहे, अनेक कारणांमुळे बिघडत आहे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले.

Anant Ambani and Radhika Merchant Wedding LIVE : नायजेरियन रॅपर 'रेमा' अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी मुंबईत दाखल

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. या भव्य लग्नसोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाने भारतासह परदेशातील बड्या मंडळींना आमंत्रित केलं आहे. नायजेरियन रॅपर आणि गायक-गीतकार, रेमा अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी मुंबईत दाखल

RSS Live Update : RSSच्या अखिल भारतीय "प्रांत प्रचारक बैठकीला" झारखंडमधील रांची येथे सुरुवात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीला आज झारखंडमधील रांची येथे सुरुवात झाली असून ही सभा 14 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि संघटनेचे इतर अधिकाऱ्यांनी उपस्थिती दाखवली.

Dwarka Police Live : जामनगर येथील एकाच कुटुंबातील चौघांनी भानवड येथे संपवले जीवन

जामनगर येथील एकाच कुटुंबातील चौघांनी बुधवार १० जुलै रोजी भानवड येथे जीवनयात्रा संपवली. दोघांना अटक करून पुढील तपास सुरू आहे असे द्वारका पोलीसांनी सांगितले.

Technology Live Update : अ‍ॅपल कंपनीने भारतासह ९७ देशातील वापरकर्त्यांना दिली 'ही' चेतावणी

अ‍ॅपल कंपनीने त्यांच्या वापरकर्त्यांना पेगासससारख्या स्पायवेअरच्या हल्ल्याविषयी सतर्क केले आहे. या हल्ल्याद्वारे तुमचा फोन पूर्णपणे हॅक होऊ शकतो. अ‍ॅपलने गेल्या दहा महिन्यांत दुसऱ्यांदा वापरकर्तांना अशा हल्ल्याविषयी इशारा दिला आहे.

Virendra Sachdeva Live : केजरीवालांच्या जामिनावर काय बोलले दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा?

आदेश येऊ द्या. अरविंद केजरीवाल यांना सर्व प्रकरणांमध्ये जामीन मिळालेला नाही. आप सरकार दिल्लीतील वीज बिल वाढवण्याचा डाव आखत आहे, असेही वीरेंद्र सचदेवा म्हणाले.

MLC Election Live : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानभवनात दाखल

आज 11 जागांसाठी MLC निवडणूक होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात आले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी जय्यत तयारी केली आहे.

Arvind kejriwal Bail Live Updates: ईडी, सीबीआयकडे पुरावे आहेत - भाजप नेते आर. सिंग

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर भाजप नेते आर. सिंग म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे, मात्र खटला फेटाळला नाही, त्यांच्याविरुद्ध खटला चालेल. ईडी, सीबीआयकडे पुरावे आहेत आणि पुराव्याच्या आधारेच खटला पुढे जाईल."

Arvind kejriwal Bail Live Updates: अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने दिला अंतरिम जामीन, पण तुरुंगातून बाहेर येण्यात अडचण

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले आहे. अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेला आव्हान दिले होते. ईडीने अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

Valmiki Corporation Scam Live Updates:  वाल्मिकी महामंडळ घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते बी. नागेंद्र यांना ईडीने घेतले ताब्यात

कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळ लिमिटेडमधील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या दोन दिवसांपासून ईडीचे छापे सुरू आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेने माजी राज्यमंत्री बी नागेंद्र आणि काँग्रेसचे आमदार बसनागौडा दड्डल यांच्या घरावर छापा टाकला होता. या प्रकरणी काँग्रेस नेते बी. नागेंद्र यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.

Saurabh Bharadwaj Live Updates: ज्या ठिकाणी तापमान 52 अंशांवर पोहोचले आहे, त्या ठिकाणी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अधिकाधिक झाडे लावावीत

दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, "ग्रेटर कैलास आणि आसपासच्या शाळांमधील इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी जहानपनाह एन्क्लेव्ह येथे वृक्षारोपण करण्यासाठी येथे आले आहेत. हा अनुभव त्यांच्यासोबत कायम राहील आणि त्यांना विशेषतः दिल्लीतील झाडांचे महत्त्व समजेल. "ज्या ठिकाणी तापमान 52 अंशांवर पोहोचले आहे, त्या ठिकाणी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अधिकाधिक झाडे लावावीत... जास्तीत जास्त झाडे लावण्याचा आमचा प्रयत्न आहे, हा उपक्रम सातत्याने सुरू आहे."

Anant Ambani, Radhika Merchant Wedding Live Updates: आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव पाटणा विमानतळावरून मुंबईला रवाना

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव पाटणा विमानतळावरून मुंबईला रवाना झाले.

Mumbai Rains Live Updates: मुंबई शहरासह उपनगरात पहाटेपासून मुसळधार पाऊस

मुंबई शहरासह उपनगरात पहाटेपासून मुसळधार पाऊस ; सायन, दादर, अंधेरी इथं सखल भागात पाणी साचलं.

