साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक अकाऊंट काही दिवसांपूर्वी हॅक झाले होते. याबाबत सातारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून सायबर सेल यावर काम करत आहे. मात्र त्यात त्यांना यश मिळत नाही. या फेसबुकच्या अकाउंटवर आता हॅकरकडून महिलांचे अश्लील व्हिडिओ टाकले जातायत. त्यामुळे सातारा सायबर पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्यानंतर सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं याबाबतीत मांडलेली भूमिका दुर्दैवी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
Mumbai: मराठा समाजातील तरुणांची आर्थिक उन्नती व्हावी तसेच त्यांनी स्वयंरोजगाराची कास धरून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करण्यात येते. या मदतीचा माध्यमातून 1 लाख मराठा उद्योजक घडवण्याचा संकल्प पूर्ण झाला आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ला संपूर्ण राज्यातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. योजनेची नोंदणी सुरु झाल्यापासून अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाखांहून अधिक अर्ज सादर झाले आहेत. लवकरच २ कोटींचा टप्पा गाठेल, अशी माहिती शिवसेना उपनेते, प्रवक्ते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी दिली. आज बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात गुंतवणुकदारांचा ओघ वाढत असून ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सचिव अरुण काळे यांना अटक करण्यात आली आहे. बाजार समितीच्या ९० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात काळेंना अटक करण्यात आली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान व्हावा , असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत।
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर येथील बसस्थानक परिसरातील संविधान चौकजवळील 'भगवती NX' या कापड दुकानात एका पिशवीत बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्याने एकच खळबळ उडाली. याबद्दल पोलिसांना माहिती दिली असता त्यांनी ती पिशवी बाहेर काढली. तसेच चंद्रपुर येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले असून कारवाई सुरू आहे.
पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. हा परिसर सिल करण्यात आला असून गडचांदूर, कोरपनाचे ठाणेदार, नायब तहसीलदार, मंडळाधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. पिशवीत ठेवलेली वस्तू नेमकी काय यासाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.
सीएसएमटी जवळ दोन सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहातूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तब्बल 1 तासासाठी हा बिघाड होता, त्यानंतर सव्वा तीन वाजता बिघाड दुरुस्त झाला मात्र अजूनही लोकल प्रचंड उशिराने धावत आहेत. अनेक लोकल एकामागे एक उभ्या असल्याची माहिती मिळत आहे.
देशमुखांनी पेनड्राईव्ह जनतेसमोर आणावा.
तीन तासांच्या आत सर्व पब्लिश करू.
जर तुम्हाला सत्यता जाणून घ्यायची असेल, तर मी सुनेचा नंबर देते, तिच्याशी बोलून घ्या
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रकाश आंबेडकर आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीवर टीका केली. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण छगन भुजबळ यांचे बोलणे जनरली असते. मात्र, इतर कोणी बोलत असतील, यात्रा काढत असतील, तर त्यांच आणि फडणवीस यांचं नात पतंगासारंख वाटतं,अस म्हणत सुषमा अंधारे यांनी नाव न घेता आंबेडकर यांच्यावर टीका केली.
वायनाड भागात मोठा पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरू आहे.
जिल्हा परिषदेतील ६९ कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र फेरपडताळणीचे आदेश
आरोग्य, शिक्षण, पशू संवर्धन विभागासह अन्य काही विभागातील ६९ कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र फेर पडताळणीचे आदेश
मागील ६ महिन्यांपासून घेतला जातोय जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राचा आढावा
यामध्ये ६९ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत साशंकता
दिव्यांग प्रमाणपत्राबाबत साशंकता निर्माण झाल्याने या ६९ कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र फेर पडताळणीचे आदेश
उद्धव ठाकरे मराठा आरक्षणावर म्हणाले-
मी संभाजी नगरला भूमिका स्पष्ट केली आहे
मध्यंतरी सरकारने एक नाटक केलं होत सगळ्यांची भूमिका विचारून
माझं म्हणणं तेच आहे राजकारण्यांपेक्षा मराठा समाजातील लोकांना समोर बसून चर्चा करावी
जातीपातीत भांडणे लावून कोणी आपलं हित साधत असेल तर ते होऊ देऊ नका
आरक्षण वाढवायचं असेल ते महाराष्ट्रातून शक्य नाही
सगळ्यांनी मोदींकडे जावं मी माझे खासदार द्यायला तय्यार आहे
वायनाड भूस्खलन मृतांची संख्या 63 वर, आतापर्यंत एकूण 116 जखमी झाल्याची नोंद केरळ महसूल मंत्री कार्यालयाने दिली माहिती
पावसाळ्याच्या काळात दरवर्षी नाशिक शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. मागील काही वर्षांपासून उड्डाणपुलावरून पडणारे पाणी, दुभाजकामधील माती रस्त्यावर वाहून चिखल तयार होत असल्यानं दुचाकी घसरून अपघातांच्या घटना घडल्यात. यंदाही मागील एक दोन दिवसांपासून पुन्हा एकदा असे प्रकार घडू लागल्यानं पंचवटी परिसरात थेट मुख्य रस्ताच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.
