Maharashtra News Updates: दिवसभर काय घडलं? एक क्लिकवर वाचा...

Breaking Marathi News Updates 4 July 2024 : महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजना सरकारने सुरु केली आहे. याचा लाभ महिलांना घेता येणार आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal
Updated on

Ajit Pawar Live: पाणीटंचाई असलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा करणार, अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

पाऊस न पडल्याने राज्याच्या ज्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. राज्यातल्या एकाही तालुक्यात किंवा खेड्यात कुणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये पाऊस पडून पाणी उपलब्ध होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना मुख्य सचिव आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

Mumbai Live: मरिन ड्राईव्ह परिसरात खबरदारीचे मुख्यमंत्र्यांकडून  पोलीस आयुक्तांना आदेश 

Mumbai Live : कॅबिनेटची बैठक पुढे ढकलली; उद्या दुपारी होणार बैठक

Mumbai: २२ वर्षे फरार आरोपीला पोलिसांनी केली अटक

२२ वर्षे फरार आरोपीला मीरा भाईंदर मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Chandrapur Live News | चंद्रपूर शहरात गोळीबार, एक जण जखमी

चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात अमन अंधेवार हे जखमी झाले आहेत. अमन हे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख आहेत

St News: पुणे-दोंडाई बसचा अपघात

मनमाड-मालेगाव राज्यमार्गावर पुणे-दोंडाई या बसचा अपघात झाला आहे. बसमध्ये एकूण 26 प्रवाशी होते.

Rahul Gandhi Live: राहुल गांधी दिल्लीत पथ विक्रेत्यांना भेटले, व्हिडिओ होतोय व्हायरल

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील जीटीबी नगरमध्ये पथ विक्रेते आणि रोजंदारी मजुरांची भेट घेतली. राहुल गांधी दिल्लीतील किंग्सवे कॅम्पमध्ये गेल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली.

Hemant Soren Live: हेमंत सोरेन आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, ते तिसऱ्यांदा राज्याची सूत्रे हाती घेतील

झारखंडमध्ये झपाट्याने बिघडत चाललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ते तिसऱ्यांदा राज्याची धुरा सांभाळणार आहेत. दरम्यान, राज्यपाल सीव्ही राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना निमंत्रण दिले.

Congress MP Shashi Tharoor Live: राहुल गांधींचे भाषण हे हिंदुत्वाच्या विचारसरणीवर अतिशय प्रभावी हल्ला होता- काँग्रेस खासदार शशी थरूर

लोकसभेतील राहुल गांधींच्या भाषणावर, काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "राहुल गांधींनी जे केले ते भाजप सरकारच्या पायावर आणि त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीवर अतिशय प्रभावी हल्ला होता.

Maharashtra Rain Forecast Live: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आज व उद्या (५) पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Rohit Pawar Live: विश्वचषक विजयाच्या परेडसाठी महाराष्ट्रात येत असेल, तर 'बेस्ट' बस वापरली पाहिजे - रोहित पवार

राष्ट्रवादीचे एससीपी नेते रोहित पवार म्हणाले की, "आमचे खेळाडू चांगले खेळले. आम्ही विश्वचषक जिंकला. पण, जर विश्वचषक विजयाच्या परेडसाठी महाराष्ट्रात येत असेल, तर 'बेस्ट' बस वापरली पाहिजे. जसे आम्ही 'BEST' बसशी भावनिक जोडलेले आहेत, ती वापरली पाहिजे"

नवी मुंबईचे पाणी बंद करण्यासाठी मोरबे धरणग्रस्त आक्रमक

नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या रायगड मधील खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाच्या फ्लॅब गेटवर चढून पाणी बंद करण्यासाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. 400-500 प्रकल्पग्रस्त नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील वोल्व - फ्लॅब गेट बंद करण्यासाठी वोल्व वर चढून आक्रमक झाले.

Maharashtra News Live Updates : 'त्या' याचिका फेटाळून लावा, राज्य सरकारची हायकोर्टात मागणी

मराठा समाजातील सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, या मागणीसह दाखल केलेल्या याचिकेत तथ्य नाही, त्या याचिका फेटाळून लावण्यात याव्यात, अशी मागणी राज्य सरकारने हायकोर्टात केली आहे. ओबीसी संघटना आणि मंगेश ससाणे यांनी यांच्यासह इतर याचिकाकर्त्यांना यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश देत हायकोर्टाकडून सुनावणी दोन आठवड्यांकरता तहकूब करण्यात आली.

