Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या आधीच पोस्ट ऑफिसच्या Saving Schemes वरील व्याजदराबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

Post Office Saving Schemes :अर्थसंकल्पापूर्वीच सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे
Budget 2024
Budget 2024 esakal
Updated on

Budget 2024 :

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी नुकतेच शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी लवकरच नव्या कार्यकाळाचा एक महिना पूर्ण करतील. त्यामुळे आता केद्र सरकारच्या बजेटकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. सरकार 2024-25 चा पूर्ण अर्थसंकल्प पुढील महिन्याच्या अखेरीस कधीही सादर करू शकते.

अर्थसंकल्पापूर्वीच सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पोस्ट ऑफिस RD आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) यांसारख्या सामान्य माणसाच्या छोट्या बचतीवरील व्याजदरांमध्ये सरकारने कोणताही बदल केलेला नाही. (Post Office Saving Schemes ) या निर्णयामुळे सामान्य माणसांना दिलासा मिळाला आहे.  

Budget 2024
Maharashtra Budget 2024 : ठिगळ लावलेला फसवा अर्थसंकल्प; विरोधकांची टीका

सरकार दर तीन महिन्यांनी लहान बचत योजनांवरील व्याजदरांचे पुनरावलोकन करते आणि आवश्यक असल्यास बदल करते. मात्र सध्या तरी तसे झालेले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे.

सरकारने निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प आणला होता. आता सरकार पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी देशाचा संपूर्ण अर्थसंकल्प आणणार आहे. याआधी, सरकारने जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी लहान बचत योजनांचे व्याजदर अपरिवर्तित ठेवले आहेत.

Budget 2024
Maharashtra Interim Budget 2024: शिंदे सरकारने वैद्यकीय खर्चाचा भार हलका केला, आरोग्य विमा,मोफत तपासण्या आणि बरंच काही!

अनेक दिवसांपासून अशी अटकळ होती की यात बदल केला जाऊ शकतो. परंतु सरकारने त्यामध्ये वाढ किंवा कमी केली नाही, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी दिली. व्याजदर पूर्वीप्रमाणेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबर 2024 नंतर पुन्हा व्याजदराचा निर्णय घेतला जाईल.

सर्वाधिक व्याज असलेली योजना

लहान बचत योजनांमध्ये सरकार सुकन्या समृद्धी खात्यावर सर्वाधिक व्याज देते. हे व्याज 8.2 टक्के वार्षिक आहे. हेच व्याज सरकार ज्येष्ठ नागरिक योजनेसाठीही देते. या दोन्ही योजनांमध्ये पोस्ट ऑफिसमधून गुंतवणूक करता येते. सुकन्या समृद्धी खाते ही एक विशेष योजना आहे. ज्या पालकांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी मोठा निधी निर्माण करायचा आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. 

Budget 2024
Maharashtra Interim Budget 2024: महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर, कुणाला काय मिळाले? पेट्रोल स्वस्त ते कृषीपंपाचे बिल माफ

इतर योजनांवर मिळते इतके व्याज

किसान विकास पत्र आणि 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर सरकार 6.9% ते 7.5 % व्याज देते, तर 1 ते 5 वर्षांच्या गुंतवणूक योजनेसाठी सरकार 6.9 %ते 7.5% व्याज देते. या योजनांमध्ये गुंतवणूक करून, तुम्हाला आयकर कलम 80 सी अंतर्गत कर सूट मिळू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()