Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 27 july 2024 : भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा रविवार (ता. २८) कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा पुरामुळे रद्द झाला आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal
Updated on

Kolhapur Live : कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती नियंत्रणात- खासदार महाडिक

कोल्हापुरातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. प्रशासनाच्या वतीने सर्व खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत, राधानगरी धरणातून जरी पाण्याचा विसर्ग होत असला तरी कर्नाटक राज्यातील हिप्परगी आणि अलमट्टी धरणातून पुढे पाणी सोडले जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

Solapur Live: सोलापुरात आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात

सोलापुरात वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा सुरु झाली आहे. वंचितचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात प्रकाश आंबेडकर सभेला संबोधित करणार आहेत.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरु

भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक सुरू झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झालीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीत सहभागी झाले आहेत.

Eknath Shinde Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची घेतली भेट घेतल्यावर मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Akola: पोलीस उपनिरिक्षकाला कारने उडवले

अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे पोलीस उपनिरिक्षकाला (PSI) कारने उडवल्याची घटना घडली आहे. यात बोरगावमंजू पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

Satara Rain: रेल्वे पुलाच्या तोंडावरच रुतला ट्रक, वाहनांची ये- जा पूर्णपणे थांबली

पावसामुळे उत्तर कोपर्डे (ता. कऱ्हाड, जि.सातारा) हद्दीत असलेल्या रेल्वे पुलाच्या अंडरपास बोगद्यात पाणी साचल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना चिखलाचा राडारोडा झाला आहे. त्यातच सकाळी पुलाच्या तोंडावरच ट्रक रुतल्याने नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे स्टेशन ग्रामस्थांचा रस्ता सहा तास बंद झाल्याने वाहनांची ये- जा पूर्णपणे थांबली होती.

Kolhapur Update : कोल्हापुरात पूरस्थितीमुळं 'इतके' मार्ग बंद

कोल्हापूर जिल्ह्यातील 98 बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीची पातळी 47.5 फूट

प्रमुख जिल्ह्यातील 25 राज्य मार्ग बंद

जिल्ह्यातील 123 मार्ग बंद

एकूण 147 मार्ग बंद

राधानगरी धरणातून प्रति सेकंद 7,212 क्युसेक पाण्याचा विसर्ग

स्थलांतरित कुटुंबे

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण कुटुंबातील 7,006 व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

कोल्हापूर जिल्ह्यातील 3,237 जनावरांचं स्थलांतर

Pandharpur Live : जरांगे अन् फडणवीसांचे खायचे, दाखवायचे दात वेगळे - प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांचे पंढरपुरात खळबळजनक वक्तव्य. आंबेडकर यांनी जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यावर साधला निशाणा. जरांगे पाटील आणि फडणवीस यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, ओबीसी कुठेही जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करत नाहीत. राजकारण समजून घ्या. जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस याचे भांडण नकली आहे. भाजपाने ओबीसी विरोधात भूमिका घेतली आणि जरांगे पाटील यांनी फडणवीसांना विरोध केला तरच हे भांडण आहे, हे समजून घेऊ. अन्यथा हे नकली भांडण आहे. राजकारण समजा, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. आपण जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला नाहीच. स्वतःला फसवून घेऊ नका. दाखवायचे आणि खायचे दात एक असेल तर मत मागायला या, असे लोकांनी सांगितले पाहिजे. पंढरपुरात झालेल्या आरक्षण बचाव यात्रेत आंबेडकरांचं वक्तव्य.

