दलितांमध्ये स्वार्थाची कमी नाही, सगळे मतलबी आहेत; मायावती संतापल्या

बसपाला कमकुवत करण्यासाठी जातीयवादी शक्ती पडद्याआडून कट रचत आहेत.
BSP Chief Mayawati
BSP Chief Mayawati esakal
Updated on
Summary

बसपाला कमकुवत करण्यासाठी जातीयवादी शक्ती पडद्याआडून कट रचत आहेत.

बहुजन समाज पक्षाच्या (Bahujan Samaj Party) अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती (Mayawati) यांनी विश्वासघातकी आणि विरोधकांवर हल्लाबोल केलाय. मायावतींनी रविवारी एकामागून एक असे तीन ट्विट केलेत.

BSP Chief Mayawati
'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेनं संरक्षण मंत्रालयाचं पाऊल; खासगी कंपन्या बनवणार 'लष्करी हेलिकॉप्टर'

मायावतींनी ट्विटमध्ये लिहिलंय, बसपाला कमकुवत करण्यासाठी जातीयवादी शक्ती पडद्याआडून कट रचत आहेत. बसपाला (BSP) संपवण्यासाठी अनेक संघटना तयार करण्यात आल्या आहेत. त्यांचा खरा हेतू त्यांचा स्वार्थ सिद्ध करणं हा आहे. या ट्विटद्वारे त्यांनी भाऊ आनंदचंही कौतुक केलंय.

मायावतींनी लिहिलंय की, 'दलित आणि उपेक्षितांमध्ये स्वार्थी लोकांची कमतरता नाहीय, यात माझ्या काही नातेवाईकांचाही समावेश आहे. माझ्या गैरहजेरीत माझ्या दिल्लीतील निवासस्थानावर सीबीआयनं छापा टाकल्यानंतर कुटुंबातील काही सदस्य माझ्यापासून दूर गेले. मात्र, लहान भाऊ आनंद मला सोडून गेला नाही. त्यानं सरकारी नोकरी सोडून कुटुंबासमवेत माझी सेवा केली आणि पक्षाच्या कामातही तो सक्रिय झाला आहे.'

BSP Chief Mayawati
घर तुटलंय, राऊतांनी मध्यस्थी घडवून आणावी; टीकेनंतर दीपाली सय्यद यांचा पलटवार

मायावतींनी बामसेफ आणि DS-4 चं कागदी संघटना म्हणून वर्णन केलंय. या स्वार्थी लोकांनी अनेक प्रकारच्या कागदी संघटना विशेषत: बामसेफ आणि DS4 इत्यादी नावानं तयार केल्या आहेत, ज्या सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या नादात आपला स्वार्थ सिद्ध करत आहेत. आता काही लोक बसपामध्ये निष्क्रिय झाले आहेत. ते दुसऱ्या मार्गानं आपला स्वार्थ साधत आहेत, अशी टीकाही त्यांनी केलीय.

BSP Chief Mayawati
राष्ट्रपती भवनात पुतळ्याची गरज नाही; द्रौपदी मुर्मू यांच्यावर तेजस्वी यादवांचा घणाघात

जातीयवादी शक्ती पडद्याआडून बसपाविरोधात कट रचत असल्याचा आरोप बसपा अध्यक्षांनी केलाय. तिसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, अशा प्रकारे जातीयवादी शक्ती बसपाला कमकुवत करण्यासाठी पडद्याआडून कारस्थान करत आहेत. त्याचवेळी त्यांनी कागदी पक्ष बनवून निवडणुकीत दलित आणि शोषितांच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्राणघातक प्रयत्न करतात, अशांवरही हल्लाबोल केलाय. पक्ष आणि चळवळीच्या हिताच्या दृष्टीनं सर्वांनी सावध राहण्याचं आवाहनही मायावतींनी केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()