त्यांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या योगा सत्राने होते. त्यानंतर नाश्ता आणि दुपारच्या जेवणापूर्वी नवजीवन उपचार करण्यात येतात.
बंगळूर : ब्रिटनचे राजे चार्ल्स (King Charles of Britain) बंगळूरच्या गुप्त दौऱ्यावर आहेत. सहा मे २०२३ रोजी वेस्टमिन्स्टर ॲबे (लंडन) येथे युनायटेड किंगडमचा राजा म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांची ही पहिली भारत भेट आहे. चार्ल्स २७ ऑक्टोबर रोजी बंगळूर येथे पोहोचले. बुधवारी रात्रीपर्यंत ते व्हाईटफिल्डमधील सौक्य इंटरनॅशनल होलिस्टिक हेल्थ सेंटर (एसआयएचएचसी) मध्ये उपचार घेतले.