संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली असून या सभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे आणि त्यांनी केंद्राशी संपर्क साधून केंद्राला प्रस्ताव पाठवावा. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करू शकतो का, असा प्रस्ताव आम्ही मांडला आहे, असं सत्तारांनी सांगितलं.
धुळे तालुक्यातील कापडणे परिसरामध्ये संध्याकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाकरे गटाच्या वतीने आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाचे काही प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये ठाकरेंची ताकद असलेल्या विधानसभेच्या जागांवर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणूक लढवताना ठाकरे गट ज्या मतदारसंघांमध्ये आपली ताकद आहे ते मतदारसंघ आपल्याकडे टिकवण्यासाठी आग्रही असेल. 120 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. महाविकास आघाडीमध्ये समसमान वाटप झाल्यास 90 ते 100 जागांवर ठाकरे गट आपले उमेदवार देतील, अशी शक्यता आहे.
शिळफाटा येथे सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे नवी मुंबई परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. पीडित मयत महिलेला न्याय मिळावा यासाठी आता ग्रामस्थ रस्त्यावर उतरत असून घटनेचा निषेध व्यक्त करतायत. वाशी गावातील शेकडो नागरिकांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीय. यावेळी पोलीस प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
बीडच्या माजलगावमध्ये जोरदार पाऊसाने हजेरी लावलीय. यामुळे माजलगाव शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शहरातील बसस्टँड परिसर, शिवाजी महाराज चौक, मोंढा परिसर यासह अन्य परिसरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात इचलकरंजीकर आक्रमक झाले आहेत. हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत इंडिया आघाडीची निदर्शने झाली. इचलकरंजी हे पाकव्याप्त काश्मीर आहे, असं विधान करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यातआली.
पावसाळी पर्यटनाचा रायगडमध्ये आणखी एक बळी गेला असून माणगाव तालुक्यातील कुंभे येथील धरणात तरुणी बुडाली आहे
मुंबई उत्तर-पश्चिम मधून शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाच्या अमोल किर्तिकरांनी यांनी याचीका दाखल केली आहे
सीबीआयने NEET-UG पेपर लीक प्रकरणात पंकज कुमार सिंग आणि राजू सिंग यांना अनुक्रमे पाटणा आणि हजारीबाग येथून अटक केली. पंकज हा सीव्हील इंजिनीयर आहे आणि हजारीबागमधून पेपर्स लोखंडी ट्रंकमध्ये घेऊन जात असताना त्याने ते पेपर लीक केल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात मृत भाविकांना पाच लाख रुपये सरकार तर्फे मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमी रुग्णांवर राज्य सरकार मार्फत मोफत उपचार करण्यात येत आहेत. प्रशासनाला रुग्णांची सर्व प्रकारची काळजी घेण्यास सांगण्यात आले. अपघाताची सखोल चौकशी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर बसची ट्रॅक्टरला धडक बसून खड्ड्यात पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
पूजा खेडकरला जन्मठेप व्हायला पाहिजे. हायकोर्टाचे निकाल बदलायला लागलेत आता राहिलंय काय? UPSC सारखी संस्था जर अशी वागत असेल तर या युपीएससीवर देखील सुद्धा दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. तातडीनं तिला पदावरुन बाहेर काढून तिला जन्मठेपेपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पुन्हा असा कोणी गुन्हा करेल अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती द्या तसंच जिल्ह्यात सुरु असणाऱ्या कामांच्या सद्यस्थितीचा अवाहल सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले आहेत.
बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.- हवामान विभाग
विशाळगड हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेते नसीम खान यांच्या अध्यक्षतेखाली आज एक शिष्टमंडळ आज दुपारी 4 वा. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक कार्यालयात भेट घेऊन हिंसाचार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. या शिष्टमंडळात माजी खा. भालचंद्र मुणगेकर, आ. भाई जगताप, राजेश शर्मा यांचा समावेश आहे.
मुंबई पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने मुंबई ठाणे आणि रायगड परिसराला ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र, आज सकाळी सूर्यदर्शन झाल्यामुळे पाऊस पडेल की नाही, असे वाटत असतानाच आता मागील पंधरा मिनिटांपासून मुंबई पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरिवली, या परिसरात जोरदार पाऊस पडतोय.
