Maharashtra News Updates : गँगस्टर संदीप उर्फ ​​काला जथेरीला आईच्या अंत्यसंस्कारासाठी पॅरोल मंजूर

Breaking Marathi News Updates 2 July 2024 : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात फुलराई मुघलगडी (सिकंदराराऊ ठाणा) येथे धार्मिक सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ भाविकांचा मृत्यू झाला.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal

Patiala House Court Live: गँगस्टर संदीप उर्फ ​​काला जथेरीला आईच्या अंत्यसंस्कारासाठी पॅरोल मंजूर

पटियाला हाऊस कोर्टाने गँगस्टर संदीप उर्फ ​​काला जथेरीला त्याच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी कोठडी पॅरोल मंजूर केला.

त्यांच्या आईचे आज निधन झाले. हरियाणातील सोनीपत येथील त्यांच्या गावी उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.

MMRDA कडून साकारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईला नागरिकांचा विरोध

नवी मुंबई विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात 'तिसरी मुंबई' नावाचे नवे शहर उभारण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र या प्रस्तावाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. या प्रस्तावबाबत सरकारने हरकती अथवा सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार शासनाकडे तब्बल 17 हजार हरकती/सुचना प्राप्त झाल्या आहेत. शेकापचे जयंत पाटील यांनी या संदर्भात नगरविकास खात्याकडे प्रश्न विचारला असता नगरविकास खात्याने याबाबत हे उत्तर दिलं आहे.

Mumbai Live : डेंगू, हिवताप प्रतिबंधासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने विविध यंत्रणांच्या सक्रीय सहभागाने उपाययोजना करण्यात येत आहेत. पावसाळी आजारांच्या वेळीच प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणात रूग्णांचा त्वरित शोध घेऊन तत्काळ उपचार करण्यास प्राधान्य द्यावे. यंदा संपूर्ण मुंबई महानगरात पावसाळी आजारांसाठी राखीव अशा ३ हजार रूग्णशय्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तापसदृश आजारांसाठी 'फिव्हर ओपीडी'ची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांनी पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी एकत्रित पद्धतीने प्रयत्न करावेत, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले.

Pratibha Shinde Live: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी प्रतिभा शिंदे यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी प्रतिभा शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही नियुक्ती केली.

Crime News live: १८ किलो चांदी, ३९ तोळे सोन्याचे दागिने नाईट राऊंडमध्ये चोरट्यांकडून हस्तगत

गुन्ह्याच्या तपासासाठी नाईट राऊंड असताना गुन्हे शाखेच्या पथकाला पहाटेच्यावेळी अनोळखी व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरत असल्याची खबर मिळाली अन् घटनास्थळी पोहचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करताना तो आंतरजिल्हा चोरटा असल्याचे समोर आले अन् त्याच्याकडून १७.८३५ किलो चांदीची दागिने, भांडी आणि ३८.९ तोळे सोन्याची दागिने असा सुमारे २८ लाख ४१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

कोकण, मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात उद्या मेघगर्जनेसह पाऊस -IMD

PCMC Live : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरद पवारांच्या पक्षात दाखल

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी शहर युवक अध्यक्षांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विशाल काळभोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला.

Team India Live : टी20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचे उद्या मुंबईत होणार जंगी स्वागत

T-20 विजेत्या भारतीय संघाच उद्या मुंबईत जंगी स्वागत केले जाणार आहेय. मुंबईतील मरीन ड्राइव्हवर ही व्हिक्टरी परेड निघणार आहे. तर वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा सत्कार होणार आहे.

Ajit Pawar Live : लोणावळ्यात वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडलेल्या पाच जणांना सरकारकडून मदत 

एकाच कुटुंबातले पाच लोक लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडले होते. या घटनेतील पीडितांना प्रत्येकी ५ लाख मदत केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसेच सुरक्षेचा विचार व्हावा यासाठी प्रयत्न केले केले जातील असेही पवार म्हणालेत.

कोल्हापूर-मुंबई मार्गावर  वंदे भारत एक्सप्रेस सुरू करा; महाडिकांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

मुंबई-कोल्हापूर मार्गावर तातडीने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, वळिवडे आणि रुकडी या स्थानकांवर रेल्वेचा थांबा पूर्ववत सुरू करावा, यासह अन्य मागण्या खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केल्या आहेत.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर-मुंबई या मार्गावर प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या नेहमी प्रवाशांनी भरलेल्या असतात. अशावेळी कोल्हापूर-मुंबई मार्गावर तातडीने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी.