लाडकी बहीण योजनेसाठीचं नारीशक्ती ॲप चालत नसल्याच्या तक्रारी

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळते आहे. त्यातच शासनाने दिलेल्या नारीशक्ती अप्लिकेशन हे प्ले स्टोअर वरनं डाउनलोड केल्यानंतर त्यात माहिती भरण्यात येत आहे. मात्र त्यात मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी येत नसल्याने नागरिकांच्या समस्येत वाढ झाली आहे.

Chandrashekhar Azad takes a dig at BSP Live : बसपचे आकाश आनंद अजून समजदार झाले नाहीत; आझाद यांची टीका

बसपचे नेते आकाश आनंद अद्याप समजूतदार झाले नाहीत, असं म्हणत भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी टीका केली आहे. आकाश आनंद यांच्या 'छोटे-मोटे लोक' यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

Vasant More Live: वसंत मोरे मातोश्रीवर दाखल

शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत आणि पुण्यातील डॅशिंग नेते वसंत मोरे हे मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आहेत. माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज ते चर्चा करणार आहे.

Vitthal Rukmini Mandir Live: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन केले.

मंदिर समितीचे कर्मचारी आनंता रोपळकर यांना मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी शिवीगाळ आणि दमदाटी केली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी मंदिरात आंदोलन केले. समितीचे सुमारे 225 कर्मचारी आंदोलानत सहभागी झाले होते.

दरम्यान, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी कारवाई संदर्भात आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.‌

NEET examination issue Live: नीट प्रकरणी आंदोलन करणारे काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

नीट प्रकरणी आंदोलन करणाऱ्या जयपूरमधील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधीनगर रेल्वे स्टेशन येथे रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला होता.

Amol Mitkari Live: घड्याळ चिन्हाची विरोधकांनी काळजी करू नये- अमोल मिटकरी

घड्याळ चिन्हाची विरोधकांनी काळजी करू नये, चिन्ह आमच्याकडेच राहणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले आहेत. अजित पवारांनी व्हिडिओमध्ये घड्याळ चिन्ह वापरल्याने सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतला होता.

Traffic News live : सज्जनगड किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्या मुळे वाहतूक ठप्प

किल्ले सज्जनगड मार्गावर सज्जनगड फाटा ते सज्जनगड या वळणावर दरड पडल्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे. ठोसेघर सज्जनगड परिसरात पावसाची उघडझाप सुरू असली तरी पावसाचा जोर कायम आहे.या परिसरात रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच आहे.आज पहाटे सज्जनगड रस्त्यावर मोठे दगड आल्यामुळे चार चाकी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे अद्यापही कोणतीही शासकीय यंत्रणा येथे पोहचली नसल्याने येथील चारचाकी वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे.

Nagpur Rain Live : नागपुरातील 'या' भागात उद्या पाणीपुरवठा राहणार बंद

नागपुरातील पूर्व मध्य आणि दक्षिण नागपूरात 5 जुलैला म्हणजेच उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे. कन्हान जल शुद्धीकरण केंद्रात अमृत जलवाहिनी जोडणीसह तांत्रिक कामासाठी 30 तासांचा शटडाऊन करण्यात आला आहे. महानगरपालिका ओसीडब्ल्यू जलशुद्धीकरण केंद्रातून 5 जुलै सकाळी 10 वाजतापासून 6 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत 30 तासांचा शटडाऊन असणार आहे.

Beed News Live: बीडमध्ये धनगर समाजाचे उपोषण सुरू; धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा - उपोषणकर्त्यांची मागणी

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, ही मागणी घेऊन बीडमध्ये धनगर समाज बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे. बीड शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये आकाश निर्मळ यांच्यासह धनगर बांधवांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. गेल्या पाच दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू असून अद्याप पर्यंत प्रशासनाने याची दखल घेतली नाही. दरम्यान धनगर बांधव गेल्या 30 वर्षापासून आमचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, ही मागणी करतोय, मात्र सरकार दुर्लक्ष करतय, यामुळे तात्काळ याची अंमलबजावणी करावी, जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा देखील धनगर बांधवांनी घेतला आहे

PM Modi Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निकालानंतर मोदींचा पहिलाच मुंबई दौरा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोरेगांव मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. हजारो कोटींच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. मोदींच्या दौऱ्यातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत.

Pandharpur Ashadhi Vari Live : पंढरपूरच्या आषाढी यात्रेवर निपा-झिकाचे सावट

पंढरपूरचा आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच राज्यात निपा आणि झिका आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. राज्यात पुणे, कोल्हापूर, नगरसह अन्य भागामध्ये झिकाचे आठ रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे झिकाचे आषाढी यात्रेवर सावट निर्माण झाले आहे. झिका बरोबरच निपा संसर्गजन्य आजाराचाही मोठ्या प्रमाणात फैलाव होऊ लागला आहे. या दोन्ही आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने देखील आता कंबर कसली आहे.

