Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 20 july 2024 : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथे आजपासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal
Updated on

दहा वर्षीय मुलगा पुरात वाहून गेला

Chandrapur: पुराच्या पाण्यात एक दहा वर्षांचा मुलगा वाहून गेल्याची घटना घडलीय. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील विलम या गावातील हा मुलगा असून रुणाल बावणे असे या मुलाचे नाव आहे.

Wardha: गोठ्यावर कोसळली वीज, बैल ठार

वर्धा जिल्ह्यात सध्या विजाच्या कडकडाटसह जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे. समुद्रपूर तालुक्याच्या रासा येथे शेतकरी नलुबाई तोडासे यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यावर वीज पडल्याने एका बैलाचा जळून मृत्यू झाला तर एक बैल, एक गाय व एक वासरू जखमी झाले आहे. या घटनेत गोठ्यात असलेली दुचाकी आणि शेतीसाहित्यसह जनावरांचे वैरण पूर्णपणे जळून खाक झालेत.

Wardha: यशोदा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील वर्धा, यशोदा, वणा, बोर या नद्या दुभडी भरून वाहत आहे. यशोदा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून देवळी तालुक्याच्या चना टाकळी या गावाला पुराचा धोका निर्माण झालाय.

स्पेनचे मानोलो मार्केझ बनले भारतीय फुटबॉलचे मुख्य प्रशिक्षक

सध्या इंडियन सुपर लीग (ISL) संघ एफसी गोवाचे प्रभारी स्पेनचे मानोलो मार्केझ यांची शनिवारी भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

Mumbai: 'तुळशी तलाव’ भरला, मुंबईकरांना दिलासा

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा  ‘तुळशी तलाव’ आज २० जुलै २०२४ रोजी सकाळी साडेआठ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. 

SBIच्या ग्राहक सेवा केंद्राला आग; रोख रकमेसह लाखोंची सामग्री जळून खाक

Shegaon Live: शेगाव येथील मुख्य मार्गावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला लागून असलेल्या ग्राहक सेवा केंद्राला आग लागून रोख रकमेसह कॉम्पुटर , फर्निचर जळून खाक झाल.

Kalyan Live: कल्याणमध्ये टेकडीवरील माती खचल्यानं कोसळली घरं

कल्याणमध्ये टेकडीवरील माती खचल्यानं घर कोसळलं आहे. नेतीवली टेकडी परिसरात ही घटना घडली आहे. पावसामुळं टेकडीवरील माती खचल्यानं हे घर कोसळलं. यामध्ये जीवितहानी झालेली नाही, पण घरांचं नुकसान झालं आहे. काही दिवसांपूर्वी याच टेकडीवर पाच घरं कोसळली होती, त्यापाठोपाठ माती खचल्यानं घर कोसळल्यानं परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे.

Pune Live : पूजा खेडकरांचा जबाब अखेर पुणे पोलिसांनी नोंदवला

वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जबाब अखेर पुणे पोलिसांनी नोंदवला. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर आरोप केल्यानं त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दोन वेळेस पूजा खेडकर यांना नोटीस पाठवली होती. पहिल्या नोटिशीनंतर त्या पुण्यात हजर राहिल्यान नव्हत्या. पण दुसऱ्या नोटिशीनंतर त्यांनी वाशिमहून पुण्यात येत आपला जबाब नोंदवला.

Thane Live : ठाण्यात पावसामुळं बिल्डिंगमधील गॅलरी कोसळली

ठाण्यातील कौसा येथिल कादर पॅलेस इमारती मधील गॅलरी अचानक कोसळली. निषाद अपार्टमेंट असे बिल्डिंगचे नाव आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे गॅलरी कोसळली आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Mumbai Live: काँग्रेसकडून महायुतीच्या कारभाराचं 'पाप पत्र' जाहीर

काँग्रेसकडून महायुतीच्या कारभाराचं 'पाप पत्र' जाहीर केलं आहे. सरकारी घोषणा आणि त्यातील फोलपणाचा या पत्रात समावेश असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. आम्ही आता इलेक्शन मोडवर जात आहोत अस मी जाहीर करते, अशी घोषणा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. यावेळी काँग्रेसनं महायुती सरकारविरोधातील एक 'रॅप साँग' रिलीज केलं. सत्तेतल्या बोक्यांनो मस्ती आली काय ? असं त्या 'रॅप साँग' चे शब्द आहेत.