Accident News Live:  भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीचा अपघात, अपघातात दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव पूर्व आणि पश्चिम ला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. उड्डाण पुलावरील संरक्षक कठड्याला धडकून दुचाकी थेट वीस फूट खोल खाली पडल्याने अपघात होऊन यात दोन तरुणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. वैभव रामदास गमरे (२८ वर्षे) आणि आनंद इंगळे (२१ वर्षे) अशी या दोघांची नावे आहेत. अपघाताची माहिती मुंबई पोलिसांना समजताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या वैभव आणि आनंद या दोघांनाही पोलिसांनी तातडीने जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तिथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra Monsoon Session Live : मी दिलेली माहिती चुकीची असेल तर माझ्यावर हक्कभंग आणा : देवेंद्र फडणवीस

आज सभागृहात बोलताना, सव्वा दोन वर्षात १ लाख लोकाना नोकऱ्या दिल्या आहेत, ७० लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या आहेत यापुढे टीसीएसच्या अधिकृत सेंटरवरच ही परीक्षा घेतली जाणार बाकी कोणत्याही ठिकाणी घेतली जाणार नाही . पेपर फुटीवर अधिवेशनात कायदा घेऊन येणाचा प्रयत्न करत आहे, ही माहिती खोटी असेल तर माझ्यावर हक्कभंग आणा, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Ambadas Danve Suspension Live : अंबादास दानवेंचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात नीलम गोऱ्हे यांच्या दालनात पुन्हा बैठक

अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्याबाबतच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी सभापती नीलम गोऱ्हे यांच्या दालनात पुन्हा बैठक सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते बैठकीला उपस्थित आहे. त्यामुळे दानवेंचं निलंबन मागे घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

PM Narendra Modi Live : पंतप्रधान असोत किंवा सभागृहाचे अध्यक्ष, मल्लिकार्जुन खरगेंचा आदर करणे ही त्यांची जबाबदारी- शरद पवार

राज्यसभेतून विरोधकांच्या वॉकआऊटवर राष्ट्रवादी-एससीपीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, " मल्लिकार्जुन खरगे घटनात्मक पदावर आहेत. पंतप्रधान असोत किंवा सभागृहाचे अध्यक्ष, त्यांचा आदर करणे ही त्यांची जबाबदारी आहे, पण आज तसे झाले नाही. सर्वांनी दुर्लक्ष केले आणि त्यामुळे संपूर्ण विरोधक त्यांच्या पाठीशी आहेत आणि म्हणून आम्ही बाहेर पडलो.

PM Narendra Modi Live : पंतप्रधान मोदी बोलत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी विरोध केला

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान मोदी बोलत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी विरोध केला, घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला. विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले जात नाही, असे विरोधी पक्षाच्या खासदारांचे म्हणणे आहे.

यावेळी पीएम मोदी म्हणाले, "देश पाहत आहे की खोटे पसरवणाऱ्यांमध्ये सत्य ऐकण्याची ताकद नाही. त्यांच्यात सत्याला सामोरे जाण्याची हिंमत नाही, त्यांच्यात ऐकण्याची हिंमत नाही. या चर्चेत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे ते सभागृहाचा आणि उच्च सभागृहाच्या गौरवशाली परंपरेचा अपमान करत आहेत.

PM Narendra Modi Live : भारत जगातली तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे : येणारी ५ वर्ष गरीबांची लढाई लढण्यासाठी आम्ही खर्च करू, हा देश गरिबीच्या विरोधात लढत असलेल्या लढाईत विजयी होईलच. येणाऱ्या काळात मागच्या १० वर्षात केलेल्या कामानुसार आणखी गती वाढवू आणि देशाला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवू.

T20 World Champions To Return Home Live : 'या' फ्लाइटने टीम इंडिया देशात परतणार

वादळामुळे बार्बाडोसमध्येच वास्तव्याला असलेला भारतीय संघ चार्टर विमानाने भारतात दाखल होणार आहे .एअर इंडियाचे विशेष विमान बार्बाडोस विमानतळावर उतरले. या फ्लाइटने टीम इंडिया देशात परतणार आहे.

Solapur Live : सोलापुरात रिक्षा आंदोलनाला सुरुवात

सोलापुरात रिक्षा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. माजी आमदार आणि जेष्ठ माकप नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला आहे.

