Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 2 August 2024 : मुख्यमंत्रींचा ताफा जळगाव महामार्गावरून भवन गावाजवळ आला असता भवन गावातील मराठा समाजाच्या नागरिकांनी काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध नोंदवला आहे
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updatesesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर मंदिरात आगीचा भडका

छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर मंदिरात आगीचा भडका उडाल्याची घटना घडली आहे. खडकेश्वर मंदिरातल्या शिवपिंडीवरच भडका उडाला होता. ज्वलनशील पदार्थामुळे ही घटना घडली. भाविक दर्शन घेत असतानाच पिंडीवर भडका उडाल्यामुळे दोन ते तीन भाविक भाजले आहेत.

कायदा करण्याचे काम पार्लमेंटचे आहे- गुणरत्न सदावर्ते

सुप्रीम कोर्टाने आरक्षणाच्या वर्गीकरण संदर्भात दिलेला निकाल हा ढवळाढवळ करणारा असून सविधानाने वेगवेळ्या संस्थांना अधिकार दिलेले आहेत.. कायदा करण्याचे काम पार्लमेंटचे आहे. त्यामुळे हा निकाल पूर्णतः मान्य करण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. एससी, एसटी आरक्षणाच्या निर्णयासंबंधी सदावर्ते यांनी रिट पिटिशन दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे.

आग्रा येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी कायमस्वरुपी परवानगी देण्याची केंद्राकडे मागणी

आग्रा येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी कायमस्वरुपी परवानगी द्या, अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार केंद्राकडे केली आहे. ‘दिवाण-ए-खास’मधील आयोजनासाठी केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद असून केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतिम निर्णयाकडे लक्ष लागून राहिलं आहे.

मिटकरी हल्लाप्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांना अटक

आमदार अमोल मिटकरी निवड झालेल्या भ्याड हल्ला आणि वाहनाच्या तोडफोड प्रकरणात मनसेचे पदाधिकारी सचिन गव्हाळे आणि मनसेचे माजी नगरसेवक राजेश काळे यांना अटक करण्यात आली आहे. अकोल्यातील सरकारी बगीचा जवळून अटक करण्यात आली. आतापर्यंत 7 जण अटकेत. तर तिघांना मिळाला होता जामीन. एका आरोपीचा मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचा हृदय झटक्यानं मृत्यू झाला होता. आतापर्यंत 20 पेक्षा अधिक मनसेच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर झाला आहे. शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. पण आता त्यांना दिलासा मिळाला आहे. पुणे सत्र न्यायालायनं त्यांना जमीन मंजूर केला आहे.

Pune Live: चांदणी चौकातून कोकणात जाणारा हायवे ५ ऑगस्टपर्यंत  बंद

चांदणी चौकातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग 5 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चांदणी चौकातून कोकणात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आदरवाडी आणि डोंगरवाडी (ता. मुळशी) या घाट परिसरातील रस्त्याला अतिवृष्टीमुळं एका बाजूनं तडा गेल्यानं रस्ता खचला आहे. यामुळं गंभीररित्या अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता 5 ऑगस्टपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

मुळशी तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अतिवृष्टी होत आहे. अतिमुसळधार पावसामुळं रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. पिरंगुट घाटात जागोजागी दरडीही कोसळल्या आहेत. चांदणी चौकातून कोकणाकडं जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भुगाव, भुकुम, पिरंगुट, शिंदेवाडी या परिसरामध्ये महामार्गावर गुडघाभर पाणी साचते.

Delhi Live : दिल्ली कोचिंग सेंटर मृत्यू प्रकरणाचा तपास आता CBI कडं 

दिल्लीतील राजिंदर नगर इथल्या कोचिंग सेंटरमध्ये पावसाच्या पाण्यात बुडून युपीएसीच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडं वर्ग करण्यात आला आहे. दिल्ली हायकोर्टानं हा महत्वाचा निकाल दिला आहे.

Sambhaji Nagar Live : संभाजीनगरमध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तारांविरोधात बॅनरबाजी 

छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार विरोधात बॅनर लागले. ज्याला लावायची होती ईडी त्याला दिली मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची शिडी असा मजकूर असलेले बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर दौऱ्यावर असताना शहरात हे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. या आशयाचे बॅनर शहरातील अनेक प्रमुख चौकात झळकत आहेत. सिल्लोड सोयगाव येथील पीडितांनी हे बॅनर लावल्याचं सांगितलं जात आहे.

