Manipur Violence: अत्याचार थांबेना! मणिपूरमध्ये बीएसएफ जवानाकडून महिलेचा विनयभंग; घटनेचे CCTV फुटेज व्हायरल

मणिपूरमधील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये बीएसएफ जवान महिलेचा विनयभंग करताना दिसत आहे, त्याला निलंबित करण्यात आले आहे
Manipur Violence
Manipur ViolenceEsakal
Updated on

गेल्या आठवड्यात मणिपूरमधील एका दुकानात स्थानिक महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाला निलंबित करण्यात आलं आहे. एका अधिकाऱ्याने काल (मंगळवारी) याबाबतची माहिती दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओमध्ये, हेड कॉन्स्टेबल सतीश प्रसाद, त्याच्या गणवेशात असताना महिलेचा विनयभंग करत तिला शिवीगाळ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे.

बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने या घटनेची माहिती देताना सांगितले की, ही घटना २० जुलै रोजी इंफाळच्या पश्चिम जिल्ह्यात घडली आहे. निमलष्करी दलाकडे तक्रार आल्यानंतर या घटनेची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्याच दिवशी जवानाला निलंबित करण्यात आले आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, दलाच्या 100 व्या बटालियनशी संबंधित हेड कॉन्स्टेबलविरुद्ध न्यायालयीन चौकशीची कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे. या जवानाला ईशान्येकडील राज्यात जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कर्तव्यासाठी तैनात करण्यात आले होते.

Manipur Violence
Manipur Violence: बंदुकीचा धाकानं विवस्त्र नाचायला भाग पाडलं! 'कारगिल'वीराच्या पत्नीची व्यथा

सुपर मार्केटमधील ही घटना सीसीटीव्हीत कैद

सुपर मार्केटमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये जवान महिलेवर विनयभंग करताना दिसत आहे. हेड कॉन्स्टेबल सतीश प्रसाद असे या जवानाचे नाव आहे. एनडीटीव्हीशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, "ही घटना 20 जुलै रोजी इंफाळमधील पेट्रोल पंपाजवळील एका दुकानात घडली. हेड कॉन्स्टेबल सतीश प्रसाद असे आरोपीचे नाव आहे. त्याला निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

Manipur Violence
अग्रलेख : निर्लज्जपणाची हद्द

'बीएसएफ अशा प्रकारचे कृत्य खपवून घेणार नाही'

बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बीएसएफ अशा कृत्यांना खपवून घेणार नाही आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल. मणिपूरमध्ये अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मेईतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी 3 मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मोर्चा' आयोजित करण्यात आला होता. यानंतर राज्यात उसळलेल्या जातीय हिंसाचारात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Manipur Violence
Manipur Violence: मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओवर बृजभूषण सिंहांची प्रतिक्रिया; म्हणाले, PM मोदींनी दखल...

राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आतापर्यंत अशा प्रयत्नांना पूर्णपणे यश आलेले नाही. मेईतेई समुदाय राज्यातील लोकसंख्येपैकी 53 टक्के आहे आणि ते प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतात. त्याच वेळी, नागा आणि कुकी समुदायातील आदिवासी लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत आणि ते डोंगराळ भांगामध्ये राहतात.

दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लैंगिक अत्याचार पीडितांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एवढ्या लांब येत असताना त्यांना का भेटू शकत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

Manipur Violence
Manipur Violence : मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर अत्याचार; जमावाने केली निर्घृण हत्या

रविवारी मणिपूरच्या दौऱ्यावर असलेल्या मालीवाल यांनी दावा केला की, नग्नावस्थेत परेड केलेल्या दोन महिलांनी सांगितले की, सरकारचा कोणताही प्रतिनिधी त्यांना भेटला नाही. मालीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना राज्याचा दौरा करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.