लखनौ - उत्तर प्रदेशातील विधानसभेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या सर्वच्या सर्व दहा जागा लढविणार असल्याचे बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी रविवारी जाहीर केले.
करहानस मिल्कीपूर, काटेहारी, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, मीरापूर, फुलपूर, सिसामऊ, मझवान या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. मात्र त्याच्या तारखा अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नाहीत. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मायावती यांनी म्हटले आहे.