Maratha Reservation Live: मराठा आंदोलकांनी दाखवले मुख्यमंत्र्यांचा ताफ्याला काळे झेंडे...

सिल्लोड येथील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जात असताना सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून मराठा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला व घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्रींचा ताफा जळगाव महामार्गावरून भवन गावाजवळ आला असता भवन गावातील मराठा समाजाच्या नागरिकांनी काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध नोंदवला आहे, यावेळी मराठा समाजाचे दत्तात्रय पांढरे, सोमीनाथ कळम, रमेश काकडे आदी सकल मराठा समाजाचे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला आहे.

Kolhapur Flood Update: पुरात ट्रॅक्टर पलटी झाल्याप्रकरणी शोधमोहीम सुरूच, पालकमंत्री मुश्रीफ यांची अकिवाट येथे दुर्घटनास्थळाला भेट

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची अकिवाट येथे दुर्घटनास्थळाला भेट. एनडीआरएफ च्या जवानांकडून घेतली मदत कार्याची माहिती. दत्तवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्घटनेतील जखमींची केली विचारपूस. मृत सुहास पाटील यांच्या पार्थिवाचे घेतले दर्शन. मृताच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी शासकीय मदत करणार.

केंद्रीय एनडीआरएफ पथकासह महाराष्ट्राचे एसडीआरएफ व कर्नाटकचे एसडीआरएफ च्या बोटी शोध कार्यात सहभागी. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासमवेत खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाटगे, अशोकराव माने, विजय भोजे हेही सहभागी.

Mumbai Live: गोरेगावच्या जव्हार नगरमध्ये संशयास्पद अवस्थेत सापडले पती-पत्नीचे मृतदेह

किशोर पेडणेकर यांनी इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या तर पत्नी राजश्री पेडणेकर यांचा घरात सापडला मृतदेह. ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून राजश्री यांची हत्या झाल्याचा संशय गोरेगावच्या जव्हार नगर येथील घटना. गोरेगाव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत सुरू केला तपास

Marathwada Live: घनसावंगी येथे युवा शेतकऱ्यांचे पिक विम्याच्या मागणीसाठी शुक्रवारी जलसमाधी आंदोलन

घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे २०२३ खरीप हंगामातील पीक विम्याची राहिलेली ७५ टक्के रक्कम त्याचप्रमाणे रब्बी हंगाम २०२३ मधील विम्याच्या तक्रारी करूनही न मिळालेली विम्याची रक्कम ताबडतोब देण्यात यावी या मागणीसाठी गुंज बुद्रुक(ता. घनसावंगी)येथील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गोदावरीच्या पात्रात आज जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

Tamhini Ghat Live  : ताम्हिणी घाट खचला २ ऑगस्ट पासून ५ ऑगस्ट पर्यंत वाहतुकीसाठी बंद

रायगड व पुणे जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाटातील रस्ता खचला असल्याने रस्ता दुरुस्तीसाठी 2 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून 5 ऑगस्ट सकाळी 8 वाजेपर्यंत या घाटातून वाहतूक बंद करण्याचे निर्देश पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी काढले.

Pune Live : मुळशी धरणाच्या सांडव्यावरून सुरू असलेला विसर्ग दुपारी २.३० वाजता १३,७११ क्युसेकने हाेणार

मुळशी धरणाच्या सांडव्यावरून सुरू असलेला विसर्ग वाढवून दुपारी २.३० वाजता १३,७११ क्युसेक करण्यात येणार आहे. तर, सायंकाळी ४ पर्यंत १५,२६५ क्युसेक करण्यात येणार आहे. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

Bhajan Lal Sharma Live : भजनलाल शर्मा यांनी जयपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आढावा बैठक घेतली

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जयपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अधिकाऱ्यांसोबत सांगानेर विधानसभेच्या विविध विकासकामांच्या अंमलबजावणी आणि प्रगतीबाबत आढावा बैठक घेतली.

