उद्या सकाळी साडे दहा वाजता षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ उद्या मुंबईत होणाऱ्या मेळाव्यातून फुटणार आहे..शहरात अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली.दुपारनंतर जोरदार पाऊस झाला .बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सही रे सही या नाटकाचा ४ हजार ४४४ वा प्रयोग रंगणार आहे. हे नाटक पाहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. . मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने सिमेंट वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीह जीवितहानी झाली नाही. चालकाला किरकोळ दुखापत झाल्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. PM मोदींनी दिल्लीती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी खेळाडूंचे कौतुक देखील केले. .कोलकाता आरजी कर मेडिकल कॉलेजमधील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तपास आता सीबीआय करत आहे. सीबीआयच्या टीमने गुरुवारी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून त्यानंतर ते कोलकातामधील ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत..दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त अंबाझरी तलावात जलतरणपटूंनी तलावाच्या मधोमध जाऊन झेंडावंदन केलं. या तलावात जलतरणपटू 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला नित्यनियमानं तलावाच्या मधोमध जाऊन झेंडावंदन करतात आणि राष्ट्रगीत म्हणत त्याची सांगता करतात. यावेळी मोठ्या प्रमाणात जलतरणपटू अभियानामध्ये सहभागी होतात नागपुरातील अंबाझरी तलावात झेंडावंदन करण्याची ही अनेक वर्षाची परंपरा सुरू आहे..सोलापूर : लाडकी बहीण योजना ही एक पॉलिटिकल स्टंटबाजी आहे. भाजपची मानसिकता ही नेहमीच महिलांच्या विरोधातली राहिली आहे, त्यामुळे निवडणुकीनंतर लाडकी बहीण ही कधीही सावत्र होण्याची शक्यता आहे, असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहिण योजनेबाबत केला..राजकारण्यांकडून फरश्या अपेक्षा ठेऊ नयेत एवढंच असेल तर मलाच द्या, त्यापेक्षा मलाच जबादरी द्या मला काही हरकत नाही असे राज ठाकरे म्हणाले. .समृद्धी महामार्ग येत्या डिसेंबरला पुर्ण खुला हाणार आहे. .पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही आनंद बोस यांनी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये पोहचले आहेत. यावेळी त्यांनी हॉस्पिटलमधील आंदोलक डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. .कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात पाणीपुरवठा संस्थेसाठी उभारण्यात आलेल्या सोलार पॅनलची चौकशी करण्याची मागणी करत एका तरूणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. या तरूणाचे नाव कृष्णात भीमराव पाटील असे आहे. तसेच, त्याने सोलर पॅनेलच्या प्रकरणात सरपंच आणि ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेताना, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे. .राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबईच्या कार्यालयात ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थिती लावली आहे. .जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी शासनाने नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आता २१ दिवसांत अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रमाणपत्रासाइ ३० दिवसांनंतर अर्ज केल्यास त्याला जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची मंजुरी बंधनकारक घ्यावी लागणार आहे. या बदलामुळे नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत..राष्ट्रपतींकडून देण्यात येणाऱ्या पोलिस पदकांच्या मानकऱ्यांची नावे बुधवारी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला घोषित करण्यात आली असून त्यात गडचिरोली पोलिस दलातील १८ जणांचा समावेश आहे. यातील १७ जणांना शौर्यपदक, तर एका अधिकाऱ्याला गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील १७ जणांना राष्ट्रपती शौर्यपदके मिळाली असून ते सर्वच्या सर्व गडचिरोली पोलिस दलातील आहेत. २०१७ मध्ये कापेवंचा-कवठाराम येथे, २०१९ मध्ये मोरमेट्टा येथे व २०२२ मध्ये कापेवंचा-नैनेर येथे माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकींमध्ये चार माओवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली पोलिस दलास यश प्राप्त झाले होते. .राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार प्रा. राजू तोडसाम यांच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. तोडसाम यांच्यासह सहा जणांना शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, मालमत्ता चोरून नेल्याप्रकरणी केळापूर (जि. यवतमाळ) सत्र न्यायालयाने डिसेंबर २०२२ मध्ये तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या दोषसिद्धीला स्थगिती मिळावी म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने तो फेटाळला असून निवडणूक लढविण्यासाठी त्यांना स्थगिती मिळविणे आवश्यक आहे..राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनकड यांच्याविरुद्ध महाभियोग दाखल करण्यासाठी विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. महाभियोगाच्या प्रस्तावाचा मसुदा तयार झाला असून हा मसुदा बिनचूक असावा, कायदेशीर त्रुटीमुळे तो फेटाळला जाऊ नये यासाठी तीन वरिष्ठ विधिज्ञांचा सल्ला घेतला जात असल्याचे समजते. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनकड यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याची जय्यत तयारी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने केली आहे. या महाभियोगासाठी राज्यसभेतील ८७ विरोधी खासदारांनी होकार दर्शविला आहे. .प्रो कबड्डी स्पर्धेच्या ११ मोसमासाठी उद्या आणि परवा खेळाडूंचा लिलाव होत आहे. वर्षागणिक बोली रकमेत वाढ होत असली तरी यंदा विक्रमी किंमत मिळण्याची शक्यता कमी आहे. तरीही पवन शेरावत याला सर्वाधिक भाव मिळणारे हे जवळपास निश्चित आहे..