Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News Updates 6 July 2024 : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal
Updated on

खोकल्याचे औषध समजून कीटकनाशक पिल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

कोल्हापूरातल्या राधानगरी येथील आमजाई व्हरवडे गावात धक्कादायक घटना घडली असून शाळेला जाताना गडबडीत खोकल्याचे औषध समजून किटक नाशक पिल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. वेदांत अशोक पाटील असे या मृत मुलाचे नाव आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

जो महायुतीची बदनामी करेल, त्याच्यावर कारवाई- अजित पवार

''महायुतीची बदनामी टाळा, जो बदनामी करेल त्याच्यावर कारवाई करणार..'' असा इशारा अजित पवारांनी महायुतीतील बंडखोरांना दिला आहे.

माजी नगरसेवकाला मारल्यामुळे ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन

धारावी पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे गटाच आंदोलन सुरु असून माजी नगरसेवकाला पोलिसांनी मारल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. एका अपघातच प्रकरण मिटवायला गेलेल्या माजी नगरसेवकाला मारहाण झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे.

Arvind Kejriwal LIVE : अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा, पत्नी सुनीता यांना वैद्यकीय मंडळाला भेटण्याची मिळाली परवानगी

तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांना वैद्यकीय मंडळाला भेटण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्यांनाही धक्का दिला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या वैद्यकीय मंडळाशी झालेल्या सल्लामसलत दरम्यान सुनीता केजरीवाल यांना उपस्थित राहण्यास न्यायालयानं नकार दिलाय.

Satyendra Jain LIVE : तुरुंगात असलेल्या सत्येंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ; एलजीने तपासाला दिली मंजुरी

दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांनी लाचखोरीच्या प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत चौकशीला मंजुरी दिली आहे. 70 विधानसभा मतदारसंघात सीसीटीव्ही बसवण्याच्या 571 कोटी रुपयांच्या प्रकल्पासंदर्भात सत्येंद्र जैन यांच्यावर 7 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

Surat News LIVE : सुरतमध्ये पाच मजली इमारत कोसळली, दुर्घटनेत 15 जण जखमी

सुरतमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे पाच मजली इमारत कोसळली आहे. या घटनेत १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे, तर अनेक जण गाडले गेल्याची भीती आहे. सुरतच्या सचिन जीआयडीसी परिसरात असलेली पाच मजली इमारत अचानक कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Solapur Rain LIVE : सोलापुरातल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून महापालिकेचा भोंगळ कारभार उघड्यावर आला आहे. सोलापुरातील हांडे प्लॉट परिसरात तुंबालेल्या ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे.

Parliament Budget Session LIVE : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार असून २३ जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. निर्मला सीतारमण सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील.

Assembly Speaker LIVE : विधानसभा अध्यक्षांनी दिली महापालिकेच्या 'ए' वाॅर्ड कार्यालयाला अचानक भेट

विधानसभा अध्यक्षांनी महापालिकेच्या 'ए' वाॅर्ड कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिकांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जात आहेत, याचा आढावा घेतला. यावेळी नार्वेकरांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली.

Nanded accident LIVE : नांदेडच्या धर्माबादमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर सात जण जखमी

नांदेडच्या धर्माबाद ते बिद्राळी रोडवर भीषण अपघात झाला असून यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर इतर सात जण जखमी झाले आहेत. सात जणांपैकी दोघाची प्रकृती गंभीर आहे. तर या अपघातात पाच शेळ्या देखील जागीच ठार झाल्याची माहिती आहे.

Pune Bangalore Highway LIVE : पुणे बेंगलोर महामार्गावर वाहतूक कोंडी

पुणे बेंगलोर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून कोल्हापुरातल्या किनी टोल नाक्याच्या जवळ असलेल्या घुणकी येथे वाहतूक कोंडी झाली आहे. ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी झालीय. त्यामुळे महामार्गावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आहेत.

Hathras stampede LIVE : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपीला लवकरच न्यायालयात हजर करणार

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर, याची न्यायालयात हजर करण्यापूर्वी बागला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला थोड्या वेळातच न्यायालयात हजर करणार आहेत.

Dnyaneshwar Mauli Palakhi Live: संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा विसाव्यासाठी नीरा नदीकाठी

संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा नीरा नदीकाठच्या विसाव्यासाठी निरा शहरांमध्ये दाखल. शहरामध्ये ग्रामस्थ भाविकांनी या वारी सोहळ्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.

Manish Sisodiya Live: मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १५ जुलैपर्यंत वाढ

दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात अटकेत असलेल्या दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १५ जुलैपर्यंत वाढ.

NCP Live: घड्याळ कुणाचं? 16 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी

घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर १६ जुलै रोजी सुनावणी.