Jitendra Awhad Live Updates: जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपींची ओळख पटली

  • जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ल्या प्रकरण

  • हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींची ओळख पटली सूत्रांची माहिती

  • हल्ला करताना आरोपींनी वापरलेली गाडी डोंगरी पोलिसांनी केली जप्त

  • सर्व आरोपींनी केले मोबाईल फोन बंद

  • फोन बंद असल्याने आरोपीचं लोकेशन ट्रेस करण्यात अडचणी

  • सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू

PM Narendra Modi Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यपालांच्या परिषदेला हजेरी

राष्ट्रपती भवनात आजपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपालांची दोन दिवसीय परिषद आयोजित केली आहे. परिषदेला सर्व राज्यांचे राज्यपाल उपस्थित आहेत

Fake Call Center Bhiwandi Live Updates: एटीएसकडून बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; सरकारची तीन कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

  • एटीएसकडून बोगस कॉल सेंटरचा केला पर्दाफाश.

  • भिवंडी, नालासोपारा भागात एटीएसकडून अनेक ठिकाणी छापे.

  • ४० वर्षीय जाफर बाबू उस्मान पटेलला एटीएसकडून अटक.

  • दहशतवादी कृत्यास मदत करेल असे कार्य केल्याचा आरोपीवर ठपका.

  • भारत सरकारची तीन कोटींची फसवणूक केल्याचा आरोप.

  • ९ सिम बॉक्स, २४६ सिम कार्ड, ८ वायफाय राउटर,१९१ अँटीने, इन्व्हर्टर आणि १ लाखांची रोख रक्कम जप्त.

Rain Live: केदारनाथ मार्गावरून २५०० भाविकांचे रेस्क्यू ऑपरेशन, तर १६ जण बेपत्ता

केदारनाथ खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भाविक तिथे अडकले होते. आता तिथल्या २५३७ प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. तर अजूनही १६ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

Thane Live: ठाण्यातील घोडबंदर रोडवर ट्रॅफिक जॅम संपणार, भुयारी मार्ग, फ्लायओव्हरला मंजुरी

मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन मोठ्या प्रकल्पांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यात ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत भुयारी रस्ता बनवण्याचा एक प्रकल्प असून दुसरा प्रकल्प फाउंटन हॉटेल ते थेट भाईंदर पर्यंत फ्लायओव्हर बनवण्याचा आहे. यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.

Mumbai Nashik Road Live: मुंबई- नाशिक महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई- नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. भिवंडीकरांना इथे खूप त्रास सहन करावा लागतोय. ६ ते ७ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. १५ ते २० मिनिटांच्या रस्त्याला २ तास लागत आहेत. मोठमोठे खड्डे आणि बंद पडलेलय वाहनांचा इतरांना फटका.

Chhagan Bhujbal LIVE: छगन भुजबळ यांच्या विरोधात दत्ता आव्हाड मैदानात उतरण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : विधानसभा निवडणूकीत येवल्यात छगन बुजबळ यांच्या विरोधात दत्ता आव्हाड मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. दत्ता आव्हाड यांनी घेतली शरद पवार यांची भेट घेतली.

Zeeshan Siddiqui live: काँग्रेसचे आमदार झिशान सिद्धिकींवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

काँग्रेसचे आमदार झिशान सिद्धिकी यांच्यावर खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सिद्दीकी यांच्यासह ७ ते ८ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला.

संत ज्ञानेश्वरनगर येथे झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाच्या सर्वेक्षणात अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

झिशान आणि त्याच्या कार्यकर्त्यांवर बेकायदेशीर जमाव जमवून सर्वेक्षणात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे.

Supreme Court live: आमदार अपात्र प्रकरणी ६ ऑगस्टला सुनावणी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्ट ६ ऑगस्टला सुनावणी घेणार आहे.

राष्ट्रपती भवनात आजपासून दोन दिवसीय राज्यपाल परिषद

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात आजपासून दोन दिवसीय राज्यपाल परिषद होणार आहे. आज सकाळी 9.30 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेला सुरुवात होणार आहे. या परिषदेत उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, कृषी मंत्री, माहिती प्रसारण मंत्री, पर्यावरण मंत्री, क्रीडा मंत्री आणि NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी होणार आहेतय

दोन दिवसीय बैठकीत तीन नवे फौजदारी कायदे, उच्च शिक्षणातील सुधारणा, सीमाभाग, आदिवासी भागातील विकास आणि राज्यपालांची भूमिका या मुद्द्यांवर चर्चा होणार असून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन परिषदेसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

Supreme Court live : औरंगाबाद-उस्मानाबाद शहराच्या नामांतर प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली : औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतर प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने उस्मानाबादचे नामांतर 'धाराशिव' तर, औरंगाबादचे नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात दाखल झालेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं.

