रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील नवीन उड्डाणपुलांचे काम करताना दोन कामगार पडल्यानं जखमी झाले आहेत. यामध्ये एक कामगार गंभीररित्या जखमी झाला आहे. चिपळूणच्या बहादूर शेख नाका इथं ही घटना घडली आहे. जुनं पिलर तोडताना ही घटना घडली.
धनगर आरक्षणासंदर्भात शिंदे समिती हैदराबादमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने आरक्षण दिला आहे, या सगळ्या संदर्भामध्ये अभ्यासाच्या आढावासाठी जाणार आहे.
मुंबई महापालिकेतील जन्म-मृत्यू नोंदणीचे सर्व्हर गेले २०-२५ दिवसांपासून बंद आहेत. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र न मिळत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून नागरिकांनी संतप्त व्यक्त केला.
माविआचा लवकरच मुंबईत संयुक्त मेळावा होणार आहे. मेळाव्याच्या निमित्ताने विधानसभेचे रणशिंग जाणार फुंकले जाणार.
बिहारमध्ये नुकतेच 9 पूल कोसळल्यानंतर राज्य सरकारने 11 अभियंत्यांना निलंबित केले आहे. बिहार राज्य पुल निर्माण निगम लिमिटेडला नवीन पुलांच्या जलद बांधकामासाठी खर्चाचा अंदाज तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आणि या कामाला मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पडलेल्या पुलांच्या जागेवर संबंधीत कंत्राटदारांकडून त्यांच्यात खर्चावर नवीन पूल बांधले जातील असेही बिहार सरकारने सांगितले आहे.
राज्य सरकारकडून टीम इंडियाला प्रोत्साहन म्हणून ११ कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
भारत क्रिकेटमध्ये देखील विश्वगुरू असल्याचं कालच्या विजयाने सिद्ध केलं आहे. संपूर्ण भारतीयांचं क्रिकेटवरी प्रेम काल पाहायला मिळालं. काल एकीकडे सागर आणि दुसरीकडे जनसागर फुलला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चारही विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
भारतीय संघाच्या स्वागतासाठी काल मुंबईत प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर काल आम्ही देखील जीव मुठीत धरून बसलो होतो. कारण एका वेळी इतके लोक एकत्र येणं सोप्प नसतं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईत एक लाख लोक मावतील एवढ्या मोठ्या स्टेडियमची गरज आहे असेही फडणवीस म्हणाले.
भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या सदस्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा महाराष्ट्र विधानभवनात भाषण केलं. यावेळी रोहितने सुर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचसंबंधी भाष्य केलं.
विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईतील खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी मिश्किल टोला लगावला.
वर्ल्डकपमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ काल भारतात परतला आहे. यानंतर आज विधानभवनात भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा सत्कार केला जात आहे. यासाठी राज्यातील चार क्रिकेटपटू विधानभवनात दाखल झाले आहेत. यामध्ये शिवम दुबे, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, सुर्यकुमार यादव या खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी क्रिकेटपटूंच मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री यांच्या गाडीतून क्रिकेटपटू विधानभवनाकडे रवाना झाले आहेत.
आशिष शेलार तुम्हाला हे लोक मंत्री कधी करणार? तुमची मला काळजी वाटते. इकडे भ्रष्टाचाराचा महापूर आणि आशिष शेलार तुम्हाला काय मिळाले? असा सवाल जयंत पाटलांनी आशिष शेलारांना विधानसभेत बोलताना केला. जयंत पाटील पुढे म्हणाले की,आशिष शेलार तुम्ही मुंबई सांभाळता तुम्ही महाराष्ट्र देखील सांभाळू शकता पण तुम्हाला मंत्री केले नाही.
मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत पेपरफुटीला आळा घालणार विधायक मांडले आहे. या विधेयकामुळे, परीक्षेतल्या तोतयागिरी, फेरागिरीला बसणार आळा. या विधेयकामध्ये अपराध करणाऱ्या व्यक्तीला ३ ते १० वर्षांची शिक्षा आणि १ कोटी रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी एकूण १२ अर्ज आले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र, एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही.
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा पुनर्विलोकन करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय 10 जुलै रोजी सुनावणी करणार आहे.
मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना, हिमा कोहली, बीव्ही नागरथना आणि पीएस नरसिम्हा यांच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पुनर्विचार याचिकांवर सुनावणी होणार आहे.
आम आदमी पार्टीने खासदार संजय सिंह यांची राज्यसभेतील आप संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर पक्षाची जबाबदारीही संजय सिंह यांच्याकडे आहे.
सभागृहामध्ये अजित पवारांनी अर्थसंकल्पावरील प्रश्नावर उत्तर दिले, मात्र त्यांच्या उत्तराने आमचे समाधान झाले नाही, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळत आहे, दरडोई उत्पन्नाचे इतर राज्याचे आकडे सांगितले होते. राज्याचा देशात ११वा क्रमांक हे अर्थमंत्री यांनी कबूल केले आहे. कधीकाळी आपलं राज्य पहिल्या नंबरवर होतं, असं चव्हाण म्हणाले.
