कलबुर्गी : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरला लँडिंगवेळी मोठी दुर्घटना होता होता टळली. त्यामुळं येडियुरप्पा थोडक्यात बचावले आहेत.
कलबुर्गी येथील जेवारगी इथं सोमवारी हा प्रकार घडला. या धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. (BS Yediyurappa helicopter faces landing issues in Kalaburgi as plastic bags cause scare Video)
येडियुरप्पा यांचं हेलिकॉप्टर लँड करत असताना शेवटच्या क्षणी पायलटनं आपला निर्णय बदलला आणि ते पुन्हा हवेत झेपावलं.
कारण हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरत असताना आजुबाजाला असलेल्या कचरा पंख्याच्या हवेमुळं हवेत पसरला यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा समावेश होता. त्यामुळं पायलटची व्हिजिबलिटी कमी झाली होती.
दरम्यान, या हेलिपॅडच्या बाजुचा सर्व कचरा आणि माती पोलिसांनी साफ करावी लागली. त्यानंतरच हेलिकॉप्टर पुन्हा हेलिपॅडवर सुखरुप उतरवण्यात आलं.
हे ही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच...
कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यापार्श्वभूमीवर आज तिथं मोदी येणार होते, त्यासाठी येडियुरप्पा आपल्या कामासाठी कलबुर्गी इथं आले होते. या ठिकाणी निघणाऱ्या जन संकल्प यात्रेत ते सहभागी होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.