Kolhapur Live: कोल्हापुरात स्थानिकांचं बोटीतून स्थलांतर; पूरस्थितीमुळं दैना

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पंचगंगा नदी पात्रात पाण्याची पातळी आता वाढताना दिसत आहे. सध्या पंचगंगेच्या पाणी पातळी ही 47 फुटांवरून वाहत आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातल्या विविध भागांमध्ये काल मध्यरात्रीपासूनच पाणी घुसलेला आहे. कोल्हापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी पंचगंगा तालीम इथं पुरात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी लोकांना आवाहन करत घराच्या बाहेर स्थलांतरित होण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

Thane Live Update : प्रियकरासाठी ठाण्याहून पाकिस्तानला जाऊन तरुणाशी लग्न केलेल्या तरुणीला न्यायालयीन कोठडी

ठाण्याहून पाकिस्तानला जाऊन पाकिस्तानमधील तरुणाशी लग्न केलेल्या तरुणीला न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. तसेच तिला मदत करणाऱ्या व्यक्तीला ही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana Live Update : रक्षाबंधनला मुख्यमंत्री सख्खा भाऊ म्हणून लाडक्या बहीण योजनेचे अनुदान वाटप करणार - तानाजी सावंत

लाडकी बहीण योजनेसाठी निधीची कमतरता हे विरोधकांनी आणि मीडियाने सेट केलेले नेरेटिव्ह चित्र आहे. मी आरोग्यमंञी असल्याने विरोधकांच्या या पोटदुखीवरील इलाज माझ्याकडे आहे. वित्त विभागाने आणि कुठल्याच अधिकाऱ्याने निधी नसल्याचे कळवले नाही. शिवाय, तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी लाडकी बहीण ही योजना करूनच निर्णय घेतला आहे. येणाऱ्या रक्षाबंधनाला मुख्यमंत्री सख्खा भाऊ म्हणून लाडक्या बहीण योजनेचे अनुदान वाटप करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.

Kolhapur Rain Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील ९८ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 98 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पातळी 47.5 फुटांवर गेली असून, प्रमुख जिल्ह्यातील 25 राज्य मार्ग बंद करण्यात आले आहेत. राधानगरी धरणातून प्रति सेकंद 7212 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात एकूण कुटुंबातील 7006 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 3237 जनावरांचं स्थलांतर

Raigad Rain Live: रायगडात पूर ओसरल्यानंतर दीड हजार लोकांचे स्थलांतर

रायगडात पावसाचा जोर कमी झाल्यावर आता पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली. त्यानंतर दीड हजार लोकांनी स्थलांतर केलं आहे.

Jayant Patil Live: बीडमध्ये लागले भावी मुख्यमंत्री जयंत पाटील असा उल्लेख असलेले बॅनर्स

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बीडमध्ये निष्ठावंतांचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यानिमित्त आलेल्या जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी बीड शहरात विविध ठिकाणी बॅनर्स देखील लावण्यात आले असून यावर भावी मुख्यमंत्री जयंत पाटील असा उल्लेख करण्यात आला आहे.. यामुळे आता भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये आणखी एका नावाची भर पडल्याची चर्चा होत आहे. यापूर्वी धनंजय मुंडे, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचे देखील अशाच पद्धतीने बॅनर्स झळकले होते. यानंतर आता जयंत पाटील यांची देखील बीडमध्ये बॅनर लागल्याने निवडणुका अजून दूरच असताना मुख्यमंत्री कोण होणार ? याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागल्याचे पाहायला मिळत आहे.

Yavatmal Live: यवतमाळ जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; संजय देशमुख यांचा शिंदे गटात प्रवेश

खासदार संजय देशमुख यांच्या शेकडो समर्थकानी मंत्री संजय राठोड यांच्या समक्ष शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्याबद्दल शिवसेना ठाकरे गटात नाराजीची चर्चा होती. नेर,दिग्रस आणि दारव्हा तालुक्यातील खासदार संजय देशमुख यांच्या समर्थकानी साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संजय राठोड यांच्या समक्ष मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्रस मतदार संघात ताकद वाढवण्याचा मंत्री राठोड यांचा प्रयत्न असेल.