Kolhapur Live : कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावर दरड कोसळली

कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावर दरड कोसळली असून श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावरून यमाई मंदिराकडे जाताना रोडवर दरड कोसळल्याची घटना घडली. रस्त्यावर आलेले दगड जेसीबीच्या साह्याने केले बाजूला करण्यात आले असून वाहतुकीस होणारा अडथळा दूर करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

Vijay Wadettiwar Live : राज्यामध्ये 40 टक्के कमिशन खोरी वाढली- विजय वडेट्टीवार

राज्यामध्ये 40 टक्के कमिशन खोरी वाढली आहे. डेव्हलपमेंटच्या नावाखाली बिल्डरच्या घशात सगळं घातलं असून मुंबई विकली जात आहे. चंदा दो.. धंदा लो, असं सुरू असल्याचा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

2024 Hathras stampede Live: भोले बाबाचा आश्रम पोलिसांच्या निगराणीखाली, कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी नाही 

हातरस सत्संग दुर्घटनेनंतर भोले बाबाचा आश्रम पोलिसांच्या निगराणीखाली आहे. बाबा आणि भक्तांच्या हालचालींवर निर्बंध आहेत, कोणत्याही वाहनाला किंवा भक्ताला आश्रमाच्या बाहेर जाण्याची परवानगी नाही.

BJP Live: राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे दिल्लीत आंदोलन

दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्यासह इतर नेत्यांनी राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणाविरोधात आंदोलनाचे नेतृत्व केले.

2024 Hathras stampede Live:  हाथरस दुर्घटनेतील मृतांची संख्या 121 वर

हाथरस दुर्घटनेतील मृतांची संख्या 121 वर पोहोचली आहे. यातील 28 गंभीर जखमींवर अलीगढ, आग्रा, एटा आणि हाथरस येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

2024 Hathras stampede Live: हाथरस दुर्घटनेवरून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल

हाथरस दुर्घटनेवरून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. हाथरस दुर्घटनेत शेकडो लोकांना जीव गमवावा लागणार आहे.

Dikshabhumi Nagpur Live : दीक्षाभूमी परिसरातील सर्व शाळांना सुट्टी

दीक्षाभूमी परिसरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. एक दिवसापूर्वी दीक्षाभूमीवर भाविक आक्रमक झाले होते. अंतर्गत पार्किंगच्या मुद्द्याला त्यांचा विरोध आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे.

Pune Zika Live: पुण्यामध्ये झिकाचा सातवा रुग्ण आढळला

पुण्यामध्ये झिकाचा सातवा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर गेलं आहे. पुण्यात एका गर्भवती महिलेला देखील झिका झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सध्या शहरात सध्या चिंतेचे वातावरण आहे.

Yamunotri National Highway Live : यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गाजवळील रस्ता भूस्खलनामुळे बंद

डाबरकोट येथील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गाजवळील रस्ता भूस्खलनामुळे बंद झाला आहे. रस्त्यावरील माती आणि दगड हटवण्याचे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, सतत भूस्खन होत असल्याने रस्ता मोकळा होण्यास वेळ लागत आहे, उत्तराखंड पोलिसांची माहिती.

Hathras Stampede Live : सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू, मध्यरात्री कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

उत्तर प्रदेश : मध्यरात्री उशिरा पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत कार्यक्रमाच्या २२ आयोजकांवर गुन्हा दाखल केलाय. घटना घडल्यानंतर भोले बाबा उर्फ सूरजपाल फरार झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ८० हजार लोकांची परमिशन आयोजकांनी घेतली होती. मात्र, कार्यक्रमाला अडीच लाखापेक्षा अधिक लोक जमा झाले होते. पोलिसांनी बाबाच्या मैनपुरी येथील आश्रमाची तपासणी सुरू केली असून आसपास मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Parliament Session Live : NDA सरकारचं ससंदेचं पहिलं विशेष अधिवेशन आज संपणार, राज्यसभेतही विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता

NDA सरकारच्या काळातील संसदेचं पहिलं विशेष अधिवेशन आज संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार आहेत. काल लोकसभेत उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका करत राहुल गांधी यांचा बालकबुद्धी उल्लेख केला होता. राज्यसभेत देखील आज पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी विरोधी पक्ष आक्रमक राहण्याची शक्यता आहे.

