Latest Maharashtra News live Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 26 july 2024 : धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेने धोका पातळी ओलांडलीये.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal
Updated on

Eknath Shinde Live: अर्थसंकल्पात राहून गेलेला खड्डा, निती आयोगाच्या बैठकित भरून काढण्याचा सरकारचा प्रयत्न !

तप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची महत्वाची बैठक उद्या आणि परवा दिल्लीत होणार आहे. देशातील विविध राज्याचे मुख्यमंत्री या बैठकिला उपस्थित असणार आहेत. उद्योग, इन्फ्रासह केंद्राशी संबधित महत्वाच्या प्रकल्पांना प्राधान्य देत, यातील १ ट्रिलियन म्हणजेच २५ टक्के वाटा महाराष्ट्रातून देण्याचा मुख्य उद्देश घेऊन मुख्यमंत्री या बैठकित सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

Nagpur Live: विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केले दाखल

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांना ताप आल्याने त्यांना मेडिकल चौकातील खाजगी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. आज प्रकृती ठीक नसतानाही ते चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थतीची पाहणी दौऱ्यासाठी गेले होते.

Mumbai Live: शिवडीतून ४ कोटींचे चरस जप्त!

शिवडी परिसरातून ४ कोटी रुपयांचं चरस जप्त करण्यात आलं आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाला ८ किलो चरस सापडलं आहे. तर माझगाव, मानखुर्द आणि दहिसर परिसरातून २६ लाख रुपयांचे एकूण १५० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis Live : कर्नाटक सरकारच्या सिंचन विभागाशी महाराष्ट्राचा सिंचन विभाग सातत्याने संपर्कात - देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. खडकवासला धरणातून विसर्ग 40,000 क्युसेकवरून 13,000 क्युसेकवर कमी करण्यात आला आहे आणि प्रत्येक 6 तासांनी याची समीक्षा केली जात आहे. उद्या पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. कोयना धरणातून 20,000 क्युसेक इतका विसर्ग सुरू असून, यावर सतत देखरेख ठेवली जात आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी तसेच कर्नाटक सरकारशी सिंचन विभाग सातत्याने संपर्कात आहे. अलमट्टी धरणाची पाणी पातळी कायम राखण्यात आली असून, कर्नाटक सरकारच्या सिंचन विभागाशी महाराष्ट्राचा सिंचन विभाग सातत्याने संपर्कात आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे सासर्‍याकडून जावयाचा खून; आंतरजातीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून घडली घटना

आंतरजातीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून सासर्‍याने आपल्या जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगरात समोर आलीय. अमित मुरलीधर साळुंखे असं या तरुणाचं नाव असून तो शहरातील इंदिरानगर भागात राहत होता. खाजगी कंपनीत काम करणाऱ्या अमितचे त्याची लहानपणाची मैत्रीण विद्या सोबत प्रेम संबंध होते आणि त्यांनी प्रेम विवाह देखील केला होता मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी हा राग मनात धरून 14 जुलै रोजी अमितच्या पोटात चाकूचे वार केले यात तो गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेला 11 दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपीला अटक होत नसल्याने अमितच्या कुटुंबीयांनी जवाहर नगर पोलीस ठाण्यात ठिय्या केला.

Devendra Fadnavis Live : सोशल मीडियावर फडणवीस यांची प्रतिमा मलिन करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल

डोंबिवली, ता. 26 - राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एक्सपोस्टवर काही चित्र प्रदर्शित केल्याप्रकरणी ही तक्रार असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय घ्या; भरत गोगावले यांची हायकोर्टात याचिका

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उबाठाच्या आमदारांना अपात्र करावे, अशी विनंती याचिका शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी केली आहे.

व्हिप न पाळणाऱ्या उबाठा आमदारांविरोधात आम्ही अपत्रातेची याचिका दाखल केली होती. त्यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती याचिका माननीय उच्च न्यायालयात केली असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

संजय पांडे वर्सोवा मतदारसंघातून लढवणार विधानसभा निवडणूक

संजय पांडे वर्सोवा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार. 'राष्ट्रीय जनहित' या नावाच्या पक्षाची स्थापना करून ते निवडून लढवणार आहेत. १५ ऑगस्टनंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करु असंही पांडे यांनी म्हटलं आहे. आमची विचारधारा धर्मनिरपेक्ष असेल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भविष्यात आमची आघाडी होऊ शकते, असंही पांडे यांनी जाहीर केलं आहे.