अशा घटना घडू नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपुलावरील पाईपलाईन व्यवस्थित करणे, महामार्गावरील माती आणि चिखल बाजूला करण्याचे काम केलं जातंय. तसच जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर छोटे चर करण्याच देखील काम करण्यात येतंय. मात्र या तात्पुरत्या मलमपट्टीचा फारसा उपयोग होत नसल्यानं अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीये. दरम्यान या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर उध्दव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
केरळमधील वायनाड जिल्ह्यात आज झालेल्या भूसख्खलनात आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण मातीच्या ढिगाऱ्याखाली 100 हून अधिक लोक दबलेले आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी ७ ॲागस्ट रोजी सुनावणी होणार असून, दोन्ही प्रकरणे एकाच दिवशी ऐकली जाणार आहेत. शिवसेना आणि NCP या चारही पक्षांना उत्तर सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.
कोल्हापुरातील पूर ओसरला असला तरी पुराची दाहकता मात्र अजून कायम आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राज्य मार्गावर पुराच्या पाण्यामुळे वाहून गवताचं शेत मुळासकट वाहून आले आहे.
मुंबईतील रस्ते कंत्राटावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आक्षेप घेतल्यानंतर मोहित कंबोज यांनीही हरकत नोंदवली आहे. त्यांनी, गेल्या पाच वर्षांतील मुंबई महापालिकेच्या सर्व निविदांची चौकशी करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
वर्सोवा कोस्टल रोडचे काम ब्लॅक लिस्टेड कंत्राटदाराला दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सर्व पुरावे आजच कंबोज हे शेलारांना देणार आहेत.
कोयना धरणामध्ये सकाळी ८:०० वाजेपर्यंत एकूण ८५.३७ टीएमसी (८१.११%) पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून ३०,००० क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी १२:०० वा. सांडव्यावरून सोडणेत आलेल्या विसर्गात वाढ करून ४०,००० क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.
मुंबईतील रस्ते कंत्राटावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. गेल्या पाच वर्षांतील मुंबई महापालिकेच्या सर्व निविदांची चौकशी करा अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे यांच्याकडे केली आहे. शेलारांपाठोपाठ आता भाजप नेते मोहित कंबोज यांनीही हरकत नोंदवली आहे. वर्सोवा कोस्टल रोडचे काम ब्लॅक लिस्टेड कंत्राटदाराला दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. सर्व पुरावे आजच कंबोज हे शेलारांना देणार असल्याची माहिती आहे.
वीर धरणाची पाणी पातळी ५७९.५१ मीटर झाली असून धरणाच्या सांडव्याद्वारे सुरु असलेला ४६३७ क्युसेक्स एवढा विसर्ग वाढवून तो आता १३९११ क्युसेक्स करण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. याद्वारे विनंती करण्यात येते कि,नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी, अशी सूचना कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी दिली आहे.
कृष्णा नदीच्या पाण्याची वाढ थांबली आहे. पाणी पातळी 39 फूट स्थिर झाली आहे. आज कोयना धरणातून 42,200 कयुसेक विसर्ग सुरु होतोय. पाणी पातळी थोडी वाढू शकते.
