Annabhau Sathe : अण्णा भाऊंच्या गाजलेल्या 'माझी मैना' या गीताचा राजकीय अर्थ काय होता?

दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात 21 कथासंग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या.
Annabhau Sathe
Annabhau SatheEsakal
Updated on

Annabhau Sathe : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म 1 ऑगष्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव गावात झाला.

तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर असलेल्या अण्णाभाऊनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले.

पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला.नारायण सुर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे फक्त अण्णांमुळे तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये अण्णाभाऊच्या शाहिरीचे मोठे योगदान आहे.

कालांतराने पचढे 1944 ला त्यांनी लाल बावटा पथक स्थापन केले आणि बघता बघता अण्णाभाऊ साठे हे लोकप्रिय लोकशाहीर झाले.

अण्णा भाऊंच्या गाजलेल्या 'माझी मैना' या गीताचा राजकीय अर्थ काय होता?

1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली पण या चळवळीत असलेल्या नेत्यांना जो संयुक्त महाराष्ट्र अपेक्षित होता तो मिळाला नाही.बेळगाव आणि कारवार हा सीमाभाग महाराष्ट्रात येऊ शकला नाही. ही सल अण्णाभाऊंना लागली. मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडून देखील आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही याचं दुःख त्यांच्या मनाला झालं आणि त्यातूनच 'माझी मैना' या छक्कडचा जन्म झाला.

माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।

अण्णाभाऊनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले, पुढे त्या पोवाड्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर देखील झाले आणि राष्ट्रध्याक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. पुढे ते स्वातंत्र्यलढात देखील सहभागी झाले,16 ऑगष्ट 1947 साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत. (Annabhau Sathe)

Annabhau Sathe
अण्णा भाऊ साठे यांची जयंती लेखन प्रेरणा दिन म्हणून घोषित करा

दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात 21 कथासंग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापैकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. अण्णाभाऊनी लिहलेल्या 'फकिरा’ या कादंबरीला 1961 साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे.थोडक्यात काय तर अण्णाभाऊ साठेच्या साहित्याचा माणूस' हा केंद्रबिंदू आहे. त्यांचे साहित्य हे तत्कालीन काळातील वास्तव जीवनाचे अपत्य आहे.

Annabhau Sathe
Annabhau Sathe Birth Anniversary 2022 साहित्यातून समाज बदलणारे अण्णा भाऊ

‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतीची निर्मिती झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.