सातारा जिल्ह्यात सरासरी 43.9 मिमी पाऊस

सातारा जिल्ह्यात 25 जुलै रोजी सरासरी 43.9 मिमी पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 636.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मिमीमध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत.

सातारा – 48.2 (568.6), जावली-मेढा – 99.0 (1110.1), पाटण – 40.7 (942.3), कराड –26.9 (583.1), कोरेगाव –46.8 (484.2), खटाव – वडूज – 23.1 (371.0), माण – दहिवडी – 12.8 (288.4), फलटण – 20.2 (319.8), खंडाळा – 31.7 (260.3), वाई – 61.7 (577.2), महाबळेश्वर – 142.0 (2206.2) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

राहुल गांधींनी सुलतानपूर कोर्टात नोंदवला जबाब

राहुल गांधी यांनी सुलतानपूर कोर्टात आज जबाब नोंदवला. मी निर्दोष आहे, माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचलं गेलं, असा आरोप राहुल गांधींनी केला. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मी फेटाळतो. माझी आणि माझ्या पक्षाची प्रतिमा डागाळण्यासाठी हे आरोप केले जात आहेत. असं मत राहुल गांधी यांनी कोर्टात मांडलं.

Urmodi Dam Rain Live Update : उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी 

उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आवक देखील कमी झालेली आहे. त्यामुळे पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे आज उरमोडी धरण सांडव्यातून विसर्ग सोडण्यात येणार नाही. पाऊस व पाण्याची आवक वाढल्यास पूर्व सूचना देऊन सांडव्यावरून विसर्ग सोडण्यात येईल.

Nandurbar Rain Live Updates :  नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये अतिवृष्टी

नंदुरबार जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये अतिवृष्टी झाली असून, नवापूर तालुक्यात मागील २४ तासांमध्ये तब्बल 211 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे.

Kawad Yatra Live Updates: कावड यात्रा प्रकरणाची सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलली

  • सुप्रीम कोर्टाचा अंतरिम आदेश पुढील सुनावणीपर्यंत कायम राहणार

  • थोडक्यात 2 आठवडे हॉटेल आणि ढाब्यावर नाव लिहावी लागणार नाहीत

  • कोर्टाने उत्तर देण्यासाठी संबंधित राज्य सरकारांना एका आठवड्याची मुदत दिली

  • सरकारच्या उत्तरानंतर याचिकाकर्त्यांना आठवडाभरात प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार

  • दोन आठवड्यांनी पुढची सुनावणी होणार

Bhama Askhed Dam Live Updates: इगतपुरी तालुक्यातील भावली नंतर भाम धरण देखील 100% भरलं

  • इगतपुरी तालुक्यातील भावली नंतर भाम धरण देखील 100% भरलं

  • मागील चार ते पाच दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामधरण आज 100% भरलं

  • मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी करण्यात आलीय भाम धरणाची निर्मिती

  • भाम धरण 100% भरल्याने मराठवाड्याला काही प्रमाणात दिलासा

Alibag Live Updates: अलिबागजवळ भरकटलेल्या जहाजावरील १४ खलाशांची सुटका

अलिबागजवळ भरकटलेल्या जहाजावरील १४ खलाशांची सुटका. कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुटका. सर्व खलाशी सुखरूप.

Nandurbar Live : सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक नवापूरजवळ ठप्प

नंदुरबार येथे सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक नवापूरजवळ ठप्प झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर जवळपास 8 ते 9 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Nagpur Live: भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी

नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. काटोल विधानसभा मतदारसंघात नरखेड तालुक्यातील मोवाड येथील अनिल देशमुखांविरोधात भाजपची घोषणाबाजी करण्यात आली.

