BSNL उभारणार देशभरात 1.12 लाख 4G टॉवर्स; दूरसंचार मंत्र्यांची घोषणा

भारताचे सरकारी टेलीकॉम नेटवर्क असलेले BSNL आता देशभरात आपलं नेटवर्क उभं करण्यासाठी सज्ज आहे.
BSNL
BSNL Esakal
Updated on

दिल्ली : भारताचे सरकारी टेलीकॉम नेटवर्क असलेले BSNL आता देशभरात आपलं नेटवर्क उभं करण्यासाठी सज्ज आहे. BSNL ने टाटा कंसल्टंसी सेवा (TCS) या संस्थेसबत ५५० कोटी रुपयांचा करार केला आहे. या करारात ते भारतातील विविध भागांत आपले जवळपास ६००० टॉवर उभारणार आहेत आणि यामधून ग्राहकांना ४जी सेवा पुरवली जाणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्री आश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली.

भारतभर BSNL चे जवळपास १ लाख १२ हजार टॉवर्स उभे करण्याचं लक्ष असून पहिल्या टप्प्यात ६००० टॉवर्स उभे करण्याचं काम TCS ला देण्यात आलं असून ५५० कोटी रुपये या टप्प्यात खर्च करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. गुरुवारी या करारावर सह्या करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वेने प्रवास करतानासुद्धा ५जी नेटवर्क उपलब्ध करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्या म्हणाल्या की, ताशी १०० किमी वेग असणाऱ्या रेल्वेमध्ये ही सुविधा पुरवण्यात येणार आहे.

BSNL
Pakistan: भारत इतकाच आवडत असेल तर पाकिस्तान सोडा; इम्रान खानवर टीका

दरम्यान लोकसभेत पुढं बोलताना त्या म्हणाल्या की, "भारताच्या वैज्ञानिक आणि अभियंत्याच्या देखरेखेखाली बनवल्या जाणाऱ्या पूर्ण भारतीय बनावटीचं टेलिकॉम नेटवर्क लवकरच आपल्या सेवेत योणार असल्याचं सांगण्यासाठी मला आनंद होत आहे." पुढे बोलताना त्या म्हणाल्या की पहिल्या टप्प्यात ६००० टॉवर यशस्वीपणे उभारले जातील आणि नंतरच्या टप्प्यात ६००० असे करुन १ लाख टॉवर उभारण्यात येणार आहेत. तसेच ५जी नेटवर्क स्थापित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकासही समांतरपणे करण्यात येणार आहे.

दरम्यान पुढील तीन वर्षात १ लाख टॉवर्स उभारण्यात येणार आहेत आणि यासाठी तब्बल १२ हदजार ६१० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.