Ch. Sambhajinagar BJP Corporators Live: भाजप नगरसेवक शिवसेनेच्या (UBT) वाटेवर? मनधरणीसाठी मोठ्या नेत्यांची पळापळ

छत्रपती संभाजीनगरातील भाजपचे अनेक नकरसेवक सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असून, काही दिवसांत ते पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यानंतर भाजप ज्येष्ठ आमदार हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी नाराज नगरसेवकांची बैठक घेत या नगरसेवकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंत्री अतुल सावे आणि आमदार हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत माजी उपमहापौर राजू शिंदेही उपस्थित आहेत. आता राजू शिंदे यांची काय भूमिका असणार आहेत. हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Shiv Sena Live: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी १९ जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता 

ठाकरे गटाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर १९ जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता.

Naxal Attack Live: नक्षलवाद्यांकडून आयडी स्फोट; दोन जवान जखमी

गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील धोडराज येथून नक्षल अभियानावरून परत येत असलेल्या C-60 जवानांवर आयडी स्फोट करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या स्फोटात दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या आहेत.

C-60 चे जवान रस्त्यावर शोध अभियान राबवत असताना धोडराज-भामरागड पुलाजवळ नक्षलवाद्यांनी लोखंडी क्लेमोरने स्फोट घडवला. यात दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या असून जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात जवानांना यश आले.

Maharashtra Award Live : २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला 

१५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. नवी दिल्लीत १० जुलैला होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

CM Eknath Shinde Live: "मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात येण्याचा नैतिक अधिकार नाही," मराठा क्रांती मोर्चाचे पत्र

मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्याने मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात येण्याचा नैतिक अधिकार नाही, असे पत्र मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे.

PM Modi Live: ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीतील विजयाबद्दल पीएम मोदींकडून केयर स्टारमर यांचे अभिनंदन

ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मजूर पक्षाचे नेते केयर स्टारमर यांचे अभिनंदन केले. भारत-यूके सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी सकारात्मक आणि रचनात्मक सहकार्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले.

NEET - PG Exam Live : ‘नीट-पीजी’ परीक्षा होणार अकरा ऑगस्टला

नवी दिल्ली : राष्ट्रीय वैद्यक शास्त्र परीक्षा मंडळाकडून (एनबीईएमएस) नीट - पीजी परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या ११ ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘नीट-यूजी’ परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून ‘नीट-पीजी’ परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. ‘नीट - पीजी’ची परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत घेतली जाईल. या परीक्षेची ‘कट ऑफ डेट’ १५ ऑगस्टला जाहीर केली जाईल, असे ‘एनबीईएमएस’ मार्फत सांगण्यात आले आहे.

Bihar News Live : पूल दुर्घटनेप्रकरणी १४ अभियंते निलंबित

पाटणा : बिहारमधील पूल दुर्घटनेप्रकरणी राज्य सरकारने १४ अभियंत्यांना निलंबित केले आहे. राज्याच्या जलस्रोत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली. या अभियंत्यांनी लहान पुलांच्या उभारणीमध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे अतिरिक्त मुख्य सचिव चैतन्य प्रसाद यांनी सांगितले.

Palkhi Sohala Live : साताऱ्यात आज संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे होणार आगमन

लोणंद : संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे आज (शनिवार) दुपारी दीड वाजता जिल्ह्यात पाडेगाव (ता. खंडाळा) येथे आगमन होत आहे. त्या वेळी पालखी सोहळ्याचे जिल्ह्याच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी जिल्‍हा प्रशासन सज्‍ज झाले आहे, तर जिल्‍ह्यावासीयांनाही मोठी उत्‍सुकता लागून राहिली आहे.

Tripura Police Live : बांगलादेशातून भारतामध्ये घुसखोरी करणाऱ्या 16 रोहिग्यांना त्रिपुरात अटक

Latest Marathi News Live Update 6 July 2024 : ब्रिटिश राष्ट्राच्या पुनरुज्जीवनाचे आश्वासन देत सर्वांगीण बदलाचा पुरस्कार करणाऱ्या मजूर पक्षाने (लेबर पार्टी) संसदीय निवडणुकीत सर्वोच्च नेते कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटनची सत्ता काबीज केलीये. बांगलादेशातून भारतामध्ये घुसखोरी करणाऱ्या १६ रोहिग्यांना त्रिपुरामध्ये स्थानिक पोलिसांनी अटक केली. तर, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे आज दुपारी दीड वाजता जिल्ह्यात पाडेगाव (ता. खंडाळा) येथे आगमन होत आहे. तसेच ‘टी-२०’ क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधिमंडळात सत्कार करण्यात आला. देशभरातली वातावरणात बदल झाला असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.