Gondia Live Updates: भाजपचे नेते रमेश कुथे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार

गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून घर वापसी करणार आहेत. आज दुपारी 12:30 वाजता शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश होणार आहे.

kolhapur Live : कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरुच, बापट कॅम्प परिसरात पुराचे पाणी

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती

काँग्रेस आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्याकडून बापट कॅम्प परिसराची पाहणी

बापट कॅम्प परिसरात पुराचे पाणी आल्याने आमदार सतेज पाटील यांनी केली पूरस्थितीची पाहणी

Pimpri Chinchwad Live : पिंपरी चिंचवडमध्ये पुराच्या पाण्यातून आले साप

पिंपरी चिंचवड शहरामध्ये नद्यांचे पाणी घुसल्याने मोठा हाहाकार माजला आहे. पूरपरिस्थितीमुळे अनेक साप शहरात घुसले आहेत. पाण्यामुळे अनेकांच्या घरामध्ये साप घुसले आहेत.

Sudip Bandyopadhyay Live : ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी हाेणार का? 

तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंदोपाध्याय म्हणाले आज ममता बॅनर्जी बंग भवनमध्ये पक्षाच्या खासदारांना भेटतील. त्या नीती आयोगाच्या बैठकीत भाग घेतील की नाही हे मला माहीत नाही."

Dhom Dam Live : धोम धरण विसर्ग; कृष्णा नदी पात्रा जवळील सर्व ग्रामस्थांना सर्तक राहण्याचे आवाहन

धोम धरण क्षेत्रातील पावसाचा जोर व आवक मध्ये काल पेक्षा घट झालेली असून धोम धरणाची पाणी पातळी ७४२.२९ meter आहे व एकूण पाणी साठा ७०.०९% आहे. त्यामुळे धोम धरणातून नदी पात्रात विसर्ग सोडवण्याचे नियोजन पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता पुन्हा दुपारी आढावा घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. विसर्ग सोडणे आवश्यक असलेला या बाबत आगाऊ सुचना देण्यात येईल. तरी Krishna नदी पात्रा जवळील सर्व ग्रामस्थांना सर्तक राहणे बाबत याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.

कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील.

- कार्यकारी अभियंता सातार सिंचन विभाग , सातारा

PM Modi Live : कारगिल युद्ध स्मारक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धातील वीरांना आदरांजली वाहिली

देशात दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस जुलै १९९९ मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानविरोधातल्या लढाईत बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. साधारण २४ वर्षांपूर्वी पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेच्या परिसरासह भारतीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरीला सुरुवात केली. कारगिलमधील कारगिल युद्ध स्मारक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धातील वीरांना आदरांजली वाहिली.

Kanwar Yatra Live : सुप्रीम कोर्टात आज कावड यात्रा प्रकरणी सुनावणी

उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रेदरम्यान असणाऱ्या दुकानांना नेमप्लेट लावण्याचे आदेश दिले होते. सरकारच्या या आदेशाला सुप्रीम कोर्टाने २२ जुलैला स्थगिती दिली होती, तसंच मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारला या प्रकरणात नोटीस बजावली होती.

कोर्टात आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष दुकानदारांना नाव लिहिण्याची सक्ती नाही अस कोर्ट अंतरिम स्थगिती देताना म्हणाल होत कावडयात्रींना त्यांची पसंतीनुसार शाकाहारी अन्न मिळणं गरजेचे आहे पण त्यासाठी सरकार फूड सेफ्टी ऍक्ट, स्ट्रीट वेंडर्स ऍक्ट अंतर्गत आदेश जारी करू शकतात अशीही टिपण्णी कोर्टाने केली होती.

Rahul Gandhi Live : राहुल गांधी यांच्या विरोधातील 6 वर्षापूर्वीच्या प्रकरणात आज उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर कोर्टात सुनावणी

राहुल गांधी दिल्लीतून सुलतानपूरकडे रवाना झाले आहेत. राहुल गांधी यांचा आज न्यायालयात जबाब नोंदवला जाणार, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी कर्नाटक इथं पत्रकार परिषदेत बोलताना अभद्र भाषेचा वापर केला म्हणून भाजप नेत्यांनी खटला दाखल केला होता.