Balkawdi Dhom Dam Live Updates: कृष्णा नदीच्या पात्राजवळील बलकवडी, परतवाडी, दह्याट बोरगाव व इतर सर्व गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आज दि. २७ जुलै २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. धरणामध्ये एकूण ३.३६टीएमसी (८२.३५%) पाणीसाठा झाला आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे येव्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्या साठी आज दुपारी १२.०० वा. धोम बलकवडी धरणातून @ २५०० क्युसेक्स विसर्ग धरणाच्या वक्रव्दारे सांडव्यावरून धोम धरणाचे जलाशयात सोडण्यात येणार आहे. तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल.

धरणाच्या खालील कृष्णा नदीच्या पात्राजवळील बलकवडी/ परतवाडी/ दह्याट बोरगाव व इतर सर्व गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदी पात्रात उतरू नये किंवा जनावरे पाण्यात आणू नये. तसेच मासेमारी करू नये. अशी सूचना देणयात आली आहे.

Maharashtra Weather Live Updates: राज्यात दोन दिवस अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता - आयएमडी

  • बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशावर सक्रिय. हे क्षेत्र पुढील 24 तासांत वायव्येकडे सरकणार.

  • पश्चिम किनारपट्टीवर गुजरात ते केरळदरम्यान समुद्रसपाटीला समांतर कमी दाबाचा पट्टा (ऑफ शोअर ट्रफ) सक्रिय.

  • विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज आणि उद्या (27, 28 जुलै) काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता.

building collapses in Navi Mumbai Live Updates: पोलिस, अग्निशामक दल आणि एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु

नवी मुंबईत बेलापूरमध्ये शहाबाज गांव इथं तीन मजली इमारत कोसळली. दुर्घटनेत दोन लोक ढिगाऱ्याखाली सापडले, पोलिस, अग्निशामक दल आणि एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु.

ढिगाऱ्याखाली सापडलेल्या दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात सुरक्षा यंत्रणांना यश, जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल. दोन जणांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु - उपमुख्यमंत्री

Consumer Price Index Live : जून 2024 मध्ये ग्रामीण व शेतमजुरांसाठी किंमत निर्देशांक पुन्हा वाढला

जून 2024 मध्ये शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांसाठी ग्राहक किंमत महागाई (CPI) वार्षिक आधारावर अनुक्रमे 7.02 टक्के आणि 7.04 टक्क्यांपर्यंत वाढली.

Palghar Live : पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ पुन्हा माल गाडीचे चार डब्बे रुळावरून घसरले

पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ माल गाडीचे चार डब्बे रुळावरून घसरले मालगाडीचे मागच्या भागातून चार डब्बे रुळावरून घसरले, सुदैवाने कुठलीही जिविहाणी नाही, रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल बोईसर रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये माल खाली करण्यासाठी आली होती माल गाडी, पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर काहीही परिणाम नाही.

Mumbai Live : मांजर्ली परिसरात गॅस पाईप लाईन फुटली

नैसर्गिक वायू पाइपलाइन्सच्या जवळ राहण्यामुळे अनेक धोके निर्माण होऊ शकतात. महानगर गॅसची पाईपलाईन फुटून गॅस गळती झाल्याची घटना मांजर्ली परिसरात घडली.

India Startup Live : भारतात १.४ लाख स्टार्टअप्स, उत्तर प्रदेश गुजरातच्या पुढे

भारतातील स्टार्टअपची संख्या १.४ लाखांहून अधिक झाली आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी राज्यसभेत अधोरेखित केले.  25,044 नोंदणीकृत स्टार्टअप्ससह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे. 15,019 नोंदणीकृत स्टार्टअप्ससह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर दिल्ली 14,734 स्टार्टअपसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशने 13,299 स्टार्टअप्ससह चौथे स्थान मिळवले आहे, तर गुजरात 11,436 स्टार्टअपसह पाचव्या स्थानावर आहे.

Belapur Building Collapse Live : बेलापूर फणस पाडा परिसरात इमारत कोसळली, 2 जणांना वाचवण्यात NDRFला यश

सीबीडी बेलापूर फणस पाडा परिसरात पहाटे ५ वाजेच्या सुमारास ४ मजली इमारत कोसळली 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे. एकाचा मृतदेह सापडला आहे,NDRF चे बचावकार्य सुरू.

