Budget 2023 : बजेट मांडणाऱ्या निर्मला सीतारामन किती शिकल्या आहेत? असा आहे सेल्सपर्सन ते अर्थमंत्री प्रवास

अर्थसंकल्प सादर होण्याआधी त्यांचे जीवन, शिक्षण, राजकीय कारकीर्द, ओळख इत्यादींविषयी थोडक्यात जाणून घेऊया
Budget 2023
Budget 2023 esakal
Updated on

Nirmala Sitharaman Political Career : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्प सादर होण्याआधी त्यांचे जीवन, शिक्षण, राजकीय कारकीर्द, ओळख इत्यादींविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या भारताच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणूनही कार्यरत आहेत. निर्मला सीतारामन 2014 पासून राज्यसभेच्या खासदार आहेत. याआधी, त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री, वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री (वित्त मंत्रालय) आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून काम केले आहे.

निर्मला सीतारामन यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ रोजी मदुराई येथे सावित्री आणि नारायणन सीतारामन यांच्या पोटी झाला. सीतारामनचे वडील मुसिरी, तिरुचिरापल्ली येथील होते आणि त्यांची आई थिरुवेंकाडू आणि तंजावर आणि तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यांतील होती. निर्मला सीतारामन यांचा जन्म तामिळ अय्यंगार ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय रेल्वे कर्मचारी होते.

निर्मला सीतारामन यांनी आपले शालेय शिक्षण मद्रास आणि तिरुचिरापल्ली येथून पूर्ण केले. त्यांनी तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्रात बीए पदवी पूर्ण केली. 1984 मध्ये, त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) अर्थशास्त्रात मास्टर ऑफ आर्ट्स आणि एम.फिल पूर्ण करण्यासाठी दिल्लीला गेल्या.

जेएनयूमध्ये शिकत असताना निर्मला सीतारामन यांची पती परकला प्रभाकर यांची भेट झाली. भिन्न राजकीय विचारसरणी असूनही, दोघांनी 1986 मध्ये लग्न केले आणि त्यांना परकला वांगमयी नावाची मुलगी आहे. परकला प्रभाकर काँग्रेस विचारसरणीचे होते तर सीतारामन यांचा कल भाजपकडे होता. त्यांचे पती परकला प्रभाकर यांनी आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे संपर्क सल्लागार म्हणून काम केले.

Budget 2023
Budget 2023 : आज सादर होणार अर्थसंकल्प; जाणून घ्या बजेटचा ब्रीफकेस ते मोबाईल App प्रवास

निर्मला सीतारामन : राजकीय कारकीर्द

2006 मध्ये, निर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला आणि 2010 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या बनल्या. 2014 मध्ये, भाजपने निवडणुका जिंकल्यानंतर, निर्मला सीतारामन यांची नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. जून 2014 मध्ये सीतारामन आंध्र प्रदेशमधून राज्यसभेच्या खासदार म्हणून निवडून आल्या. मे 2016 मध्ये, त्यांनी कर्नाटकमधून राज्यसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली.

भारताच्या पहिल्या फुल टाईम संरक्षण मंत्री

3 सप्टेंबर 2017 रोजी निर्मला सीतारामन यांना भारताच्या संरक्षण मंत्रीपदी बसवण्यात आले. हे पद भूषवणाऱ्या इंदिरा गांधींनंतरच्या त्या दुसऱ्या महिला आणि पूर्णवेळ काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.

भारताच्या पहिल्या फुल टाईम अर्थमंत्री

सीतारामन यांनी 31 मे 2019 रोजी अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि त्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. ५ जुलै रोजी सीतारामन यांनी संसदेत पहिला अर्थसंकल्प सादर केला. 1 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 सादर केला.

निर्मला सीतारामन : राजकारणात येण्यापूर्वीची कारकीर्द

निर्मला सीतारामन यांनी हॅबिटॅट (लंडनमधील होम डेकोर स्टोअर) येथे सेल्सपर्सन म्हणून काम केले. असोसिएशन ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनीअर्स (यूके) च्या अर्थशास्त्रज्ञाच्या सहाय्यिका म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी PwC (PricewaterhouseCoopers) आणि BBC World Service येथे वरिष्ठ व्यवस्थापक (संशोधन आणि विकास विभाग) मधेही काम केले आहे. त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्याही होत्या.

Budget 2023
Union Budget 2023 : बजेटबरोबरच चर्चा अर्थमंत्र्यांच्या लाल साडीची, या राज्याशी आहे खास नातं

निर्मला सीतारामन : ओळख

निर्मला सीतारामन यांना 2019 मध्ये JNU द्वारे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

फोर्ब्स मासिकाने 2019 मध्ये त्यांना जगातील 34 वी सर्वात शक्तिशाली महिला म्हणून देखील स्थान दिले आहे. (Budget)

निर्मला सीतारामन भारतातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक आहेत. पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री होण्यापासून ते केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक पदे भूषविण्यापर्यंत सीतारामन या देशातील सर्व महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()