Maharashtra Weather Live Update : आज कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांना पावसासाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर, विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह आ़ज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. इथे क्लिक करा

Smriti Narang Passed Away : बॉलीवूडची 'मॉडर्न गर्ल' स्मृती विश्वास नारंग काळाच्या पडद्याआड; नाशिकमध्ये घेतला अखेरचा श्वास

नाशिक : एकेकाळी बॉलीवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांनी बुधवारी रात्री नाशिक रोडला 101 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नाशिक रोड येथील चव्हाण मळ्यातील राहत्या घरी रात्री 9.00 वाजता त्यांचे निधन झाले. स्मृती विश्वास यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1924 रोजी बांगलादेशातील ढाकाजवळील भरोसापूर येथे झाला होता. त्यांचे पती डॉक्टर एस. डी. नारंग हे जागतिक कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांच्यासोबत त्यांनी 37 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी आजपर्यंत 92 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. इथे क्लिक करा

Panchganga River Live :  इचलकरंजीत पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत गेल्या २४ तासांत साडेचार फुटांनी वाढ झाली आहे. घाटाच्या सर्व पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही काळात पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मंगळवारी सायंकाळी पाण्याची पातळी ४५ फूट ३ इंच इतकी होती. काल सायंकाळी ४९ फूट ८ इंचावर पोहचली होती.

Vishalgad Live : विशाळगड मुक्तीसंदर्भात संभाजीराजेंची रविवारी बैठक

कोल्हापूर : विशाळगड मुक्तीसंदर्भात संभाजीराजे छ्त्रपती यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (ता. ७) सकाळी साडेदहा वाजता जाहीर बैठकीचे आयोजन केले आहे. शासकीय विश्रामगृह येथे होणाऱ्या बैठकीस राज्यभरातून शिवभक्त आणि दुर्गप्रेमी संस्थांचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. बैठकीत गडावर पशुपक्षी हत्याबंदी लागू करण्याचे निश्चित झाले होते. तीन महिन्यांत गडावरील अतिक्रमणे हटविली जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले होते. मात्र स्थानिक राजकारण्यांनी आणलेला अडथळा आणि जिल्हा प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे ही कामे अर्ध्यातच बंद पडली. गडावर पुन्हा अतिक्रमणे सुरू झाली असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

PM Modi Live : वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी येण्याची शक्यता!

पालघर : केंद्र सरकारने वाढवण बंदराला मान्यता दिल्यानंतर बंदराच्या भूमिपूजनासाठी १२ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन त्या दृष्टीने नियोजनाची तयारी करण्यात व्यग्र असल्याचे दिसून आले. मोदी हे पुढील आठवड्यात रशियाला जाण्याचा अंदाज असून त्या दौऱ्यावरून परतल्यानंतर १२ जुलैला पालघर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात किंवा प्रत्यक्ष वाढवण येथे बंदराचे भूमिपूजन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Kolhapur Live Update : वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांविरोधात मुख्यमंत्र्यांची शिवसेना आक्रमक; कोल्हापुरात मध्यरात्री जोरदार आंदोलन 

व्हिनस कॉर्नर परिसरात शिवसेनेने मध्यरात्री जोरदार आंदोलन करत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची पळता भुई थोडी केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. शहरातील वेश्या व्यवसायांमुळे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावल्याचं शिवसैनिकांचं मत आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या वतीने व्हिनस कॉर्नर परिसरात जोरदार घोषणाबाजी करत मध्यरात्री अचानक उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे शाहूपुरी पोलिसांची प्रचंड दमछाक झाली. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या जीपमध्ये जाऊन बसावं लागलं. इथे क्लिक करा

Bhushi Dam Live - भुशी डॅम दुर्घटना : कुटुंबासाठी प्रत्येकी 5 लाखांची भरपाई - अजित पवार

Latest Marathi News Live Update : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. कारण, चंपई सोरेन यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. तर, महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजना सरकारने सुरु केली आहे. याचा लाभ महिलांना घेता येणार आहे. भुशी डॅम जवळ वाहून गेलेल्या कुटुंबासाठी प्रत्येकी 5 लाखांची भरपाई देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. राज्यसभेत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर विरोधकांनी बहिष्कार टाकत सभात्याग केलाय. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.