अलिगढ : नवरदेव वरात घेऊन येत असताना काही नातेवाइकांनी वधूला एकांतात नेले व वराबद्दल असे काही सांगितले की वधू (Bride) चिडली. यानंतर वधूने थेट मंडपात जाऊन लग्न मोडण्याची घोषणा केली. वधूपक्षाचा निर्णय मिरवणुकांमध्ये एकच खळबळ उडाली. नवरीचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. पोलिस ठाण्यात दोन्ही पक्षांनी संमतीने लग्न (marriage) मोडत असल्याचे लेखी दिले. त्यानंतर वर आल्यापावली घरी परतला. ही घटना उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैदिक विहार सासनी गेट येथील कारखान्यात काम करणाऱ्या आग्रा रोड येथील तरुणाचे लग्न गांधीपार्क शास्त्रीनगर येथील तरुणीसोबत निश्चित झाले होते. शुक्रवारी ही मिरवणूक दोरीनगर येथील लग्नस्थळी पोहोचली. मंडपात लग्नाची तयारी सुरू होती. यावेळी वधूचे काही नातेवाईक आले आणि त्यांनी लग्नाला विरोध केला.
ते वधूला (Bride) एकट्यात घेऊन गेले आणि बोलणं झाल्यानंतर आपल्यासोबत घरी घेऊन गेले. हे पाहून वराची मंडळी नाराज झाली. यानंतर बराच गदारोळ झाला. यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. वराच्या तक्रारीवरून पोलिस घटनास्थळी आणि वधूच्या घरी पोहोचले. तेथून वधू आणि कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
मुलीचे लग्न तिच्या आईच्या सांगण्यावरून होत असल्याची माहिती कुटुंबातील जवळच्या नातेवाइकांकडून मिळाली. नातेवाइकाने मुलीला वराबद्दल काहीतरी सांगितले. यानंतर मुलीने लग्न (marriage) नाही करणार असे पोलिसांना सांगितले. दोन्ही पक्षांनी पोलिस ठाण्यात लग्न मोडत असल्याचे लेखी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.