Grant Road Building Collapse live Update : मुंबईतल्या  ग्रॅंट रोड परिसरात इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मुत्यू

मुंबईतल्या ग्रँट रोड परिसरात नुकतीच रुबिना मंजिल नावाच्या इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत.

Arvind Sawant Live : खासदार अरविंद सावंतांनी ग्रँट रोड येथील रुबिन्निसा मंजिल इमारतीची घटनास्थळी जाऊन पाहणी केली

मुंबईतल्या ग्रँट रोड येथील रुबिना मंजिल इमारतीचा काही भाग कोसळल्याचे वृत्त कळताच शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी मदतकार्याची माहिती घेतली आणि दुर्घटनाग्रस्त नागरिकांसोबत संवाद साधला.

Wardha  Rain Live Update: वर्धा जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस

सेलू ते येळाकेळी मार्गावरील पुलावरून अंदाजे २ फुटाच्या वर पाणी वाहत असल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद

Nagpur Accident Live Update: नागपूरच्या नरेंद्र नगर ब्रिजवर अपघात,अपघातात वाहन चालक गंभीर जखमी

  • नागपूरच्या नरेंद्र नगर ब्रिजवर अपघात,अपघातात वाहन चालक गंभीर जखमी

  • नरेंद्र नगर ते विमानतळ जाणाऱ्या ब्रिजवर डिव्हायडरला धडक लागून छोटा मालवाहू वाहन पलटी झाले आहे. यामध्ये वाहनाचे देखील मोठं नुकसान झालं आहे

  • चालक निलेश अशोक त्रिवेदी यामध्ये गंभीर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले आहे

  • प्रताप नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा पंचनामा करत आहे

Kolhapur Rain Live Update: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे सर्वच नद्या पात्राच्या बाहेर

  • कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे सर्वच नद्या पात्राच्या बाहेर

  • वेदगंगा नदीने देखील आपलं पात्र सोडलं असून निपाणी देवगड रस्त्यावर निढोरी गावाजवळ पाणी आलं आहे

  • त्यामुळे प्रशासनाने ही वाहतूक बंद ठेवली असली तरी काही हौशी मोटार सायकलचा या पाण्यातून जात आहेत

  • गावातील नागरिक देखील रस्त्यावर आलेले पाणी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत

Nagpur Rain Live Update: नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु; अनेक घरांमध्ये पाणी शिरले

नागपूर जिल्ह्यात आज सकाळ पासून मुसळधार पाऊस झालेला असून सध्यस्थितीत पाऊस थांबलेला आहे. अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचलेले असून त्याचा निचरा होत आहे. काही घरांमध्ये पाणी शिरलेले आहे, त्याकरिता मनपा नागपूरची टीम आवश्यक कार्यवाही करीत आहे. जनजीवन व वाहतूक सुरळीत सुरू आहे.

Ganeshutsav 2024 Live Update : गणेशभक्तांसाठी माेठी बातमी! मध्य रेल्वेच्या 202 विशेष गाड्या, 21 जुलैपासून बुकिंग सुरू

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मध्य रेल्वेने गणेशभक्तांच्या सेवेसाठी सुमारे 202 विशेष गाड्या धावतील. गणेशोत्सव 7 सप्टेंबर रोजी होणार आहे, हे लक्षात घेऊन, या विशेष गाड्या 1 सप्टेंबरपासून सुरू होतील उद्या, 21 जुलैपासून या गाड्यांचे बुकिंग सुरू होईल. अशी माहिती मुंबई मध्य रेल्वेचे CPRO स्वप्नील धनराज नीला यांनी दिली.

Uddhav Thackeray Live  : लाडक्या मित्रासाठी झोपडपट्टी दान.. ठाकरेंचा अदानींवर थेट वार

मुंबईच्या पंपिंग स्टेशन साठी मेट्रो साठी मिठाघरांची जागा नव्हती मात्र आत्ता धरावसाठी या जागा खुल्या केल्या जात आहेत. धारावी टाऊंनशीपच्या आराखड्याचा कुठेही उल्लेख नाही, आमचं सरकार आल तर आम्ही धारावी करांच तिथेच पुनर्वसन करू तसेच त्यांच्यासाठी नवीन इंडस्ट्रिअल इस्टेट बांधू.

