हृदयद्रावक! गंगा नदीत बुडून MBBSचे पाच विद्यार्थी बुडाले; तिघांचा मृत्यू

5 mbbs students drowned in ganges
5 mbbs students drowned in ganges
Updated on

बदायूं : उत्तर प्रदेशातील बदायूंमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील कचला गंगा घाटावर एमबीबीएसच्या पाच विद्यार्थी बुडाले. यामध्ये तिघांचे मृतदेह सापडले असून २ विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. हे सर्व विद्यार्थी बदायूं मेडिकल कॉलेजच्या २०१९ च्या बॅचचे आहेत.

5 mbbs students drowned in ganges
MAHA CONCLAVE LIVE : पुढील दशकात सहकारिता क्षेत्र मोलाची भूमिका बजावणार ; अमित शहांचं प्रतिपादन

हे सर्व जण कचला गंगा घाटावर स्नान करण्यासाठी गेले होते. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. उजनी कोतवाली परिसरातील कचला गंगा घाटात ही घटना घडली.

यामध्ये प्रमोद यादव, प्रकाश मौर्य, पवन यादव, नवीन सिंघल व अंकुश गेहलोत हे स्नान करू लागले. मात्र अचानक ते खोल पाण्यात बुडू लागले. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावपथकाने तात्काळ नदीतील विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. पण विद्यार्थ्यांना वाचविण्यात अपयश आलं.

5 mbbs students drowned in ganges
ShivSena Row: शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांवर व्हिप लावू शकत नाहीत; अ‍ॅड. श्रीहरी अणेंची माहिती

कचला गंगा घाटावर पोहोचल्यानंतर डीएम मनोज कुमार यांनी तपासणी करून घटनेची माहिती घेतली आहे. डीएमने सांगितले की, मृतदेह बाहेर काढण्यासाठी एक पथक नेमण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.