गतवर्षी मुदतीच्या आत ई-पीक पेरा नोंद केली. पिकाची सातबारावर नोंदही आली. मात्र, कापूस, सोयाबीन मदतीच्या यादीत नाव नसल्याने गेवराईतील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. कपाशी, सोयाबीन सातबारावरील नोंद पाहून शासनाने मदत देण्याची मागणी होत आहे..आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे हे उमेदवार असतील, अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी आज येथे केली. उमेदवारीसाठी कोणाकडे जाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महायुतीकडून सन्मानाने उमेदवारी मिळाल्यास ती स्वीकारली जाईल, अन्यथा इचलकरंजीसह तीन विधानसभा क्षेत्रात स्वत:च्या ताराराणी पक्षातर्फे उमेदवार उभे करण्याचीही घोषणा आमदार आवाडे यांनी केली. जिथून आलो तिथे परत जाणार नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्याच्या चर्चेलाही पूर्ण विराम दिला आहे. महायुती मधील भाजप शिवसेना शिंदे गट अथवा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी स्वीकारणे तयारी असल्याचे आवाडे यांनी स्पष्ट केले आहे..भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आज देशभर साजरा केला जात असतानाच, आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही तितक्याच देश भक्तीने हा उत्सव साजरा केला जात आहे.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिरवा ,पांढरा आणि केशरी या तीन रंगाच्या फुलांची आकर्षक अशी सजावट केली. यासाठी झेंडू,तुळस आणि गुलछडी या पाना फुलांचा वापर करण्यात आला आहे. तिरंग्याची सजावट केल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्ती बरोबर देशभक्तीचा माहोल तयार झाला आहे. देवाचे प्रवेश द्वार, चौखांबी,सोळखांबीसह मंदिरात फुलांची सजावट केली आहे. .सातारा : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सातारा या कार्यालयास ISO 9001:2015 मानांकन प्राप्त झाले. सदरचे मानांकन प्रामुख्याने अधिकारी व कर्मचारी यांना बसण्याची उत्तम व्यवस्था करणे, कार्यालयातील अभिलेखांचे वर्गीकरण फरणे, अभिलेख कक्षात अभिलेखांची शाखानिहाय सुव्यवस्थित मांडणी करणे, कार्यालयाची निर्वामत साफसफाई, कार्यालयाचे सुशोभीकरण, प्रत्येक मेजनिहाय सहा गढ्ढे पध्दत, प्रत्येक शाखेची Standard Operating Procedure (मानक कार्यप्रणाली) तयार करणे, शासनाकडील सूचनानुसार प्रसिध्द करावयाचे माहितीदर्शक फलक लावणे इ बाबींच्या पूर्ततेच्या अधीन राहून केले जाते. एकदंरीत यामुळे कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतासाठी कार्यालयास सेवा देणे अधिक सोईचे होणार आहे..कोल्हापूर : राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी शनिवारी (ता. १७) महामोर्चा होणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील खासगी शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केले. सर्व शिक्षक आणि सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. महाराष्ट्र शासन सुधारित पेन्शन योजनेच्या नावाखाली फसवी पेन्शन योजना सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या माथी मारण्याचा प्रकार सुरू आहे. पंधरा वर्षांपासून त्याला विरोधासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र, दखल घेतली नसल्याने महामोर्चा निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले..कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाहेरील परिसरात १०० मीटरपर्यंतची घालण्यात आलेली जमावबंदीची अट करवीर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी शिथिल केली..बेळगाव : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरची अत्याचार करून हत्त्या केल्याच्या घटनेने वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. केएलई हायर एज्युकेशन अॅन्ड रिसर्चच्या जे. एन. मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टर संघटनेने शहरातून निषेध मोर्चाने केंद्र सरकारच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले..नवी दिल्ली : भूस्खलनामुळे हादरलेल्या केरळमधील वायनाड जिल्ह्यात एक ते दोन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून २४ तासांमध्ये १२ ते २० सेमी पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे. एर्नाकुलम, थ्रिसूर आणि कन्नूर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, लक्षद्वीपमधील काही ठिकाणांवर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. .चिक्कोडी : विसर्ग कमी अधिक करत अखेर आलमट्टी भरण्याच्या मार्गाने जात आहे. बुधवारी धरणात १२१.७८२ टीएमसी (९८.९४ टक्के ) साठा झाला आहे. आता केवळ दीड टीएमसी साठा झाल्यास धरण शंभर टक्के म्हणजेच १२३ टीएमसी भरणार आहे. दरम्यान बुधवारी संध्याकाळी आवक आणखी कमी झाली असून, २९ हजार क्युसेक पाणी वाहून येत आहे. विसर्ग नियमित वीज निर्मितीसाठी १५ हजार क्युसेक सुरू आहे..नवी दिल्ली : वरिष्ठ आयएएस अधिकारी गोविंद मोहन यांची नवे केंद्रीय गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते आता अजयकुमार भल्ला यांची जागा घेतील. मोहन हे सध्या सांस्कृतिक मंत्रालयामध्ये सचिव म्हणून काम करत असून त्यांची लवकरच गृहमंत्रालयामध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी म्हणून नियुक्ती करण्यात येईल. केंद्रीय समितीने मोहन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले होते..Latest Marathi Live Updates 15 August 2024 : आज 15 ऑगस्ट, भारत आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंतेत असलेले अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान चांगलेच नाराजीनाट्य रंगल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर येथील अल्पसंख्याक, विशेषत: हिंदू समुदायावर जमावाकडून सुरू झालेले हल्ले अद्यापही थांबले नसल्याचे स्पष्ट झाले. सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) संचालक म्हणून केंद्र सरकारने भारतीय महसूल सेवेचे अधिकारी राहुल नवीन यांची नियुक्ती केली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.