मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या सकारात्मक चर्चे नंतर मार्डच्या डॅाक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मार्डच्या डॅाक्टरांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली. यामध्ये मार्ड डॅाक्टरांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.