Agniveer Scheme Live : सरकारी नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांसाठी 10% कोटा; हरियाणा सरकारचा निर्णय

हरियाणा सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांसाठी 10% कोटा जाहीर केला, यावरून हे कळाले की अग्निवीर योजना तरुणांसाठी चांगली नाही. असे काँग्रेस खासदार दीपेंद्र हुडा म्हणाले.

Microsoft Outage Live : मायक्रोसॉफ्ट विंडोज आउटेजमागील गुढ उलगडले

CrowdStrike ने मायक्रोसॉफ्ट विंडोज आउटेजमागील कारण स्पष्ट केले आहे, मायक्रोसॉफ्ट विंडोज सिस्टमसाठी एक सेन्सर कॉन्फिगरेशन अपडेट चुकीच्या पद्धतीने झाले त्यामुळे हे आउटेज इतिहासातील सर्वात मोठे आयटी आउटेज आहे.

MUDA Scam Row Live : MUDA घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यासह इतरांविरुद्ध तक्रार दाखल

भाजप नेते एन.आर. रमेश यांनी बेंगळुरू येथील लोकायुक्त कार्यालय गाठले आणि MUDA घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.

Mumbai Traffic Live : बोरिवली कडून वांद्राच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी

बोरिवली कडून वांद्राच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर समता नगर ते सांताक्रुज दरम्यान वाहतूक कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Nagpur Rain Live : नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित

नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करीत आहेत. शाळांना सुटी देण्यात आली असून ज्या सखल भागात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कुही परिसरात काही रस्ते बंद झाले आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश आले आहेत. नागपूर विभागात सुद्धा गडचिरोलीतील काही भागांचा संपर्क तुटला आहे. विभागीय आयुक्त सातत्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. त्यांनाही सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Pooja Khedkar Live: राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग पूजा खेडकर प्रकरणात लक्ष घालणार

पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केलाय का हे आयोग तपासणार. जात प्रमाणपत्राची वैधता आयोगाकडून तपासली जाणार. साम टीव्हीच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पूजा खेडकरच्या अनेक तक्रारी आल्याची माहिती सांगण्यात येत आहे. आयोगानं DoPT कडे याबाबत केली विचारणा

Nagpur Rain Update: नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित, उपमुख्यमंत्र्यांनी केले नागरिकांना आवाहन 

नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सोशल मीडियावर पोस्ट करून आवाहन केले आहे.

मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करीत आहेत. शाळांना सुटी देण्यात आली असून ज्या सखल भागात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कुही परिसरात काही रस्ते बंद झाले आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. नागपूर विभागात सुद्धा गडचिरोलीतील काही भागांचा संपर्क तुटला आहे. विभागीय आयुक्त सातत्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. त्यांनाही सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस

Haithi Live: बोटीला लागलेल्या आगीत 40 स्थलांतरितांचा मृत्यू

हैतीच्या उत्तर किनाऱ्यावर बोटीला लागलेल्या आगीत 40 स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. बोटीत 80 पेक्षा जास्त लोक होते. ही बोट हैतीहून तुर्क आणि कैकोस बेटांवर जात होती.

Nagpur Rain: नागपूरमध्ये मुसळधार; शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

नागपूरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray PC live: उद्धव ठाकरे यांची आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद

उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करतील हे पाहावं लागेल.

Manoj Jarange In Antarwali Sarati Live: सर्व समाजाच्या मुलींना मोफत शिक्षण द्या, यात भेदभाव नको- मनोज जरांगे

मराठा समाजाला दगा दिल्याने पुन्हा उपोषणाला बसत आहेत. अद्यापही कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीयेत. नोंदी शोधल्या जात नाहीत. सरकारवा हवा तेवढा वेळ दिला आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. सर्व समाजाच्या मुलींना मोफत शिक्षण द्या, यात भेदभाव नको असं देखील ते म्हणालेत.

Manoj Jarange Patil Live: मनोज जरांगे सकाळी १० वाजता माध्यमांशी संवाद साधणार

मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषण करणार आहेत. त्यांचे उपोषण १० वाजता सुरु होणार आहे. यासाठी ते आंतरवली सराटी येथे उपोषणस्थळी दाखल झाले आहे. यावेळी ते माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट करतील.

