Bullet Train : रेल्वेच्या दोन विभागातील विवादामुळे अडकलं बुलेट ट्रेनचं काम; गुजरातमध्येच मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला खोडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला थेट गुजरातमध्येच खोडा बसला आहे. ऑक्टोबर २०२३ पासून बुलेट ट्रेनचं काम बंद आहे. रेल्वेच्या दोन विभागांमधील विवादामुळे हा प्रोजेक्ट खोळंबल्याची माहिती आहे.
Bullet Train
Bullet Train esakal
Updated on

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला थेट गुजरातमध्येच खोडा बसला आहे. ऑक्टोबर २०२३ पासून बुलेट ट्रेनचं काम बंद आहे. रेल्वेच्या दोन विभागांमधील विवादामुळे हा प्रोजेक्ट खोळंबल्याची माहिती आहे.

मुंबई-अहमदाबाद या नव्याने तयार होत असलेल्या रेल्वे मार्गावर देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाकडे बघितले जाते. मात्र मोदींच्याच गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचं काम थांबलं आहे. त्याला कारण पश्चिम रेल्वे आणि NHSRCL अर्थात नॅशनल हाय-स्पीड रेल्वे कार्पोरेशन यांच्यातील तांत्रिक मुद्दा.

Bullet Train
Bhumi Pednekar Bhakshak Movie : '14 वर्षांची होते, तेव्हा माझ्यासोबत...,'भक्षक'च्या निमित्तानं सांगितला 'तो' भयाण अनुभव!

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी NHSRCL ला पूल उभारण्याची परवानगी दिलेली नाही. अहमदाबादध्ये असलेलं साबरमती रेल्वे स्टेशन ते कालुपूर रेल्वे स्टेशन; या दोन स्थानकांदरम्यान असलेला तिसरा रेल्वेमार्ग ब्लॉक करण्याची आवश्यकता आहे. मात्र पश्चिम रेल्वेकडून अद्याप त्यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे काम बंद आहे.

अत्याधुनिक सुविधांसह सज्ज होत असलेली ही बुलेट ट्रेन अहमदाबाद-मुंबई अशी धावणार आहे. सदरील रेल्वे प्रकल्प जपान सरकारच्या तांत्रिक आणि आर्थिक सहाय्याने उभा रहात आहे. या प्रकल्पानंतर मुंबई आणि अहमदाबाद ही दोन मोठी शहरं २.०७ तासांच्या अंतराने जोडली जातील. या बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३५० किलोमीटर असणार आहे.

Bullet Train
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी काँग्रेसला का दूर करत आहेत ? कोणत्या गोष्टीची वाटतेय भीती?

बुलेट ट्रेनच्या ५०८ किलोमीटरच्या मार्गामध्ये समुद्राखालील मार्ग आणि बोगद्यांचाही समावेश आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १,०८,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्याच गुजरातमध्ये प्रोजेक्टचं काम थांबलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.