Kolhapur Flood Live: गडहिंग्लज भडगाव मार्गावर पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद

गडहिंग्लज भडगाव मार्गावर पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला असून, चंदगडवरून इब्राहिमपूर, बुजवडे, माणगाव, भोगोली, पेळणी, नांदवडे पारगाव, कोदाळे,नागवेकडे रस्त्यावर पाणी आल्याने हे मार्ग बंद आहेत, काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

Kolhapur Flood Live: कोल्हापुरातील पूराचा महामार्गांना फटका

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तेथे पूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात आता कोल्हापूर-रत्नागिरी आणि कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्ग बंद करण्यात आले आहेत.

Rahul Narvekar Live: राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. 30 जुलैला होणारी सुनावणी आता 3 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. मागच्या 3 महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी झालेली नाही.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही म्हणून ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे.

Sharad Pawar Live: आज दुपारी 12:30 वाजता शरद पवार यांची पत्रकार परिषद

आज दुपारी 12:30 वाजता शरद पवार यांची पत्रकार परिषद आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर शरद पवार काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि राज्यातील घडामोडी वरही शरद पवार भाष्य करण्याची शक्यता आहे.

Mahayuti Meeting Live: महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत आज महत्वाची बैठक

महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत आज महत्वाची बैठक होणार आहे. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आज दुपारनंतर दिल्लीत येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर बैठकीत चर्चा होणारआजच्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार का हे पाहावं लागेल.

Vijay Namdevrao Wadettiwar Live : विजय वडेट्टीवार यांना डेंगूची लागण

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना डेंगूची लागण झाली आहे. त्यांना ताप आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना डेंगू झाल्याचे निदान झाले आहे.

Almatti Dam live : आलमट्टीतून तीन लाख क्युसेक विसर्ग

चिक्कोडी : कर्नाटक-महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आलमट्टी जलाशयातून शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता ३ लाख क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. सध्या जलाशयात दोन लाख दहा हजार क्युसेक पाणी वाहून येत आहे.

Koyna Dam live : सांडव्यावरून ३०,००० क्युसेक विसर्ग चालू

आज सकाळी ९ वाजता सांडव्यावरील विसर्गात वाढ करून ४०,००० क्युसेक विसर्ग नियोजित होते. सदर वाढ तात्पुरती स्थगित करण्यात येत आहे. सुधारित वेळ कळविण्यात येईल, असं प्रशासनानं सांगितलं आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून ३०,००० क्युसेक विसर्ग चालू आहे. कोयना धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक विसर्गासह एकूण विसर्ग ३२१०० क्युसेक आहे.

Encounter in Kupwara : कुपवाडामध्ये सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार, दोन जवान जखमी

कुपवाडा : उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील मच्छल (कुपवाडा) सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर ॲक्शन टीमने (BAT) केलेला हल्ला भारतीय जवानांनी हाणून पाडला. BAT मध्ये सामील असलेला एक दहशतवादी ठार झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत.

Ranchi land scam : रांची जमीन घोटाळ्याप्रकरणी भूमाफिया कमलेश कुमारला अटक

रांची जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने शुक्रवारी रात्री 8 वाजता भूमाफिया कमलेश कुमारला अटक केली. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ते एजन्सीच्या रांची झोन ​​कार्यालयात पोहोचले. पाच समन्सवर गैरहजर राहिलेल्या कमलेशची एजन्सीच्या तपास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, त्याची वृत्ती असहकाराची राहिली होती.