Vidharbh Rain Update: विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, नागपूरमध्ये शाळांना सुट्टी

विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे नागपूरमध्ये विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

Upendra Dwivedi to visit Jammu live : लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज जम्मू दौऱ्यावर

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज जम्मू दौऱ्यावर असून तेथील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सुरक्षा दलांनी घेतलेल्या क्षेत्रांबद्दल फॉर्मेशन कमांडर त्यांना माहिती देतील. तसेच इतर सुरक्षा एजन्सींसोबत सुरक्षा आढावा बैठकही होण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain Live : मुंबईसह उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार, तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने सुरु

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र, शनिवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलाच जोर पकडला. मुंबईसह उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका लोकल सेवेला देखील बसलाय. सध्या तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने सुरु आहे.

Karul Ghat live : वैभववाडी तालुक्यातील करुळ घाटात दरड कोसळली

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. वैभववाडी तालुक्यात देखील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्गमधील वैभववाडी तालुक्यातील करुळ घाटात देखील काल सायंकाळी दरड कोसळलीये. सर्व माती रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

IMD Rain Alert live : येत्या 24 तासांत कोकणसह पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

हवामान खात्याच्या माहितीनुसार (IMD Rain Alert), येत्या २४ तासांत कोकण आणि पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगर तसेच पुण्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ९ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Draupadi Murmu live : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 28 ला कोल्हापूर दौऱ्यावर, करवीर निवासिनी अंबाबाईचं घेणार दर्शन

कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी (ता. २८) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्या करवीर निवासिनी अंबाबाई दर्शन घेणार असून, त्यानंतर वारणानगर (ता. पन्हाळा) येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन नियोजनाचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रपती मुर्मू यांच्या संभाव्य दौऱ्यानुसार त्यांचे रविवारी (ता. २८) विमानाने कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. यानंतर त्या दुपारी बारा वाजता करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत.

Haiti Boat Fire live : हैतीच्या किनाऱ्यावर बोटीला आग; 40 जणांचा मृत्यू

हैतीमध्ये स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला आग लागली आणि या घटनेत 40 जणांचा मृत्यू झाला. हैतीमधील इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) ने शुक्रवारी ही माहिती दिली. हे जहाज 80 हून अधिक स्थलांतरितांना घेऊन जात होते.

Bangladesh Curfew LIVE : बांगलादेशात आरक्षणाविरोधात महासंग्राम; आतापर्यंत 100 हून अधिक जणांचा मृत्यू, देशभर कर्फ्यू लागू

बांगलादेशात आंदोलकांवर पोलीस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी गोळीबार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. देशभरात सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 105 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी नरसिंगडी जिल्ह्यातील तुरुंगावरही हल्ला केला आणि तुरुंगाला आग लावण्यापूर्वी शेकडो कैद्यांची सुटका केली. यानंतर, पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने बांगलादेशमध्ये देशव्यापी कर्फ्यू घोषित करण्याचा आदेश जारी केला. इंटरनेट आणि मोबाईल सेवाही बंद करण्यात आली आहे. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी अनेक दिवसांपासून आंदोलन करत होते.

Ghatkopar Hoarding Case Live : भिंडेच्या याचिकेवर उत्तर सादर करा’

मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग कोसळण्याची घटना ही देवाची करणी होती, असा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि जाहिरात कंपनीचा संचालक भावेश भिंडे यांनी सुटकेसाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने याचिकेची दखल घेत मुंबई पोलिसांना यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

Maratha Reservation live : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे आजपासून अंतरवालीत पुन्हा उपोषण

Latest Marathi Live Updates 20 july 2024 : अवघ्या जगाची सेवा खिडकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मायक्रोसॉफ्ट विंडोज’ मध्ये सायबर सिक्युरिटी फर्म ‘क्राउडस्ट्राईक’ने फॉल्टी अपडेट केल्याने जगभर हाहाकार माजला. भारतासह अनेक देशांतील विमानसेवा, रुग्णालये, रेल्वे आणि आरोग्य सेवेला याचा मोठा फटका बसला. तसेच मराठा समाजाला आरक्षण, सगेसोयरेंबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथे आजपासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत. बनवेगिरी करुन भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा (आयएएस) उत्तीर्ण झाल्याचा आरोप असलेल्या प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. शिवाय, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांच्या प्रवेशाबाबत राज्य सरकारकडून काढण्यात आलेली अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली. तसेच राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com