पश्चिम बंगाल: राज्यपालांच्या भाषणावेळी भाजपचा 'जय श्रीराम'चा नारा

पश्चिम बंगाल: राज्यपालांच्या भाषणावेळी भाजपचा 'जय श्रीराम'चा नारा
Updated on

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर आज शुक्रवारी विधानसभेचे पहिले सत्र सुरु होताच आमदारांनी घोषणाबाजी करत सदनामधून वॉकआऊट केलं. राज्यपाल जगदीप धनखड अभिभाषण वाचण्यासाठी उठले असताच भाजप आणि तृणमूलच्या आमदारांदरम्यान मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. यानंतर राज्यपाल अभिभाषण न वाचताच सदनातून बाहेर पडले. सदनाच्या बाहेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल धनखड यांची भेट झाली. यादरम्यान दोघांमध्ये थोडा वेळ बातचित झाली.

पश्चिम बंगाल: राज्यपालांच्या भाषणावेळी भाजपचा 'जय श्रीराम'चा नारा
जातीवरुन भेदभाव झाल्याचं म्हणत IIT च्या प्रोफेसरचा राजीनामा

भाजप आमदारांकडून 'जय श्रीराम'च्या घोषणा

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल जगदीप धनखड अभिभाषणासाठी उठले असता भाजप आमदारांनी जोरदार गोंधळ घालायला सुरुवात केली. भाजप आमदारांनी सदनाच्या आतच जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आणि ते सदनातून बाहेर पडले. त्यानंतर राज्यपाल देखील अभिभाषण न देताच बाहेर पडले.

पश्चिम बंगाल: राज्यपालांच्या भाषणावेळी भाजपचा 'जय श्रीराम'चा नारा
खळबळजनक! मन्सुखच्या हत्येसाठी ४५ लाख रुपये दिले, NIA चा मोठा दावा

नियमांनुसार, विधानसभेच्या बजेटच्या सत्राची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. या अभिभाषणाला राज्य सरकार तयार करते आणि राज्यपाल ते सदनात वाचून दाखवतात. सामान्यत: या अभिभाषणात सरकारच्या कामकाजाची यशस्विता आणि येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला जातो. मात्र, राज्यपाल जगदीप धनखड यांनी अनेकदा ममता सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.