Bhairavnath Temple live : खोचीमधील भैरवनाथ मंदिरात शिरले पाणी

कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खोची मधील भैरवनाथ मंदिरात पाणी शिरले आहे. वारणा नदी पात्राबाहेर पडल्याने आज सकाळी मंदिरात पाणी शिरले. मंदिरात पाणी आल्याने आज पुजाऱ्यांकडून आरती करण्यात आली. पावसाचा जोर वाढल्यास पाणी गाभाऱ्यात जाण्याची शक्यता आहे.

Khadakwasla Dam live : पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग बंद

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. खडकवासला धरण परिसरात शुक्रवारी पावसाचा जोर ओसरल्याने धरणातून सुरु असलेला विसर्ग काल रात्रीपासून बंद करण्यात आला. मागील तीन दिवसात खडकवासला धरणातून अडीच tmc पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे मिळून एकूण पाणीसाठा 22.62 टीएमसी इतका जमा झाला आहे.

Panhalgad LIVE : पन्हाळगडाच्या पूर्व तटबंदीतील दगडी शिळा कोसळली

पन्हाळा : पन्हाळगडावरील चार दरवाजापासून सुरु होणाऱ्या पूर्वेकडील व पायथ्याशी असलेल्या मंगळवारपेठ गावठाणातील ग्रुप ग्रामपंचायत बुधवारपेठ कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या तटबंदीतील दगडी शिळाच्या समूहातील एक शिळा रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोसळली. इथे क्लिक करा

Belgaum Rain live : बेळगाव जिल्ह्यातील शाळांना आजही सुटी

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम असल्यामुळे रामदुर्ग तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील सरकारी, अनुदानित, विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये (बारावीपर्यंत) आणि अंगणवाड्यांना शनिवारी (ता. २७) रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Belapur live : फणस पाडा परिसरात पहाटे 5 वाजता 4 मजली इमारत कोसळली

सीबीडी बेलापूर : फणस पाडा परिसरात पहाटे ५ वाजेच्या सुमारास ४ मजली इमारत कोसळली आहे. अनेक जण यात दबल्याची भीती आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.

Dudhganga Dam live : दूधगंगा धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून सुरू असलेला विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार आहे. आज सकाळी 10 वाजता 7123 घनफूट प्रतिसेकंद (क्यूसेक) पाणी सांडव्यावरून व विद्युत गृहामधून 1000 घनफूट प्रतिसेकंद (क्यूसेक) असे एकूण 8123 क्यूसेक नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार आहे.

Kolhapur Flood LIVE : शिंगणापूर, नागदेववाडी उपसा केंद्र पडले बंद

कोल्हापूर : पूरपातळी वाढतच असल्याने महापालिकेचे शिंगणापूर, नागदेववाडी उपसा केंद्र रात्री पूर्ण बंद पडले. दरम्यान, थेट पाईपलाईन योजना दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Sangali Schools Closed LIVE : सांगलीत शाळांना आज सुट्टी जाहीर

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळी या परिसरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशात सांगली जिल्ह्यात अनेक भागात पूर येण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम शालेय वि‌द्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह वाळवा, पलूस व शिराळा तालुक्‍यातील सर्व विद्यार्थ्यांना 27 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इथे क्लिक करा

Kolhapur Flood LIVE : महापुरामुळे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा कोल्हापूर दौरा रद्द

Latest Marathi Live Updates 27 July 2024 : भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा रविवार (ता. २८) कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा पुरामुळे रद्द झाला आहे. त्या वारणानगरच्या दौऱ्यावर येणार होत्या. धरण क्षेत्रात काही काळ पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सहा पैकी दोन स्वयंचलित दरवाजे बंद झालेत. तर, कोल्हापुरात पंचगंगेने धोका पातळीये ओलांडलीये. पुण्यातही पावसाचा जोर कमी-जास्त प्रमाणात आहे. तसेच राजर्षी शाहू महाराज यांनी २६ जुलै १९०२ रोजी समाजातील दुर्बल घटकांना नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला; त्याचा दाखला देत लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा काढून टाकण्याची मागणी केली. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून कोयना नदीपात्रात ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौरा करणार आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com