Bus Accident News : वैष्णोदेवीजवळ भाविकांवर काळाचा घाला; दहा मृत्युमुखी, ५७ जखमी

नियंत्रण सुटल्याने बस नदीत कोसळली
bus went out of control fell into river devotees Vaishno Devi Ten dead 57 injured accident police hospital
bus went out of control fell into river devotees Vaishno Devi Ten dead 57 injured accident police hospitalsakal
Updated on

श्रीनगर/जम्मू : वैष्णोदेवीला जाणारी बस पुलाचे रेलिंग तोडत सुमारे ५० फुट खाली कोसळल्याने दहा भाविक ठार झाल्याची घटना जम्मू-श्रीनगर महामार्गावर झाझ्झर कोटली भागात आज सकाळी सहा ते सातच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात ५७ जण जखमी झाले आहेत.

bus went out of control fell into river devotees Vaishno Devi Ten dead 57 injured accident police hospital
Bus Accident: अमृतसरहून कटराला जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, नायब राज्यपाल मनोज सिन्हा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी अपघाताद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतांत बहुतांश बिहारचे नागरिक आहेत. या अपघाताची माहिती कळताच बचाव पथक, सीआरपीएफ आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. वेगाने बचाव कार्य राबविण्यात आले आणि जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले.

bus went out of control fell into river devotees Vaishno Devi Ten dead 57 injured accident police hospital
Accident News: नांदगाव-मालेगाव मार्गावर कार पुलावरुन कोसळली नदीत; लहान बाळासह 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर 5 जण जखमी

यात चालक जखमी झाला असून त्याच्यासह अन्य प्रवाशांना सीआरपीएफच्या तुकडीने बाहेर काढले. जम्मूतील जीएमसी रुग्णालयात ५७ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच दहाही मृतदेह बाहेर काढण्यात आले आल्याचे सीआरपीएफने सांगितले. चालकाचे बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हे प्रवासी माता वैष्णोदेवी मंदिरात बाळाचे जावळ काढण्यासाठी जात होते.

चालकाकडून रस्ता चुकला

वैष्णोदेवीला जाणारी बस कटराला जाण्याऐवजी श्रीनगरच्या दिशेने निघाली. अपघातस्थळाच्या दोन किलोमीटर अगोदरच बसने डावीकडे वळणे अपेक्षित होते, परंतु चालकाच्या लक्षात वळण आले नाही. त्यामुळे बस उधमपूर-श्रीनगरच्या दिशेला गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.