Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

Bulandshahr: आज तिने आमच्यावर हल्ला केला, महिला प्राथमिक शाळेतील शिक्षिका असल्याने उद्या ती मुलांवरही हल्ला करू शकते, त्यामुळे तिला निलंबित केले पाहिजे, अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.
Viral Video|Blandshahr
Viral Video|BlandshahrEsakal
Updated on

यूपीच्या बुलंदशहरमधील एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने शनिवारी शेजाऱ्याच्या घरात घुसून गोंधळ घातला आणि तोडफोड केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याप्रकरणी शिक्षिकेविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही शिक्षिका हातात दगड घेऊन शेजाऱ्याच्या घरात घुसते आणि उभ्या असलेल्या कारच्या काचा दगडाने फोडत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यानंतर शेजारी बाहेर आल्यावर ती त्यांना शिवीगाळ करत धमकावते.

शिक्षिका असलेल्या पारुल शर्मा इलेक्शन ड्युटीवरून परतल्या आणि त्यांच्या घरात घुसल्याचा आरोप पीडित शापिया गोयलने केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांची आई दरवाजा उघडण्याआधीच पारुल शर्मा यांनी दगडाने मुख्य गेटचे कुलूप तोडले. ही संपूर्ण घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Viral Video|Blandshahr
वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

व्हिडिओमध्ये एक महिला बळजबरीने दरवाजा तोडून घरात प्रवेश करताना दिसत आहे. यानंतर ती पार्क केलेली कार दगडाने फोडताना दिसत आहे. महिलेने कारच्या जवळपास सर्व काचा फोडल्या आणि कुटुंबातील सदस्याकडे जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, घरातील सदस्य अगोदरच सावध झाले आणि महिला घरात शिरण्यापूर्वीच त्यांनी घराला कुलूप लावून तिचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. व्हिडिओमध्ये महिला कारचे नुकसान करताना स्पष्ट दिसत आहे. घरात घुसून गोंधळ घालणारी महिला शिक्षिका असल्याचे सांगण्यात येत आहे.

Viral Video|Blandshahr
Hassan Sex Scandal: माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

या प्रकरानंतर पीडित कुटुंबीयांनी पोलिसांनाही बोलावले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, पोलीस कोणतीही कारवाई न करता परत गेल्याचा आरोप पीडितेने केला आहे. महिलेने केलेल्या हल्ल्यात एक वृद्ध महिला आणि एक बालक जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

बुलंदशहर शहरचे पोलीस अधिक्षक शंकर प्रसाद यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी आणि पीडित दोघेही शेजारी आहेत, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. तक्रारीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

आरोपी महिला प्राथमिक शाळेतील शिक्षिका असल्याचे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. आज तिने आमच्यावर हल्ला केला, उद्या ती मुलांवरही हल्ला करू शकते, त्यामुळे तिला निलंबित केले पाहिजे, अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.