"महाराष्ट्र शासन" नाव आणि अंबर दिवा खासगी गाडीवर लावल्यामुळे एक अधिकारी अडचणीत आल्या आहेत, तर आज सर्रासपणे लोक आमदार, खासदार, पोलीस, पत्रकार एवढचं काय तर न्यायाधीश असे नावे लिहून खासगी गाड्या घेऊन फिरतात. काही पोलीस तर गाडीच्या समोरच्या डॅशबोर्ड वर आपली टोपी ठेवतात. हे VIP कल्चर नाही तर काय आहे ?
'आम्ही पाच वर्षांनी तेलंगणातील काँग्रेस सरकार पाडू, पाच वर्षांनी २०२८ मध्ये जेव्हा जनता मतदान करेल, तेव्हा आम्ही सध्याच्या सरकारचे काम पुढे करू, मग जनता ठरवेल कोण टिकेल ते', असे विधान तेलंगणाचे माजी मंत्री आणि बीआरएसचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनी एएनआयशी बोलताना केले.
दोन्ही न्यायाधीशांच्या नियुक्तीला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. सरन्यायाधीश DY चंद्रचूड गुरुवारी या दोन्ही न्यायधिशांना शपथ देणार आहेत. न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आले आहे. नियुक्तीनंतर न्यायमूर्ती सिंग हे मणिपूरचे पहिले व्यक्ती असतील जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बनतील. (Supreme Court Two judges appointed to Supreme Court top court to regain full strength)
विशाळगडकडे निघालेल्या पत्रकारांची पोलिसाकडून अडवण्यात आले आहे. त्यामुळे पत्रकार अक्रमक झाले. लोकशाहीचा चौथा स्तंभ आसलेल्या माध्यम प्रतिनिधींना रोखल्याने वाद झाला. पत्रकार विशाळगडकडे जाण्यावर ठाम आहेत.
चाकू आणि तलवारी घेवून जाणाऱ्याना पोलिसांनी विशाळगडकडे सोडले आहे. पण आम्ही कागद आणि पेन घेवून जात असताना आमची अडवणुक का करता, असा सवाल पत्रकारांनी केला आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्खु यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याची सुख्खु यांनी माहिती दिली.
गौरी लंकेश हत्या प्रकरणात तीन आरोपी अमित दिघावकर, सुरेश आणि नवीन कुमार या तिघांना कर्नाटक हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. हे आरोपी मागच्या सहा वर्षांपासून जेलमध्ये होते.
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, सुरेश रैना, युवराज सिंग आणि गुरकीरत मान यांच्याविरोधात इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये अपंगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून चांगलाच पाऊस सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या गौताळा अभयारण्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. या जोरदार पाऊस झाल्याने ऐतिहासिक सीताखोरी धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. सातमाळा डोंगररांगातून नैसर्गिक झरे, ओढे ओसंडून वाहते झाले. परंतु, १५ सप्टेंबरपर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे.
पांढरे पाणी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना विशाळगड परिसरात जाण्यास केला मज्जाव
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २०, २१ व २२ जानेवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक १६ जुलै, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. उपरोक्त निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठ्यर्थ मुलाखतीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलाविण्यात येणार आहे.
जोशीमठ मलारी पुलाजवळ मुसळधार पावसामुळे ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुराची एसडीआरएफ टीमच्या सुरक्षेने सुटका केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट (x) केले की जम्मू आणि काश्मीर डोडा येथे दहशतवाद्यांचा हल्ल्यात शूर आणि धाडसी भारतीय सैन्याच्या जवानांना गमावल्याने खूप दुःख झाले आहे. राष्ट्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
ओडिशा येथील भगवान जगन्नाथ मंदिराच्या रत्नभांडाराचे दरवाजे ४६ वर्षांनी खुले झाले. पुरी जगन्नाथ मंदिराच्या 'रत्न भंडार'च्या उद्घाटनाबाबत मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी सांगितले आहे की रत्न भंडार उघडण्याच्या संपूर्ण प्रक्रीया तीन भागात विभागणी करण्यात आली आहे.
विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख आणि बिहारचे माजी मंत्री मुकेश साहनी यांचे वडील जितन साहनी यांची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी दरभंगा जिल्ह्यातील बिरौल येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला.
अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्यातील मोतीबाग या पवार यांच्या निवासस्थान गेल्या होत्या. पवार यांच्याशी एक तास चर्चा केल्यानंतर सुनत्रा पवार मोदीबागेतून रवाना झाल्या आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी फुटल्यानंतर काल छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा पवार यांची भेट घेतली होती. आणि आज सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
आमदार परत गेले तरी नव्यांना संधी देऊ असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी केलं आहे. पक्षाच्या बैठकीमध्ये औपचारिक गप्पांमध्ये त्यांनी असं वक्तव्य केल्याचं सांगितलं जातं.
प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचा अहवाल पोलीस महासंचालकांनी मागितला आहे. त्यांची केंद्रीय समितीमार्फत लवकरच चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
दरभंगा/पाटणा : विकासशील इंसान पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी यांचे वडील जीतन साहनी यांची दरभंगा येथे हत्या करण्यात आली होती. जीतन साहनी यांची त्यांच्या घरात हत्या करण्यात आली. पोलिसांना जीतन साहनी यांचा मृतदेह घरात सापडला.
कऱ्हाड : शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी असेल तर आनंदच आहे. जातीजातीत तेढ निर्माण होणे, हे योग्य नाही. मात्र, ते तेवढ्यासाठीच भेटले का? हा प्रश्न आहे. सध्या महायुतीत बरीच गडबड सुरू आहे. त्यामुळे महायुतीचे बरेच नेते आता आमच्या संपर्कात येत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी येथे केला. इथे क्लिक करा
नागालँड सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेनुसार, राज्य सरकारने केंद्र सरकारच्या त्या निर्णयाला आव्हान दिले होते, ज्या अंतर्गत लष्कराच्या ३० जवानांविरुद्ध खटला चालवण्यास बंदी घालण्यात आली होती. नागालँड पोलिसांनी दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी केलेल्या कारवाईदरम्यान १३ नागरिकांची हत्या केल्याप्रकरणी या सैनिकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
अमेरिकेतील रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये पुरेशी प्रतिनिधी मते मिळवून डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार बनले आहेत. अशाप्रकारे ट्रम्प तिसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. ट्रम्प 2016 मध्ये जिंकले होते, पण 2020 मध्ये जो बायडेन यांच्यासमोर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. नोव्हेंबरमध्ये त्यांचा पुन्हा एकदा जो बायडेन यांच्याशी सामना होणार आहे. ट्रम्प हे अनेक महिन्यांपासून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार होते. मिलवॉकी येथील पक्षाच्या अधिवेशनात उपस्थित असलेल्या प्रतिनिधींची मते मिळवून सोमवारी ते अधिकृतपणे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार बनले.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमवारी डोडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच जवान गंभीर जखमी झाले, त्यापैकी चार जवानांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात लष्कराचा एक अधिकारीही शहीद झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी काश्मीरमधील एका दहशतवादी संघटनेने घेतली आहे. इथे क्लिक करा
कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यासाठी आंदोलने करण्यात आली होती. कालपासून ही अतिक्रमणे काढण्यास प्रशासनाने सुरुवात केली. पहिल्या दिवशी ७० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. इथे क्लिक करा
नवी दिल्ली : खूनप्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिक्षेतून देण्यात आलेली सूट कायद्याच्या कात्रीत सापडण्याची शक्यता आहे. गवळीला देण्यात आलेल्या सुटीला आक्षेप घेत महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून न्यायालयाने त्यावर सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली आहे. इथे क्लिक करा
नवी दिल्ली : भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिस्री यांनी आज विनय क्वात्रा यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. मिस्री हे चीन आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांतील तज्ज्ञ समजले जातात. १९८९ च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या मिस्री यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा उप-सल्लागार ही जबाबदारी होती.
Breaking Marathi News Updates 16 July 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह यावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. आदित्य ठाकरे यांचा आज कर्जतमध्ये मेळावा आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर यांना ऑरेंज अर्लट हवामान खात्यानं दिलाय. तर, राष्ट्रवादी काँग्रेसची आज पत्रकार परिषद होणार आहे. शिवाय, शरद पवार यांचा पुण्यात बालगंधर्वला कार्यक्रम आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान रविवारी पायथ्याला गजापूरमध्ये झालेल्या जाळपोळ, तोडफोडीसह घरांवर केलेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी सुमारे ५०० हून अधिक संशयितांवर चार वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय, देशभरात वातावरणात बदल झाला असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.