Bharat Ratna Award: "दलित व्यक्तीमत्वांकडं दुर्लक्ष नको, कांशीराम यांनाही भारतरत्न द्या"; मायावतींची सरकारकडं मागणी

केंद्र सरकारनं गेल्या पंधरा दिवसांमध्ये भारतातील पाच मान्यवरांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर केला आहे.
Kanshiram_Mayawati
Kanshiram_Mayawati
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं गेल्या पंधरा दिवसांमध्ये भारतातील पाच मान्यवरांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर केला आहे. पण या मान्यवरांमध्ये एकही दलित समाजातील नाही, त्यावर बहुजन समाज पार्टीच्या सर्वोसर्वा मायावती यांनी आक्षेप घेतला आहे. (BSP Chief Mayawati demands Bharat Ratna for Kanshi Ram)

मायावतींनी काय म्हटलंय?

मायावती यांनी याबाबत ट्विट करुन भारतरत्न पुरस्कारांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलं की, सध्याच्या भाजप सरकारद्वारे ज्या मान्यवरांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्याचं स्वागतच आहे पण याबाबत विशेषतः दलित मान्यवरांचा तिरस्कार आणि उपेक्षा करण योग्य नाही. सरकारनं याकडेही जरुर लक्ष्य दिलं पाहिजे. (Latest Marathi News)

Kanshiram_Mayawati
Latest Marathi News Update: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर ...

बाबासाहेबांना दीर्घ कालावधीनंतर भारतरत्न दिला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीर्घ कालावधीनंतर व्ही. पी. सिंह यांच्या सरकारद्वारे भारतरत्ननं गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर दलित आणि उपेक्षितांचे कैवारी राहिलेले बसपाचे संस्थापक कांशीराम यांचा दलितांसाठी केलेला संघर्षही कमी नाही. त्यामुळं त्यांनाही भारतरत्ननं सन्मानित करायला हवं. (Marathi Tajya Batmya)

Kanshiram_Mayawati
Joe Biden : ‘‘माझी स्मरणशक्ती शाबूत आहे", बायडेन यांनी ठणकावले; गोपनीय अहवालातील विधाने फेटाळली

मोदी सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात १० जणांना भारतरत्न

मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात एकूण दहा जणांना भारतरत्ननं गौरविण्यात आलं आहे. यापैकी गेल्या पंधरा दिवसात पाच मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. यामध्ये कर्पुरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, एम. एस. स्वामीनाथन, पीव्ही नरसिंहा राव, चौधरी चरण सिंह यांचा समावेश आहे. तर यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी, नानाजी देशमुख, भुपेंद्र हजारिका, प्रणव मुखर्जी, पंडीत मदन मोहन मालवीय यांनाही मोदी सरकारनं भारतरत्न पुरस्कार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.