उद्योग गुजरातला पळवले, असं विरोधक बोलत आहेत. परंतु त्याबाबत श्वेतपत्रिका काढली जाईल.. पण फेक नरेटिव्ह पसरवू नका, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
मुंबई क्रिकेट संघाची मिरवणूक गुजरातच्या बसमधून काढल्याने विधान परिषदेत राडा सुरू झाला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली.
विधानभवन बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टरवर कोणत्याही क्रिकेटरचे फोटो नाहीत, मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो आहेत.. यावर आक्षेप घेण्यात आला.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज महाविकास आघाडीच्यावतीने दूध आणि कांद्याला भाव मिळावा यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला सुरुवात झाली असून पोलीस आणि निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फसवी असल्याची टीका अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. भविष्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फसवी ठरेल व बारगळेल असा मोठा दावा खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे. मध्यप्रदेशची ही योजना आयात केली, मात्र अतिशय घाई गडबडीत ही योजना आणली. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणली व अधिवेशन असल्याने या बाबत घाई केली गेली. दोन दिवसात नियम बदलले अभ्यास केला गेला नाही असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
घरी झोपलेल्या तरुणांची घरात घुसून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गंजमाळ पंचशील नगर येथे घडली आहे. पांडू शिंगाडे हा तरुण आपल्या मोठ्या भावा बरोबर घरी झोपलेला असताना रात्री 2 : 30 वाजता हा हल्ला करण्यात आला. घटनेनंतर करून हल्लेखोर पसार झाले असून हत्या कोणी आणि कशासाठी केली याचे कारण समोर आलेले नाही. भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत घरात झोपलेल्या तरुणांची हत्या झाल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. याबाबत भद्रकाली पोलिस अधिक तपास करत आहे.
अकोला जिल्ह्यातील अडगाव बुजरूकच्या ग्रामसेविका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अकोट तालूक्यातील पोपटखेड धरणात उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. काठावर उपस्थित लोकांनी या महिलेचे प्राण वाचविले. अत्यवस्थ ग्रामसेविका महिला यांच्यावर अकोटच्या तालुका ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकोला जिल्हा परिषदेचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालीदास तापी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच सध्या हिंगोली जिल्ह्यातील गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्यावरही लैंगिक छळाचा आरोप केला होता. अकोल्यातल्या रामदास पेठ पोलिसांत गुन्हे दाखल झाले मात्र दोघांवरही पोलीस पुढील कारवाई करीत नसल्याचा आरोप करीत ग्रामसेविका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला.
अमरावती जिल्ह्यातील विरुळ रोघें येथे आज पहाटे अन्नातून विषबाधेमुळे दोघी मृत्यू झाल्यानंतर गावात आरोग्य विभागाच्या टीम दाखल झाली. शाळा अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांची तपासणी सुरू आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेतले आहेत. धक्कादायक म्हणजे गावात पुरवठा करण्याऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन नालीतून असून अनेक ठिकाणी लिकेज आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन काय करतयं असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रत्नागिरीच्या खेड तालुक्यात चोरट्यांनी एकाच दिवशी ७ ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. खेड रेल्वे स्थानकाच्या शेजारी वेरळ येथे चोरट्यांनी एकाच सोसायटी मधील दोन बंगले आणि पाच फ्लॅट फोडले आहेत.
अंबरनाथ, उल्हासनगरसह कल्याण शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला महायुतीचे आमदार, खासदार, प्रमुख नेते हजर राहणार आहेत.
अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले होते. त्यांच्या विनंतीच्या पत्रानंतर निलंबन दोन दिवस कमी करण्यात आलंय. यावरून बोलताना दानवे म्हणाले की, तीन दिवसाची कसर उरलेल्या दिवसात भरून काढणार.
अल्पवयीन आरोपीने बाल न्याय मंडळात ३०० शब्दांचा निबंध सादर केला आहे. यात आरोपीने काय लिहिलंय हे माहणं औत्सुक्याचं असणार आहे. आरोपीने कल्याणीनगरमध्ये तरुण-तरुणीला उडवलं होतं.
टीम इंडिया मिरवणुकीसाठी ओपड डेकर बस गुजरातमधून आणण्यात आली होती. यावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. मुंबईत सर्वकाही मिळतं, मग गुजरातवरून बस का आणण्यात आली, यावरून सरकारची वृत्ती दिसते, असं संजय राऊत म्हणालेत.
विधानपरिषदेचा अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. ११ जागांसाठी १२ जणांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कोण अर्ज मागे घेतं का? हे पाहावं लागणार आहे. अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक अटळ आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे कालपासून शिवाजी पार्कवर उपोषण करत आहेत. पोलीस भरतीसाठी उमेदवारांचे वय वाढवण्यात यावे यासाठी त्या उपोषण करत आहेत.
