Congress: भाव वाढला! लोकसभेत 99 जागा जिंकलेल्या काँग्रेसमध्ये 6 आमदारांचा प्रवेश

MLA join in congress: राज्यातील सहा विधान परिषदेचे आमदार काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे भारत राष्ट्र समितीसाठी हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे.
RAHUL gandhi
RAHUL gandhi

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची ताकद गेल्या वेळेपेक्षा वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाल्याचं दिसत आहे. काँग्रेसची तेलंगणामध्ये ताकद वाढली आहे. राज्यातील सहा विधान परिषदेचे आमदार काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे भारत राष्ट्र समितीसाठी हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे. बीआरएसच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत रेवंथ रेड्डींच्या नेतृत्त्वात काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. त्यानंतर बीआरएसच्या अनेक आमदारांनी पक्षाची साथ सोडली आहे. रात्री उशिरा दांडे विठ्ठल, भानु प्रसाद राव, एम एस प्रभाकर, बोग्गरापू दयानंद, येग्मे मल्लेशम आणि बसवराजू सरैया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

RAHUL gandhi
Team India Victory Parade : झोमॅटोने मुंबईकरांची मागितली माफी ते KL राहुल का झाला ट्रेण्ड? ‘सोशल मीडिया’ नेमकं काय काय झालं व्हायरल?

बीआरएसचे सहा विधान परिषदेचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी काँग्रेस प्रभारी दीपा दासमुंथी आणि अन्य काही नेते देखील उपस्थित होते. बीआरएसकडे २५ विधान परिषदेचे सदस्य आहेत, तर तेलंगणाची विधान परिषदेत ४० सदस्यांची आहे. यात चार नाव निर्देशित सदस्य असतात. याशिवाय ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे दोन आणि भारतीय जनता पक्षाचे एक आणि पीआरटीयूचा एक असे सदस्य आहेत. एक अपक्ष सदस्य आहे आणि दोन जागा रिक्त आहेत.

भारत राष्ट्र समितीचे सहा आमदार आल्याने काँग्रेसची विधान परिषदेतील एकूण संख्या १० झाली आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार येत्या काळात इतर काही आमदार देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात.

RAHUL gandhi
मोठी बातमी! एसटी सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडे काँग्रेस कमिटीत; 'त्या' व्हिडिओनंतर पोलिसांकडून कारवाई सुरू

तेलंगणामध्ये विधानसभेच्या एकूण ११९ जागा आहे. त्यातील ३९ जागा भारत राष्ट्र समितीने जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला ६४ जागांवर विजय मिळवता आला आहे. बीआरएसच्या एका आमदाराचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे एकूण संख्याबळ ६५ झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com