'भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होईल', PM मोदींच्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त

Bureaucrats on Indian Economy
Bureaucrats on Indian Economysakal
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी (PM Modi) लोकल्याण मार्ग ७ येथील त्यांच्या कार्यालयात सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ही बैठक चार तास चालली असून यामध्ये राज्यांकडून चालविण्यात येणाऱ्या लोकप्रिय योजनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काही राज्य आर्थिकदृष्ट्या अस्थिर आहेत. अशा राज्यांत या लोकप्रिय आणि अव्यवहार्य योजना अशाच सुरू राहिल्या तर भारतीय अर्थव्यवस्था (Bureaucrats on Indian Economy) श्रीलंकेच्या (Sri Lanka Economic Crisis) मार्गावर जाईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

Bureaucrats on Indian Economy
चिनी गुंतवणुकीच्या जाळ्यात श्रीलंका ? पुन्हा ड्रॅगनकडेच मदतीची याचना

पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत (PM Modi Meeting With Bureaucrats) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजी गौबा यांच्यासह केंद्र सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. संसाधनांची टंचाई आहे या मानसिकतेतून बाहेर येऊन अतिरिक्त व्यवस्थापन करण्याच्या नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तयार राहावे. तसेच विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने गरीबी दाखवणे या अशा गोष्टी सोडून व्यापक दृष्टीकोण बाळगा, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना दिल्या. याबाबत एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे.

कोरोना काळात सचिवांनी केलेल्या टीमवर्कचा दाखला देत पुढेही अशीच टीम म्हणून करा आणि फक्त आपल्या विभागापुरते मर्यादीत राहू नका, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी सचिवांना अभिप्राय देण्यास आणि त्यांच्या मंत्रालयांशी संबंधित नसलेल्या सरकारच्या धोरणांमधील त्रुटी सुचवण्यास सांगितले. यावेळी दोन डझनहून अधिक सचिवांनी त्यांचे मत व्यक्त केले. यावेळी मोदींनी मोकळ्या मनाने अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

दोन सचिवांनी एका राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत घोषित करण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख केला. तसेच या राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे. तसेच अशाच योजना इतर राज्यात देखील आहेत आणि ते राज्य देखील आर्थिकदृष्ट्या अस्थिर आहेत. अशा लोकप्रिय योजना लागू करून आपली अर्थव्यवस्था श्रीलंकेच्या मार्गावर जाऊ शकते, असा गंभीर इशारा अधिकाऱ्यांनी दिला, अशी माहिती एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.