गुजरात सीमेवर पाकिस्तानी बोट सापडल्यानं खळबळ, बीएसएफनं घेतली तात्काळ दखल

Pakistani Fishing Boat
Pakistani Fishing Boatesakal
Updated on
Summary

भारतीय सीमा सुरक्षा दलाला मोठं यश मिळालंय.

नवी दिल्ली : भारतीय सीमा सुरक्षा दलाला (Indian Border Security Force) मोठं यश मिळालंय. गुजरातमधील (Gujarat Border) भुजमध्ये भारतीय हद्दीत घुसलेले पाकिस्तानी (Pakistan) बोट त्यांनी ताब्यात घेतलंय. सध्या संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचं गुजरात बीएसएफनं म्हटलंय. आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळलं नाही. मात्र, पाकिस्तानी बोट जप्त करण्यात आलीय. ही एक पारंपरिक बोट आहे, जी मासेमारीसाठी वापरली जाते. ही बोट इंजिनशिवाय चालते, असं बीएसएफचं म्हणणं आहे. दरम्यान, पाकिस्तानी बोट भारतीय सीमेमध्ये सुमारे 100 मीटर आत दिसली, त्यानंतर ती जप्त करण्यात आली.

एएनआयच्या वृत्तानुसार, बीएसएफ भुजचं पथक अरबी समुद्राजवळ (Arabian Sea) गस्त घालत होतं. त्यानंतर बीपी क्रमांक 1158 हरामी नाला परिसरात काही संशयास्पद गोष्टी घडण्याची शक्यता होती. त्यानंतर तीन-चार बोटीतून पाकिस्तानी मच्छीमार भारतीय समुद्रातून खोलवर येत असल्याचं दिसलं. यानंतर गस्ती पथक तातडीनं तिथं पोहोचलं. गस्त घालणारं पथक जात असताना पाकिस्तानी मच्छीमार परिसरातील झुडपांच्या मदतीनं लपून पाकिस्तानच्या हद्दीत पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर बीएसएफच्या पथकानं एक बोट ताब्यात घेतलीय.

Pakistani Fishing Boat
चिनी सैन्यात हिंदी जाणणाऱ्या तरुणांची भरती, गुप्तचर अहवालातून माहिती समोर

इंजिन नसलेली बोट जप्त केल्याचं बीएसएफचं म्हणणं आहे. ही बोट पाकिस्तानमध्ये बनवलीय. जप्तीसाठी बोटीची कसून तपासणीही करण्यात आलीय. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळलं नाही. या बोटीत फक्त मासे, जाळी आणि इतर काही मासेमारीचे साहित्य दिसत होते. मात्र, बीएसएफच्या पथकानं या संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.