Rashtrapati Bhavan live : राष्ट्रपती भवनात आजपासून दोन दिवसीय राज्यपाल परिषद

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात आजपासून दोन दिवसीय राज्यपाल परिषद होणार आहे. आज सकाळी 9.30 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेला सुरुवात होणार आहे. या परिषदेत उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, कृषी मंत्री, माहिती प्रसारण मंत्री, पर्यावरण मंत्री, क्रीडा मंत्री आणि NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी होणार आहेत.

Dongri Police live : जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी स्वराज्य संघटनेच्या सरचिटणीसावर गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी नवी मुंबईतून एका व्यक्तीला अटक केली आहे. स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव आणि अंकरीश कदम यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ajit Pawar live : उपमुख्यमंत्री अजित पवार 11 ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे ११ ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार हे पहिल्यांदाच कोल्हापुरात येत आहेत. दरम्यान, या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक रविवारी (ता. ४) पक्षाच्या मार्केट यार्ड येथील कार्यालयात होणार आहे.

Koyna Dam live : कोयना धरणातून आज 50 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार

दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता धरणामध्ये एकूण ८६.१९ टीएमसी ८१.८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून ४०,००० क्युसेक विसर्ग चालू आहे. आज दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून ५०,००० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.

Uttarakhand Weather live : केदारनाथ मार्गावर ढगफुटीसह मुसळधार पाऊस, भूस्खलनात 16 जण बेपत्ता

उत्तराखंड : बुधवारी रात्री केदारनाथ मार्गावर ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 16 जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. केदारनाथ धाममध्ये एक हजार यात्रेकरू अजूनही अडकले आहेत. विविध थांब्यांवर अडकलेल्या 4000 हून अधिक यात्रेकरूंची NDRF, SDRF आणि पोलिसांनी सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी नेलंय. यापैकी 700 जणांची हेलिकॉप्टरने सुटका करण्यात आलीये. गेल्या 24 तासांत राज्यभरात पावसामुळे झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

Puja Khedkar : माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर परदेशात पसार? कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीयेत. दिल्लीच्या पतियाला कोर्टाने त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळल्यानंतर आता पूजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. मात्र यापूर्वी पूजा खेडकर यांनी परदेशात पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. इथे क्लिक करा

Radhanagari live : राधानगरी तालुक्यात पावसाचा पुन्हा जोर

राशिवडे बुद्रुक : राधानगरी तालुक्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू असून भोगावती नदीला पुन्हा महापुराचे स्वरूप आले आहे. शिरगाव पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोन दिवसांपूर्वी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. त्याचे पाणी आता भोगावती परिसरातून करवीर तालुक्याकडे पसरू लागले आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Naresh Mhaske live : खासदार नरशे म्हस्केंसह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

शिंदे गटाचे खासदार नरशे म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावलीये. नरेश म्हस्केंची खासदारकी रद्द करण्यासाठी ठाकरे गटाच्या राजन विचारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीये. एका प्रकरणात नरेश म्हस्के यांना दोषी ठरवलेलं असतानाही निवडणूक लढवल्याबद्दल याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे.

Kolhapur-Ratnagiri Highway live : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अद्याप बंदच!

Latest Marathi Live Updates 2 August 2024 : अनुसूचित जाती (एससी) आणि जमातींच्या (एसटी) प्रवर्गात वर्गवारी करून आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आता राज्यांना देऊ केला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) उमेदवारी रद्द करण्यात आलेली पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज पतियाळा हाऊस न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही अद्याप सुरू झालेली नाही. मनोज जरांगे आज पुण्यातील कोर्टात हजर राहणार आहेत, तर शरद पवार गटाचे आज चित्रा वाघ यांच्याविरोधात मुंबईत आंदोलन होणार आहे. देशभरातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.