Bribe On EMI: हेच पाहायचे राहिलं होतं! 'EMI'वर लाच घेणाऱ्या पोलिसाला दणका, पहिला हप्ता घेताना पकडले रंगेहात

Police Bribery: देशभरात सराकारी अधिकारी, पोलीस विविध प्रकारे पैसे आणि वस्तूच्या स्वरूपात लाच घेतल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
Bribe On EMI
Bribe On EMIEsakal
Updated on

देशभरात सराकारी अधिकारी, पोलीस विविध प्रकारे पैसे आणि वस्तूच्या स्वरूपात लाच घेतल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

मात्र, आता उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथिल बरेलीमध्ये एका प्रकरणातून नाव काढून टाकण्याच्या बदल्यात एका निरीक्षकाने दोन जणांकडे 5 लाख रुपयांची लाच मागितली.

जेव्हा या दोघांनी इतकी रक्कम देण्यास नकार दिला तेव्हा निरीक्षकाने त्यांना लाचेची रक्कम ईएमआयमध्ये देण्याचा पर्याय दिला.

यानंतर या दोन्ही व्यक्तींनी दक्षता विभागाकडे तक्रार केली. आणि त्यानंतर लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना दक्षता पथकाने निरीक्षकाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामौतर यांनी किला पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात एक महिला आणि आणखी एका आरोपीला बाहेर काढण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितली होती.

Bribe On EMI
Mahayuti: काँग्रेसमधून महायुतीत आलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात भाजप-सेना भुईसपाट, वाचा आकडे काय सांगतात

यावर या प्रकरणातील तक्रारदारांनी एवढी मोठी रक्कम एकाच वेळी देणे शक्य नसल्याचे सांगितले. यानंतर पोलीस निरीक्षकाने त्यांना रक्कम हप्त्यामध्ये देण्याची विनंती केली. आणि सर्व रक्कम वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये देण्याचे ठेरले. यानंतर तक्रारदारांनी पोलीस अधिक्षक दक्षता कार्यांलयाकडे लेखी तक्रार केली.

Bribe On EMI
RSS on BJP : ''संघाची भाजपला गरज...'' आरएसएसच्या टिपण्णीवरुन उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना सल्ला

तपासात आरोपांची खात्री झाल्यानंतर दक्षता पथकाने लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये घेणाऱ्या निरीक्षकाला कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाकत्या येथे रंगेहाथ पकडले.

आरोपी इन्स्पेक्टर रामौतर हा नरियावाल येथील घरात भाड्याने राहतो. पोलीस अधिक्षक अरविंद कुमार यांनी सांगितले की, निरीक्षकाने लाचेची रक्कम हप्त्यात देण्यास सांगितले होते. पीडितांनी तक्रार केल्यावर पथकाने नरीक्षकाला जागेवर पकडले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.