Hatnur Dam Live : हतनूर धरणाचे ४१ पैकी १० गेट १.५ मी. उंचीने उघडले; तापी नदीपात्रात ३०५४७ cusecs ने विसर्ग सुरू

हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे ४१ पैकी १० गेट १.५ मी. उंचीने उघडलेले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत ३०५४७ cusecs इतका विसर्ग सुरू असून पुढील काही तासांत ४५,००० ते ५०,००० cusecs पर्यंत विसर्ग हतनुर धरणातून जाण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Kanher Dam Live : कण्हेर धरणातून 5500 क्युसेक विसर्ग सुरू

पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे धरणात येवा सुरू आहे. कण्हेर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 7:00 वा. पाण्याचा विसर्ग 10000 क्युसेक वरुन कमी करुन एकूण विसर्ग 5500 क्युसेक करण्यात आला आहे. हा विसर्ग येव्यानुसार त्यामध्ये कमी जास्त करण्यात येईल. वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

Prajwal Revanna LIVE : प्रज्वल रेवण्णा याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

बंगळूर : अनेक महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला हासन धजदचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. प्रज्वल रेवण्णा याने दुसऱ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या बंगळूरच्या लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी याचिका फेटाळून लावली आणि आदेश जारी केला.

Sangli Rain LIVE : सांगली जिल्ह्यात पावसाची काय आहे स्थिती?

सांगली पाटबंधारे विभाग सांगली.

पाणी पातळी - (फूट इंचामध्ये)

(धोका पातळी/आत्ताची पातळी )

1) कृष्णा पूल कराड-(55.0)/27'06"

2) बहे पूल-(23.7)12'09"

3) ताकारी पूल (46)/42'0"

4) भिलवडी पूल -(53)39'10"

5) आयर्विन- (45)/36'06"

6) राजापूर बंधारा-(58)/47'10"

7) राजाराम बंधारा-(43)/44'09"

पाणीसाठा (TMC) / विसर्ग (क्यूसेकमध्ये)

1) कृष्णा पूल कराड- 69993

2) आयर्विन पूल - 81797

3) राजापूर बंधारा - 177500

4) राजाराम बंधारा - 64135

5) कोयनाधरण- 78.29 TMC/32100

6)वारणा धरण- 30.53 TMC/ 15785

7)अलमट्टी धरण- 83.486

आवक - 204098

जावक - 275000

Mumbai Rain LIVE : मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता

मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अधूनमधून ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

भरती - दुपारी - ०३:३२ वाजता - ४.४६ मीटर

ओहोटी - रात्री - ०९:४४ वाजता - ०.९८ मीटर

भरती - (उद्या - दि. २७.०७.२०२४) पहाटे - ०४:०६ वाजता - ३.९६ मीटर

ओहोटी - (उद्या - दि. २७.०७.२०२४) - सकाळी - ०९:४२ वाजता - १.५४ मीटर

Pune Rain LIVE पावसाच्या हाहाकारामुळे पुण्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

पुणे शहर आणि धरणक्षेत्रात बुधवार रात्रीपासून पावसाचे तांडव सुरू आहे. त्यातच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पुण्यातील सिंहगड रस्त्यासह नदीकाठच्या भागांमध्ये अनेक सोसायट्या, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. नाले, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पावसाच्या या हाहाकारामुळे पुण्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

Satara Rain LIVE : सातारा जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना आज सुटी

हवामान विभागाने जिल्हा तसेच घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना आज (शुक्रवारी) सुटी जाहीर केली आहे.

Koyna Dam live : कोयना धरणाच्या सांडव्यावरून 30,000 क्युसेक विसर्ग

आज सकाळी ७:०० वा. कोयना धरणाच्या सांडव्यावरून ३०,००० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ३२,१०० क्युसेक आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

Kolhapur Flood live : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गवरील शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद

कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राज्य महामार्गवर केर्ली गावाजवळ पाणी आल्याने या मार्गावरची वाहतूक थांबली होती. पाणी पातळी वाढल्याने शिवाजी पुलावरून होणारी वाहतूक पोलिसांनी थांबवली. पुलाच्या शहराकडील बाजूला बॅरिकेड्‌स लावून वाहतूक थांबवण्यात आली. पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

Sunil Kedar LIVE : काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. सुनील केदार यांना आगामी विधानसभा निवडणूक लढता येणार की नाही? हे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यात दोषसिद्धीला अंतरिम स्थगिती मिळविण्यासाठी केदार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीये.

