Budget 2022: भाजपने बजेट सादरीकरणात काय केलेत महत्त्वपूर्ण बदल? वाचा सविस्तर

budget 2022
budget 2022sakal
Updated on

Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी, 2022 ला आर्थिक वर्ष 2022-23 चे बजेट सादर करणार आहेत. कोरोनाचं संकट अद्याप सुरु आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मांडल्या जाणाऱ्या बजेटकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. भारतात बजेट (Budget) सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेकदा काळानुरुप बदल करण्यात आले आहेत. विशेषत: भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रक्रियेत काय आणि कसा बदल झाला आहे, याबाबत घेतलेला एक आढावा. (Union Budget 2022)

budget 2022
सोमय्यांना फाईल दाखवणे पडले महागात; तीन जणांना कारणे दाखवा नोटीस
  • गोड पदार्थ खाऊन सुरुवात बजेटची सुरुवात

प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पाच्या छपाईआधी अर्थमंत्रालयामध्ये मोठ्या कढईत हलवा बनवला जातो. ही पद्धत वर्षानूवर्षे सुरू आहे. एखाद्या चांगल्या कामाचा शुभारंभ गोड खाऊन केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर बजेटचा प्रारंभ म्हणून गोड पदार्थ खाऊन सुरुवात केली जाते. त्यासाठीच हा हलवा बनवण्याची प्रथा आहे. आणखी एक संकेत महत्त्वाचा आहे. नॉर्थब्लॉकमध्ये होणाऱ्या छपाईच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अर्थमंत्रालयातून बाहेर पडता येत नाही.

  • ब्रीफकेस ते बहीखाता - बजेटचा असाही प्रवास

अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman Minister of Finance of India) 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. यावेळचा अर्थसंकल्प आतापर्यंतच्या अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा ठरणार आहे. याआधी अर्थसंकल्पामध्ये कातडी ब्रीफकेसमधून कागदपत्रे घेऊन जात. या परंपरेची सुरुवात देशाचे पहिले अर्थमंत्री आरके शणमुखम चेट्टी यांनी केली होती. निर्मला सितारमण यांनी 2019-20 मध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे लाल रंगाच्या पारंपरिक बही खात्यातून आणली होती. मागच्यावेळचे बजेट हे पेपरलेस बजेट सादर केलं गेलं होतं. त्यासाठी अॅप लाँच करण्यात आलं होतं.

budget 2022
"आपलं पहिलं राष्ट्रगीत" असं म्हणत कंगनानं शेअर केला व्हिडिओ!
  • अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ

सुरुवातीला अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या अखेरीस अधिवेशनाच्या शेवटी सायंकाळी पाचच्या सुमारास सादर केला जायचा. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा बदलली आणि सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. 2001 मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने ही पंरपरा मोडली. आता सकाळी 11 वाजता संसदेत बजेट सादर करण्याची परंपरा सुरु झाली.

  • अर्थसंकल्पाची तारीख बदलली

2017 पर्यंत बजेट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सादर केला जायचा. 2017 पासून तो 1 फेब्रुवारीपासून सादर केला जाऊ लागला. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतची घोषणा केली होती.

  • रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प एकत्र

रेल्वे बजेट आणि यूनियन बजेट सुरुवातीला वेग-वेगळे सादर केले जायचे. 2017 पासून मोदी सरकारने रेल्वे बजेट आणि सर्वसाधरण बजेट एकत्र सादर करण्याचा प्रयोग केला. 2017 पासून दोन्ही बजेट एकत्र सादर करण्याची परंपरा सुरु झाली. भारताच्या अर्थसंकल्पाचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे रल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जात होता. मात्र तोसुद्धा 2016 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेडली यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.