Maratha Reservation Jalna live : मनोज जरांगेंच्या होमग्राउंडवर शांतता रॅलीची जय्यत तयारी; रॅलीसाठी 400 पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज त्यांच्या होमग्राउंडवर म्हणजेच, जालन्यात शांतता रॅली होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून शांतता रॅलीची जय्यत तयारी करण्यात आलीये. 5 हजार झेंडे आणि शेकडो बॅनरमुळे शहर भगवेमय झाले असून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Amravati live : 'त्या' दोन चिमुकल्यांचा बळी विषबाधेतून नाही, तर कॉलरामुळे..; पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर

अमरावती जिल्ह्यातील विरूळ रोंघे या गावात पाच तारखेला दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्या मुलींना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, पोस्टमार्टम अहवाल समोर आल्यानंतर त्या मुलींना कॉलराची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. मात्र, त्यानंतर गावांमध्ये विविध उपाययोजना कराव्या, यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतला आदेश दिले. मात्र, गावात कोणत्याही प्रकारची उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

Bihar Rain live : बिहारमध्ये वीज अंगावर पडून 22 जणांचा मृत्यू

पाटणा : बिहार राज्यात आतापर्यंत पावसादरम्यान वीज पडून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मधुबनीमधील सहा, पाटणा आणि औरंगाबादमधील प्रत्येकी चार, सुपौलमधील दोन, जमुई, गया, कैमूर, नालंदा, गोपालगंज आणि बेगुसरायमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बहुतेकजण पावसाळ्यात भात लावणे, सरपण गोळा करणे आणि गुरे चरण्यात गुंतले होते.

Nepal Landslide live : नेपाळमध्ये भूस्खलन; 63 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन बस त्रिशूली नदीत गेल्या वाहून

काठमांडू : नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना घडलीये. मध्य नेपाळमधील मदन-आशीर महामार्गावर भूस्खलन झाल्यामुळे 63 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. दोन्ही बसमध्ये चालकासह एकूण 63 प्रवासी होते.

Andheri Subway Rain live : मुसळधार पावसामुळे अंधेरी सब वे पाण्याखाली

मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात देखील झाली आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा एकमेव अंधेरी सब वे हा देखील पाण्याखाली गेला असून वाहतूक पोलिसांनी सब वे नागरिकांनी वाहनांना ये-जा करण्यासाठी बंद केला आहे. इथे क्लिक करा

Shahapur Rain live : शहापुरातील आदिवासी पाड्यात घर कोसळले, 5 जण जखमी

खर्डी : शहापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाल्याच्या घटना तालुक्यातील गाव पाड्यात घडत आहेत. तानसा धारणांजवळील अघई येथील एका आदिवासी पाड्यात काल रात्री 9.39 च्या सुमारास घरात कुटुंब चर्चा करत बसले असतांना अचानक त्यांच्या अंगावर घर कोसळून घरातील 5 जण जखमी झाले आहेत. इथे क्लिक करा

Kalyan Dombivli Rain live : कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर कमी

कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात आज पहाटेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, काही वेळातच पावसाने उघडीप घेतली. कल्याण-डोंबिवलीत पावसाला जोर नसला, तरी सकाळपासून पावसाची रिप रिप सुरु आहे. अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळताहेत.

Central Railway Local live : मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिट उशिराने धावताहेत

मध्य रेल्वेच्या लोकल १५-२० मिनिट उशिराने धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईत सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

Navi Mumbai Rain live : नवी मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात

नवी मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. कालपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाची पहाटे जोरदार बॅटिंग. जोरदार पावसामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झालेत. दादर, परळ, भायखळा भागातही सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या शिवाय, मुंबईसह उपनगरात देखील पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालीये. दादर, हिंदमाता, परेल, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, वर्सोवा, मालाड, कांदिवली, बोरिवली या भागात पहाटेपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे.

Agniveer Army live : माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा गृह मंत्रालयाचा निर्णय

Breaking Marathi News Updates 12 July 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)- ३ सरकारच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प येत्या २३ तारखेला सादर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थतज्ज्ञांशी चर्चा केली. शिवाय, मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बहुचर्चित दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आमदार नीतेश राणे यांना शुक्रवारी (ता. १२) चौकशीसाठी बोलाविले आहे. पोहाळे तर्फ आळते (ता . पन्हाळा) येथील जोतिबा देवस्थानच्या घोटीचा माळ, लेण्याच्या खड्या या ठिकाणी असणाऱ्या जमिनीत सपाटीकरण करण्याचे काम थांबविण्याचे आदेश भारतीय पुरातत्त्व मुंबई सर्कल विभागाने संबधित ठेकेदाराला दिले आहेत. याशिवाय, देशभरातली वातावरणात बदल झाला असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.