Govind Pansare Murder Case Live : एटीएसच्या तपासावर पानसरे कुटुंबाची नाराजी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे (Govind Pansare Murder Case) यांच्या खुनात सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे पुरावे समोर असतानाही एटीएसकडून (ATS) तपासात होत असलेल्या हलगर्जीपणावर पानसरे कुटुंबाने (Pansare Family) नाराजी व्यक्त केली आहे. एटीएसचे पुणे विभागाचे अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे ६८ पानी लेखी निवेदन शुक्रवारी (ता.२८) पानसरे कुटुंबाने सादर केले. या निवेदनात ही नाराजी व्यक्त केली. इथे क्लिक करा

Neet Paper Case Live : नीट प्रकरणातील दोन्ही आरोपी CBI च्या ताब्यात

नीट पेपर फुटी प्रकरणातील 2 आरोपी काल न्यायालयाने सीबीआयच्या ताब्यात दिले आहेत. तर, नीटसह अन्य परीक्षांमध्ये गैरव्यवहार केल्याचा सीबीआयला CBI संशय आल्याची माहिती आता समोर येत आहे. दरम्यान, यात आणखीन काही आरोपी असल्याचे देखील धागेदोरे सीबीआयला मिळाले असल्याची माहिती देखील समोर येत आहे. सध्या अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींच्या मोबाईल मधून मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहरातील तोडकर, उप्पलवार आणि डोंगरे या तिघांचा यामध्ये काय रोल आहे, यासाठी आज यांची CBI चौकशी करणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. इथे क्लिक करा

Palkhi Sohala Live : सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी करणार पंढपूरकडे प्रस्थान

किल्लेमच्छिंद्रगड : दीडशे वर्षाहून अधिक काळाची परंपरा असलेला किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील नाथ संप्रदायाचे आद्यगुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांचा आषाढी एकादशीच्या वारीसाठी, तसेच विठू माउलीच्या भेटीसाठी परिसरातील २३ गांवच्या दिंडी सोहळ्यासह पालखी सोहळा शुक्रवार (तारीख ५) रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तुकाराम मटकरी-जगताप यांनी दिली.

Pune-Solapur Highway Accident Live : पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात, तेलंगणातील पाच जण ठार

पुणे-सोलापूर महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला असून पाचही मृत तेलंगणातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. भिगवण पोलीस हद्दीतील एका गावाजवळ हा भीषण अपघात झाला.

Pachod Alcohol Ban Live : पाचोडमध्ये अवैध दारू दुकानांवर फिरविला जेसीबी; सात जणांविरूद्ध गुन्हे दाखल

पाचोड : गेल्या अनेक वर्षांपासून बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या अवैध दारूंच्या दुकांनावर प्रथमच दारूबंदी विभागाने कारवाईचा बडगा उगारून धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गासह बाजार मैदानातील दुकानावर जेसीबी फिरवून दुकानांसह अवैध दारूचे साठे नष्ट केल्याची घटना पाचोड (ता. पैठण) येथे केली.

IMD Monsoon Live : मान्सूनने संपूर्ण देश व्यापला, पुढील ३ दिवसांत कोकण, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

मान्सूनने आता संपूर्ण देश व्यापला असून पुढील ३ दिवसांत कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात जुलै महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहर, तसेच उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत सरासरी १०६ टक्के पावसाची शक्यता आहे.

Dikshabhumi Andolan Live : दीक्षाभूमी परिसरातील घटनेनंतर नागपूर पोलिसांकडून 2 गुन्हे दाखल

दीक्षाभूमी परिसरातील घटनेनंतर नागपूर पोलिसांकडून 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गैर कायद्याची मंडळी जमवून आंदोलन आणि जाळपोळ केल्याचा पहिला गुन्हा, तर गैरकायद्याची मंडळी जमवून ठार मारण्याचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. असे दोन गुन्हे बजाज नगर पोलीस स्टेशनमध्ये शेकडो आंदोलकांविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. आरोपी आंदोलकांच्या नावाबाबत पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळली आहे. पुन्हा आंदोलनाचा भडका उडू नये यासाठी ही गुप्तता पाळण्यात आली आहे. इथे क्लिक करा

Hathras Stampede Live : धार्मिक सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात फुलराई मुघलगडी (सिकंदराराऊ ठाणा) येथे धार्मिक सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ भाविकांचा मृत्यू झाला असून, शंभरपेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. तसेच देशात आर्थिक अराजकता निर्माण करण्याचा योजनाबद्ध प्रयत्न काँग्रेसने चालविला आहे, असा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत केला. यासोबतच दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून प्रतिलिटर 35 रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. शिवाय, महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ मिळाली असून अजित पवारांनी सभागृहात याबाबत घोषणा केली. विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत तब्बल २६ तास मतमोजणी झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी बाजी मारली. देशातील काही भागांत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com