पालघरमधील बोईसरच्या वर्तक गल्लीतील एका कपड्याच्या दुकानात गुरुवारी मध्यरात्री भीषण अशी आग लागल्याची घटना घडलीये. या दुकानाला लागेलली आग तासाभरानंतर विझविण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत कपड्याचे दुकान जळून लाखोंचे नुकसान झाले.
मागील फेब्रुवारी महिन्यात बिबी येथे घडलेल्या भाविकांना प्रसादातून विषबाधा प्रकरणात रुग्णांच्या हेळसांडीचा फटका सीएस डॉ. चव्हाण यांना बसला आहे. बिबीमध्ये 600 पेक्षा अधिक भाविकांना प्रसादातून विषबाधा झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून याप्रकरणाची दखल घेतल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष मारुतीराव चव्हाण यांना राज्य शासनाने निलंबनाचा प्रसाद दिला आहे. त्यांच्या जागी जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा पदभार डॉक्टर भागवत भुसारी यांना सोपविण्यात आला आहे.
शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत १०० स्वयंसेवी संस्थांची आज बैठक पार पडणार आहे. या संस्थांची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होत असून त्या बैठकीला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. आदिवासींच्या विकास आणि कल्याणासाठी यशवंतराव चव्हाण फाऊंडेशनने आदिवासी विकास केंद्राची स्थापना केली आहे.
नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या पथकाने नाशिकमध्ये पाहणी केली. या पाहणीदरम्यान केंद्रीय पथकाला डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या आहेत. केंद्रीय पथक नाशिकमध्ये असतानाच एका डेंग्यू बधितांचा मृत्यू झाल्याचा अहवाल मनपाला प्राप्त झाला असून जून महिन्यात तब्बल 161 जणांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील त्यांच्यासोबत भेटीवेळी होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत शहा यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आहे.
नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज हाथरसला जाणार आहेत. हाथरस घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. हाथरस येथील नवीन खुर्दजवळील ग्रीन पार्क, विभव नगर येथे पीडित कुटुंबियांना राहुल गांधी भेटणार आहेत. विरोधी पक्षनेता बनल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच उत्तर प्रदेश दौरा आहे. हाथरस दुर्घटनेत १२३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत.
मॉरिशसच्या तटरक्षक दलाने दक्षिण-पश्चिम मॉरिटानियामधील नडियागोजवळ 89 बेकायदेशीर स्थलांतरितांचे मृतदेह बोटीतून बाहेर काढले. हे सर्व प्रवासी अटलांटिक महासागरापासून चार किलोमीटर अंतरावर अडकलेल्या मासेमारीच्या बोटीत होते, असे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने (IMD Weather Alert) आज शुक्रवारसाठी (५ जुलै) सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात दमदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन ठाण्यातील एका ज्योतिषाला चक्क दहा लाखांच्या खंडणीसाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संकेत पुजारा असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी या ज्योतिषाने पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. परशुराम भट्टर ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे असून ते ज्योतिष, कुंडली पाहण्याचे काम करतात.
लंडन : ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्ताबदलाचे संकेत मिळत आहेत. एक्झीट पोलमध्ये लेबर पार्टीला प्रचंड बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सत्तेत असलेल्या ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कीर स्टर्मर यांच्या नेतृत्त्वातील लेबर पार्टी मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे. लेबर पार्टी प्रचंड बहुमत मिळवेत असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. इथे क्लिक करा
कोल्हापूर : दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा हा त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला साजेसा नाही. त्यामुळे हा पुतळा बदलून शाहूंच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून नवा पुतळा बसवावा, अशी मागणी विविध सेवा, संस्था आणि संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदन भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती यांच्या वतीने देण्यात आले.
नवी दिल्ली : भारत-रशिया वार्षिक संमेलनात सहभाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी रशिया दौऱ्यावर रवाना होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून गुरुवारी देण्यात आली. रशियाचा दौरा आटोपल्यानंतर मोदी ऑस्ट्रियालाही जाणार आहेत. मोदी ८ ते १० जुलै असे तीन दिवस परदेश दौऱ्यावर असतील. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणानुसार मोदी ८ आणि ९ जुलै रोजी मॉस्कोचा दौरा करतील. मोदी आणि पुतीन यांच्यात ८ तारखेला द्विपक्षीय चर्चा होणार आहे. त्यानंतर २२ व्या भारत-रशिया संमेलनात उभय नेते सहभाग घेतील.
5 July 2024 Latest Marathi News Live Update : रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. अंबानींनी पुत्र अनंत यांच्या विवाहाची पत्रिका सोनिया यांना दिली. भारत-रशिया वार्षिक संमेलनात सहभाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी रशिया दौऱ्यावर रवाना होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. तसेच झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी पुन्हा राज्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीये. पाच दिवसांचे निलंबन तीन दिवसांवर आणल्याने आजपासून अंबादास दानवे सभागृहात येणार आहेत. देशभरात माॅन्सून सक्रिय झाला असून ठिकठिकाणी पाऊस कोसळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.