केरळच्या वायनाडमध्ये मोठी दुर्घटना झालीये. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे 4 गावात भूस्खलन झाले. मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या चार गावांना भूस्खलनाचा तडाखा बसला. यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चार गावात मिळून 400 पेक्षा जास्त लोक फसल्याची भीती व्यक्त केली जातेय.प्रशासनाकडून मदतीचं काम सुरू आहे. याप्रकरणी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केले आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा 13981 क्युसेक विसर्ग सकाळी 8:30 वा. पूर्णपणे बंद करण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात भेट घेण्यासाठी काल मराठा समाज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री निवासस्थानी गेले, मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेट नाकारल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून आज मराठा समाजाकडून उद्धव ठाकरे यांच्या घरावर मोर्चा काढण्याची शक्यता असल्याने खेरवाडी पोलीस ठाण्याकडून मातोश्री निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी स्थिर असल्याचे पहावयास मिळत आहे. कृष्णेची पातळी इंच इंचने कमी जास्त होत आहे. काल सकाळी दीड फुटाने कमी झालेली पातळी सायंकाळी 39 फूट 5 इंच वाढली होती. मात्र, आज सकाळी 5 इंचने ओसरली आहे. आता कृष्णेची पातळी 39 फुटावर स्थिर आहे.
बंगळूर : राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आज (ता. ३०) दिल्लीला रवाना होणार आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ‘मुडा’ आणि वाल्मीकी घोटाळ्यांबाबत सिद्धरामय्या हे माहिती देण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मंत्रिमंडळाच्या फेररचनेबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई : उरण यशश्री शिंदे हत्या प्रकरणी दाऊद शेखला कर्नाटक मधून अटक केली आहे. कर्नाटकच्या गुलबर्गामधून त्याला अटक करण्यात आलीये. नवी मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली. या हत्या प्रकरणात दाऊद हा मुख्य आरोपी असल्याने त्याचा शोध पोलीस घेत होते. इथे क्लिक करा
नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आता 6 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्टाने या सुनावणीसाठी 3 सप्टेंबर ही तारीख यापूर्वी निश्चित केली होती. मात्र, कोर्टाच्या मॅटर लिस्टमध्ये ही तारीख नव्याने अपडेट करण्यात आलीये. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नाही, म्हणत ठाकरे सेनेच्या वतीने सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली होती.
पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झालीये. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद गाड्या १५-२० मिनिटे उशिराने धावत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याची माहिती आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सायंकाळी 4 वाजता लोकसभेत अर्थसंकल्पावर उत्तर देणार आहेत. हा अर्थसंकल्प फक्त आंध्र प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांचा असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. सोबतच काल लोकसभेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही निर्मला सीतारामन यांच्यावर जोरदार टीका केली होती.
झारखंड : हावडा-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनचा अपघात झाला. जमशेदपूर जवळच्या राजखरसावन आणि बारांबो स्थानकांदरम्यान ट्रेनचा अपघात झाला. पहाटे 3.45 वाजता ही घटना घडली. घटनेत 20 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. इथे क्लिक करा
विशाळगड अतिक्रमण प्रकरण : काल उच्च न्यायालयात विशाळगडावरील बेकायदा बांधकाम संदर्भातील याचिकेवरील सुनावणी पार पडली. विशाळगडावरील 94 बेकायदा व्यावसायिक बांधकामे पाडल्याचे प्रतिज्ञापत्र पुरातत्व विभागाच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आले. विशाळगड दंगल प्रकरणी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती, रवींद्र पडवळ, बंडा साळुंखे आणि इतर अशा पाच जणांवर एफआयआर दाखल असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांची उच्च न्यायालयात दिली.
नवी मुंबई : यशश्री शिंदे हत्येप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कर्नाटकमधून एकाला ताब्यात घेतलं आहे. मोहसीन हा यशश्रीच्या संपर्कात असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. इथे क्लिक करा
चाकण : येथील औद्योगिक वसाहतीतील आंबेठाण (ता. खेड) गावच्या हद्दीत एका तरुणीच्या गळ्यावर, पोटावर चाकूने वार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला. प्राची विजय माने (वय -21 वर्ष, रा. उरुण इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तरुणीच्या खून प्रकरणी अविराज रामचंद्र खरात ( वय -22 वर्ष, रा. बहे, ता. वाळवा, जि. सांगली ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. इथे क्लिक करा
Latest Marathi Live Updates 30 July 2024 : कथित उत्पादनशुल्क गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य पाच जणांविरोधात अंतिम आरोपपत्र सादर केले आहे. तसेच दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा शनिवारी बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेचे तीव्र पडसाद संसदेत उमटलेत. त्याचबरोबर पावसाने धरण क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्यात उघडीप दिल्याने पूरग्रस्त भागाला दिलासा मिळालाय. पंचगंगेची पातळी गेल्या बारा तासांत सुमारे ११ इंचांनी उतरलीये. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आज यशश्री शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.