नवी दिल्ली- बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला असल्याची माहिती मिळत आहे. मायावती यांचा भाच्चा अकाश आनंद हे मायावती यांचे उत्तराधिकारी असतील असं सूत्रांनी सांगितलं. इंडिया टूडेने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (BSP chief Mayawati names her nephew Akash Anand as her successor)
रविवारी एक मोठी घडामोड पाहायला मिळाली. बसपा प्रमुख Bahujan Samaj Party (BSP) आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आपला भाच्चा अकाश आनंद याला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. माहितीनुसार, रविवारी पक्षाच्या बैठकीत लखनऊमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे.
अकाश आनंद यांनाच उत्ताधिकारी म्हणून संधी मिळेल अशी चर्चा होती. त्यानुसार आता त्यांना बसपा प्रमुख म्हणून जबाबदारी संभाळावी लागणार आहे. गेल्या वर्षांपासूनची पक्षातील महत्वाच्या घडामोडींबाबत ते निर्णय घेत होते अशी माहिती आहे.
उत्तर प्रदेशात बसपाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.या बैठकीत मायावती यांनी आपल्या पक्षाची जबाबदारी अकाश आनंद यांना सोपवली. उच्चर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता सर्व देशामध्ये त्यांना पक्षाची जबाबदारी संभाळण्यास सांगण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.