Kargil War LIVE : भारताने कारगिल युद्ध जिंकल्याला आज 25 वर्ष पूर्ण

भारताने कारगिल युद्ध जिंकल्याला आज 25 वर्ष पूर्ण झाले आहे. कारगिल जिल्ह्यातील द्रास येथे रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचं आज आयोजन केले आहे. द्रास येथे आयोजित करण्यात आलेल्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदी कारगिल युद्ध स्मारकावर पोहोचून 1999 च्या युद्धातील वीरांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. पंतप्रधान शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

Kolhapur Flood live : कोल्हापुरात पूरस्थिती, जिल्ह्यातील 88 बंधारे पाण्याखाली

कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झालीये. कोल्हापूर जिल्ह्यातील 88 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणाचे ६ स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून राधानगरीचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3,4,5,6,7,1 उघडले आहेत. धरणातून प्रति सेकंद 10068 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगेची पाणीपातळी 44 फूट 4 इंचावर आहे. इथे क्लिक करा

Railway News live : मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द

हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या तीन गाड्या रद्द

मुंबई-पुणे दरम्यान धावणारी (१२१२७) इंटरसिटी एक्सप्रेस

(१२१२४) डेक्कन क्वीन

(१२१२६) प्रगती एक्स्प्रेस

या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना माहिती देण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहेत.

Mother Dairy LIVE : मदर डेअरीच्या जागेच्या मोजणीविरोधात आज ठाकरे गटाचं निषेध आंदोलन

कुर्ला येथील मदर डेअरीच्या जागेच्या मोजणीविरोधात आज ठाकरे गटाचं निषेध आंदोलन आहे. मदर डेअरीची जागा अदानी कंपनीला देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी आज जागेची मोजणी सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. या मोजणीला विरोध करत आज सकाळी 9 वाजता निषेध आंदोलन केलं जाणार आहे. या निषेध आंदोलनात इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, विविध सेवाभावी संस्था त्याचबरोबर कुर्ला- नेहरूनगरमधील रहिवाशी सहभागी होणार आहेत.

Mumbai Rain LIVE : मुंबई, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईला आज पावसाचा सकाळी 8.30 पर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मात्र, मुंबईत काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. इथे क्लिक करा

Belgaum Rain LIVE : बेळगाव जिल्ह्यातील शाळांना आज, उद्या सुटी

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बेळगाव शहरासह बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, कित्तूर, निपाणी व चिक्कोडी तालुक्यातील सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांसह अंगणवाडींना गुरुवारी (ता. २५) व शुक्रवारी (ता. २६) सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा दोन दिवस बंद राहणार असून, याबाबतचा आदेश बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी बजावला आहे.

Almatti Dam LIVE : सव्वादोन लाख क्युसेकचा आलमट्टी धरणातून विसर्ग

चिक्कोडी : आलमट्टी जलाशयातून २६ दरवाजांतून तब्बल दोन लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. महाराष्ट्रातील धरण क्षेत्रासह कोल्हापूर, सांगली, चिक्कोडी भागात पावसाचा जोर वाढल्याने व महाराष्ट्रातील काही धरणांतून विसर्ग करण्यात येणार असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Panchganga River LIVE : धरण क्षेत्रात मुसळधार, पंचगंगेच्या पाणीपातळीत मोठी वाढ

Latest Marathi Live Updates 26 july 2024 : धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेने धोका पातळीये ओलांडली. पुण्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. वारणा धरण परिसरात ३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला, अशी माहिती धरण प्रशासनाने दिलीये. हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच आलमट्टी जलाशयातून २६ दरवाजांतून तब्बल दोन लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.