लखनऊ : उत्तर प्रदेशातील राजकारणात आता उलथापालथ घडणार असं दिसून येतंय. कारण बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी समाजवादी पार्टीवर मजबूत असा हल्लाबोल केला आहे. सपावर अत्यंत तिखट शब्दांत टीका करत त्यांनी हरतर्हेने सपाच्या विरोधात लढण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आहे. मायावतींनी म्हटलंय की, मुलायम सिंह यादव यांच्यानंतर अखिलेश यांची देखील वाईट अवस्था होईल. त्यांनी समाजवादी पार्टीला हरवण्यासाठी कोणत्याही पार्टीला पाठींबा देण्याची घोषणा केली आहे. मायावतींनी सपाच्या संपर्कात गेलेल्या सात आमदारांना निलंबित केलं आहे. मायावतींनी म्हटलंय की, जर हे आमदार सपामध्ये सामिल झाले तर त्यांची सदस्यता संपुष्टात आणण्याची कारवाई करण्यात येईल.
हेही वाचा - PM मोदी म्हणाले, कोरोनाविरोधातील लढा प्रभावी; प्रत्येकापर्यंत लस पोहोचवणार
मायावतींनी म्हटलंय की, लोकसभा निवडणुकीदरम्यान सांप्रदायिक शक्तींना तोंड देण्यासाठी आमच्या पक्षाने समाजवादी पार्टीसोबत घरोबा केला होता. मात्र, त्यांच्या परिवारमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत कलहामुळे त्यांना बसपासोबतच्या युतीचा अधिक फायदा मिळू शकला नाहीये. निवडणुकीनंतर त्यांच्याबाजूने प्रतिक्रीया मिळणे बंद झाले. त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा मार्ग निवडला.
बसपाच्या सुप्रिमोंनी पुढे म्हटलं की, मी हा खुलासा करु इच्छिते की, जेंव्हा आम्ही लोकसभा निवडणुक सोबत लढण्याचा निर्णय घेतला तेंव्हा आम्ही पहिल्या दिवसापासूनच खूप मेहनत घेतली. मात्र, सपाचे अध्यक्ष पहिल्या दिवसापासूनच सतीश चंद्र मिश्रा यांना म्हणत होते की, आता सपा-बसपाने युती केलीच आहे तर मला जून 1995 च्या केसला परत घ्यायला हवं. त्यांनी म्हटलं की, निवडणुकीच्या प्रचाराऐवजी सपाचे अध्यक्ष खटला मागे घेण्याच्या प्रयत्नात होते. 2003 मध्ये मुलायम सिंह यांनी बसपा तोडली तर त्यांची अवस्था वाईट झाली. आता अखिलेशने हे काम केलं आहे त्यामुळे त्यांचीही अशीच अवस्था होईल.
हेही वाचा - Bihar Election: 'राहुल गांधी भारतापेक्षा पाकिस्तानच्या टीव्हीवर जास्त दिसतात
राज्यसभा निवडणुकी दरम्यान पक्षाच्या खासदारांच्या फोडाफोडीबाबत मायावतींनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जेंव्हा आम्ही समाजवादी पार्टीच्या वर्तनाकडे पाहिलं तेंव्हाच आमच्या लक्षात आलं की, आम्ही 2 जून 1995 चा खटला मागे घेऊन मोठी चूक केली आहे. आम्ही त्यांच्यासोबत हात मिळवायला नको होता आणि यासंदर्भात अधिक खोलात जाऊन विचार करायला हवा होता.
त्यांनी म्हटलंय की, आम्ही आता निर्णय घेतलाय की, उत्तर प्रदेशात आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सपाच्या उमेदवाराला हरवण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावू. जर आम्हाला भाजपाच्या उमेदवाराला अथवा इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला मत द्यायला लागलं तर आम्ही तेही करु. मायावतींनी म्हटलंय की, 1995 चा गेस्ट हाऊस कांड खटला मागे घेणं ही आमची चूक होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.